Skip to main content

कवडसा 15


कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …१५……


बाहेरची  वर्दळ थोड़ी कमी झाली. आशाताईनी बाहर डोकावून पाहिल डॉ साठे घाईघाइने OT मध्ये शिरत होते.  त्यानी आशाताईना पाहिल हसले आणि आत गेले.  साधारण दोन अडीच तासानी  डॉ.  बाहेर आले नर्स बरोबर काही बोलले आणि एक चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. 
फ्रेश होऊन काही ठरवून ते शीतलच्या रूम मध्ये आशाताईंशी   बोलायला आत आले. 
डॉ: नमस्कार मग कसा आहे आमचा पेशंट. 
आशाताई : आता बरी आहे पण  अजून  शुद्धीवर आली नाहिये. 
डॉ : येईल एक अर्ध्या तासात.   तुमच्या कड़े एक काम होत
आशाताई  : बोलाना डॉक्टर 
डॉ : प्रॉब्लम असा आहे की तो एक्सीडेंट पेशंट तुम्हाला माहीत असेल ( आशाताईनी  होकारार्थी मान डोलावली ),  त्याला ठेवायला सध्या वॉर्ड मध्ये कुठेच् जागा नाहिये आणि आताच अजून दोन accident  cases  येतायत.  तर काही काळासाठी म्हणजे एखादा दोन दिवस जर या रूम मध्ये शिफ़्ट केला तर चालेल  का ?  तसाहि तो अजून काही तास बेशुद्धच असेल  आणि मी एक नर्स पूर्ण वेळ ठवीन  इथे.  I think you will have no problems. and  after all   its my  responsibility. You  dont  have  to  worry . Its  my  assurance . 
आशाताई  थोड्या संभ्रमात होत्या.  तेवढ्यात डॉ म्हणाले आणि तो चांगल्या घरातला आहे.  आपल्यातलाच आहे.  योगेन्द्र पुरोहित अस काही नाव आहे. तेवढ्यात नर्स म्हणालीच,  हो हेच नाव आहे.
आशाताई  नाइलाजाने आणि नाखुशीनेच तयार झाल्या.
डॉ  नी  लगेच पेशान्टला रूम मधे शिफ्ट केल आणि एक नर्स तिथेच खुर्ची टाकून बसली . आशाताईनी  जवळ जाउन योगेंद्रला पाहिल खरच  खुप छान होता चेहरा त्याचा आणि हुशारही वाटत होता. 

आणि आशाताई परत शीतलच्या बेड जवळ येवून बसल्या. 
क्रमशः …

Comments