Skip to main content

कवडसा 17

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …१७……



योगेंद्रला रूम मध्ये शिफ्ट करून साधारण तास होत आला होता आशाताईना शीतलच्या डोळ्यांची हालचाल जाणवली. त्याना आनंद झालेला जाणवत होता आणि एक मिनिटभरातच शीतलने हळू हळू डोळे किलकिले केले आणि समोर आशाताईना बघून अश्रुंच्या धारा दोघींच्याही डोळ्यातून वाहू लागल्या . हेच दृश्य दोन्ही बाजूला एकाच वेळी सुरु होत . अचानक भानावर येत आशाताई बोलल्या
आशाताई : कस वाटतंय, खुप दुखतय का ग, काय हे केलस. बर असूदेत नंतर विचार करू  पण आता आराम कर.
अस म्हणत त्या उठल्या आणि टॉवेल घेऊन तीचा चेहरा पुसून काढला. शीतलला आईच्या स्पर्शाने अर्ध बर झाल्या सारख वाटल . तिने परत,  पण विश्वासाने,  डोळे मिटले. काही आवाज झाला म्हणून परत डोळे उघडले आणि समोर नर्सला पाहुन ती म्हणाली , आई हिला इथे का ठेवलय मला काही सीरियस प्रोब्लेम तर नाही ना
आशाताई :  अग तस काही नाहिये हॉस्पिटल मध्ये जागा नाहिये म्हणून साठे डॉ नी माझ्या परवानगीने एका एक्सीडेंट झालेल्या पेशंटला दोन दिवसांसाठी ठेवलय.  इथे हॉस्पिटल बाहेरच त्याचा एक्सीडेंट झाला
शीतल : डॉ काका म्हणालेत म्हणजे त्यांच्या विश्वासातला असेल माणूस. काय नाव सांगितला का त्याच
तेवढ्यात आशाताइना काही आठवल म्हणून त्या शीतलला एवढच म्हणाल्या अग काहीतरी योगेन्द्र पुरोहित का अस काही नाव म्हणाले आणि त्या बाहेर गेल्या
शीतलच्या डोळ्यापुढे ते नाव ऐकल्यावर पूर्ण जग फिरल्या सारख झाल आणि अशक्त पणामुळे भोवळ आल्यामुळे तिने पटकन डोळे मिटून घेतले…… 

क्रमशः 

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...