Skip to main content

नाम अवतार कलियुगी - १८

नाम अवतार कलियुगी - १८

काल पर्यन्त दीर्घ विस्ताराने पाहिलेल्या सर्व भागांचा संक्षिप्त अर्थ हाच की ,  या युगात नाम वा नामस्मरण या शस्त्राला मूळ परमात्म प्राप्तिच्या मार्गात अनन्य साधारण महत्व आहे. विशेषतः साधनेच्या मार्गात, किंवा दैनंदिन जीवनात सुद्धा सहज साध्य ईश्वरी चिंतनाचं कोणत महत्वाचं साधन असेल तर ते नामस्मरण हेच आहे. 

या नामाची महती ख़र तर युगानुयुगे भारतवर्षात अनेक महात्म्यानी, संतानी, सत्पुरुषानी स्वतःच्या आचरणातून, कार्यातून आणि जीवनातून दाखवून दिली आहे. हे सर्वात सोप्प, सहजसाध्य आणि कोणत्याही नियमांची बंधनं नसलेल अस सर्वसमावेशक साधन आहे.

नाम ही अफुची अशी गोळी आहे, जी जिभेवर ठेवताच मनुष्य सर्व कर्मफलाच्या बंधनातून पूर्ण मुक्त होतो.  फक्त एकच करायच कोणत्याही कर्माचा अभिमान बाळगायचा नाही. तो या मार्गातील सर्वात मोठा अडसर आहे.  नित्य कर्तव्य करत करत जिभेने, मनाने, आत्म्याने फक्त नामवसा चालू ठेवायचा. नित्य नामस्मरणात अनेक युगांच्या पापाचा नाश करण्याच सामर्थ्य आहे.

अनेक साधकानी, संतानी  साधना करून हे नामरूपी शस्त्र आपल्या हाती दिले आहे. या नामस्मरणाच्या आधारे तरलेले अनेक भक्त आहेत उदाहरणार्थ प्रल्हाद, ध्रुव, सुदामा, मीरा बाई, कबीर, संत ज्ञानेश्वरांपासून ते आधुनिक काळातील अनेक तपस्वी साधकांपर्यंत सर्वानी आपल्याला तसं उदाहरण घालून दिलय. 

याची महती आपल्या कार्यातून याच् लोकांनी प्रकट करून जगापुढे मांडली आहे. प्रश्न हा आहे की, आपल्याला याचा प्रत्यय घ्यायचा असेलच तर फक्त हे पावन साधन , साधना म्हणून घेऊन बघा आणि जस जसा याची सवय होत जाईल तस तसे आपल्यात बदल होत जातील. 

आता नाम घ्यायच म्हणजे नककी काय करायच आणि ते करताना कोणत्या गोष्टी ध्यानात असाव्यात यावर उद्या विचार करू. 

आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा 

श्री गुरुवे नमः 

© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
२२/१०/२०१७

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...