Skip to main content

भोग आणि ईश्वर ४९३

भोग आणि ईश्वर  ४९३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।। 

आपण ज्या विषयासंदर्भात चिंतन करत आहोत, त्या शरणागती बाबत मनात अनेक विकल्प उभे राहतात. त्या विकल्पातून, शंकाकुशंका, इष्ट अनिष्ट विचार येतात. याचं कारण म्हणजे मनात सकार  व नकार भरलेला आहे. तो मनातून तो आत्म्याला देखील ग्रासून उरतो. सर्व शंका, संशय, संदिग्धता या मनातूनच उत्पन्न होतात. मुळात त्या तिथे असतात, फक्त काहींच्या बाबतीत, ते भाव विशेष प्रकट होऊन, मनावर राज्य करतात. 

या व्यक्तींना अंशतः ते संपूर्ण अश्या वेगवेगळ्या प्रमाणात, या शंका, संशय व संदिग्धता या भावांनी ग्रासलेलं असतं. ग्रासणं या शब्दातच,ते भाव मनाचा घास घेतात हे अध्याहृत आहे. पण हे ग्रासणं कायमस्वरूपी, तेंव्हा असेल ज्यावेळी ते, संपूर्णपणे मनाला ताब्यात घेतं. हे भाव मनात हळूहळू ते अतिजलद पसरतात. त्यामागचा तर्क किंवा कारण असं आहे की, मनाच्या कुवतीवर यांचं प्रवेशणं ते प्रसारित होणं अवलंबून आहे. 

कुवत म्हणजे मनाची स्वतःची शक्ती, बल व ऊर्जा. म्हणजे जर मनाची शक्ती ही प्रभावी असेल तर, त्या मनात बाहेरून कोणतीही गोष्ट वा विचार अथवा विखार आत जात नाही वा जाऊ शकत नाही. म्हणजेच बाहेरील कोणताही नकारात्मक विचार आतील अनिष्ट केंद्रांना प्रभावित करू शकत नाही. वास्तविक ही ऊर्जा व शक्ती सर्व मनात अस्तित्वात असते. मात्र काही मनात ती शक्ती व ऊर्जा प्रभावहीन किंवा बलहीन असते. या प्रभावहीन उर्जेला आणि शक्तीला प्रभावशाली किंवा बलशाली करण्याचे उपाय मागेच विस्ताराने चर्चिले आहेत. 

त्यानुसार कमी कुवत वा शक्ती असलेल्या मनाला, लुप्त झालेली किंवा कमजोर झालेली बल व ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी, सतत सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या व त्याद्वारे मनाची शक्ती वाढवणाऱ्या, विचारांचं खाद्य देणं वा देत राहणं, हा सर्वतोपरी उत्तम मार्ग आहे. या कार्यातसुद्धा, सर्वात श्रेष्ठ उपाय म्हणजे भगवननाम आणि सतत ईश्वरस्मरण हा उपाय सर्वश्रेष्ठ आहे. कारण या स्मरणातून वा चिंतनातून फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन, मनाचं बल वा कुवत वृद्धी होते. 

याद्वारे मनाचं बल पूर्ववत करून, आत्म्याला नकारातून सकारात आणता येईल. अश्या सकारात्मक ऊर्जा व बल याने परिपूर्ण मनाला, शंकाकुशंका, संशय व संदिग्धता हे तणरूपी भाव ग्रासू शकत नाहीत, किंबहुना अश्या सकारात्मक मनात, हे भाव  प्रवेशुच शकत नाहीत. एकदा मन संशयरहित व शंकारहित झालं की, स्मरण व शरण यांना साध्य करायला, ते संपूर्णपणे तयार होईल. 

कारण स्मरण व शरण हे, शुद्ध, सकारात्मक बलाने व ऊर्जेने भरलेल्या आणि भारलेल्या मनाने निःसंशयपणे साधता येईल.  या स्मरण व शरण या जोडीला बांधणारी तिसरी गोष्ट वा भाव असणं अत्यंत आवश्यक आहे, किंबहुना तो या दोघांचा प्राण आहे. त्यावर उद्या चिंतन करूया. तोपर्यंत नामाचं चिंतन आपण करतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...