Skip to main content

नाम अवतार कलियुगी - १९

नाम अवतार कलियुगी - १९

दोन दिवसाच्या विश्रांतिसाठी क्षमस्व, कार्यव्यस्ततेमुळे शक्य झाल नाही.

सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की, नाम घेण म्हणजे अनेक जन्माच्या पाप पुण्याच्या हिशोबातून मुक्ति मिळवून पुढे सरकण्याचा महामार्ग. यात तुम्हाला बुद्धि झाली यातच सर्व काही आल.  नाम घेताना ख़र तर कोणतेही बंधन वा नियम नाहीत, तरी सुद्धा काही गोष्टिंच नियमन करण गरजेच असत,  नामाच्या  खऱ्या अर्थाने मिळणाऱ्या आनंदा साठी. या गोष्टी  कोणत्या ते आधी पाहुया:

१. नाम हे सूक्ष्म पणे काम करत असल्यामुळे ते  ,नित्य सतत घ्यावे.

२. नामाला स्थल , काल, शारीरिक स्थिति या कशाचहि बंधन नाही ते अनेक महान संत, महंत यानी सिद्ध केलेल आणि सर्व भौतिक परिमाणांच्या पार, म्हणजेच पलीकडे आहे.

३. नाम स्वतः चिंतामुक्त करत असल्यामुळे ते घेताना कोणतीही शंका, काळजी अथवा चुकीचे विचार आणू नयेत. आलेच तरी त्याना त्यांच्यां मार्गाने जाऊ द्यावे, आपण त्या विचारांचा माग काढत बसु नये. मग ऐसे विचार आपोआप बंद होतात.

४. नाम हे परम पावन आणि अत्यंत शुद्ध आहे. त्याच्या नित्य सेवनामुळे सर्व पारमार्थिक व्याधी आपोआप ठीक होतात. शंका ठेवून वा घेऊन नाम घेणे  , न घेतल्या सारखेच आहे. म्हणजे न घेणे इष्ट त्यापेक्षा .

५. नाम हे शक्यतो सद्गुरुंकडून घ्यावे , त्याच कारण अस की, त्यानंतर तुमच्याकडून नाम करवून घेण्याची जबाबदारी ते स्वीकारत असल्यामुळे, आपण चिन्तामुक्त होऊन फक्त नाम घ्यावे, त्याचे परिणाम तेच बघून घेतात. पण नाम मात्र घेणे गरजेचे आहे.

६. नाम हे जागृत अवस्थेत घेणे हे आपलं कर्तव्य आहे. सद्गुरु कृपेचा खरा प्रसाद हाच की निद्राअवस्थेत नाम करवून घेण्याच महत्त्वाचं काम गुरु करतात.

७. हरीकृपेने नाम घेण्याची बुद्धि तुमचीच असण गरजेच आहे. तिथेच सर्व जन्माची सार्थकता सिद्ध होते.

८. नाम हे चित्तव्रुत्ति शुद्ध करत असल्यामुळे, नाम घेतल्या नन्तर आपल्यात सात्विक बदल होण अपेक्षित असत, ते तस नसेल होत तर दोष आपल्याकडे येतो. आपण पूर्ण ताकदिने अथवा सर्वस्वी नाम घेत नसणार. आधी त्याचा शोध घ्यावा.

९.नाम घेताना सर्वात प्रथम त्याग करावा तो म्हणजे अभिमानाचा. हा अभिमान हे अस तण आहे जे मुख्य पिकाचा कधी नाश करील कळणार सुद्धा नाही. अभिमान त्यागावा म्हणजे इतका त्यागावा की मी नाम घेतो हा विचार देखील  येता कामा नये, कारण अभिमान हा अत्यंत घातक आहे.

१०.नामात राहण्यासाठी कोणत्याही सबबीची आवश्यकता नाही. विनाअट आधी नाम सुरु करा.

याउप्पर अजुन काही गोष्टी पाहुया पुढील भागात.

आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा

श्री गुरुवे नमः

© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२४/१०/२०१७

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...