Skip to main content

भोग आणि ईश्वर ३६६

भोग आणि ईश्वर  ३६६ 

काल आपण पाहिलं त्यानुसार, व्यावहारिक चिंता ह्या व्यावहारिक गुंता वाढवतात. कारण त्या चिंता जीवाला नित्य व कायम बद्ध ठेवतात. जीव त्याच चक्रात अडकत जातो आणि कर्मफलाच्या त्याच साखळीतून कधीही बाहेर पडण्याचा विचार करत नाही.कारण ज्या प्रकारच्या समस्या, त्याच प्रकारचा मार्ग निवडला जातो. 

म्हणून असे जीव, महाराज, स्वामी, सिद्धपुरुष यांना, याच सांसारिक व व्यावहारिक चिंता व समस्यांचा मार्ग विचारतात. यामध्ये साधनेचा जसा जोर असेल आणि ज्याप्रकारे नाम स्मरणाचा नित्य अभ्यास असेल त्यानुसार थोड्याफार प्रमाणात, याचा उपयोग, या समस्येवर उपाय वा औषध म्हणून होतो. 

पूर्णतः रोग समूळ नष्ट व्हावा यासाठी असलेलं पारंपरिक औषधी शास्त्र, आयुर्वेद, या तत्वानुसार, रोग हा पूर्ण नष्ट होणं, हा त्या शास्त्राचा मुख्य उद्देश आहे आणि असतो. पण सांसारिक रोग,चिंता व समस्या, यांवर अश्या सिद्ध पुरुषांकडून प्रार्थनारूप आर्जव केल्यानंतर, नक्कीच थोड्याफार प्रमाणात उपाय वा उपयोग होतो, हे नक्कीच. परंतु त्यातून बरेचवेळा, मूळ समस्या या कायमस्वरूपी सुटत नाहीत. 

कारण जोपर्यंत आसक्ती आणि ओढ शिल्लक आहे, तोपर्यंत कोणताही उपाय वा उत्तर हे तात्पुरतं आहे आणि असेल. याचं महत्वाचं कारण म्हणजे, आसक्ती व ओढ यामुळे एक उत्तर दुसऱ्या प्रश्नाला जन्माला घालतं आणि ही साखळी अविरत सुरू राहून, जन्मोजन्मीच्या एका सूत्रबद्ध शृंखलेला जन्म देत राहते. ही शृंखला पुन्हा पुन्हा जन्माला येण्यासाठी, जीवाला बद्ध करत जाते. 

यावर कायमस्वरूपी उपाय काय असा एक प्रश्न निर्माण होतो. त्याचं उत्तर म्हणजे, ही आसक्ती व ओढ जसजशी कमी होत जाईल, तसतशी जीवाला गुंतवणारी ही शृंखला तुटत जाईल. मूळ समस्या या मनाला घाबरवते, ज्यामुळे मन सतत नमन अर्थात त्या समस्येपुढे लीन राहतं त्यामुळे त्याच्या विचारात अविरत मन त्याच गोष्टींचं स्मरण करत राहतं. 

स्मरण्याचा आणि चिंतनाचा नियमच आहे की, ज्या गोष्टींचं मन नित्य स्मरण करतं, त्याच गोष्टी फलस्वरूपात प्राप्त होतात. त्यामुळे प्रत्येक समस्या समाधान देताना, पुढील प्रश्नाला जन्म देते. हे मनाचं नित्य अडकत जाणं, मनाला नित्य त्या स्मरण मार्गावर ठेवतं. यात अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे, विनाशी व नष्ट होणाऱ्या गोष्टींची अभिलाषा, तात्पुरत्या सुखांना वा आनंदाला जन्म देतात आणि या ब्रह्मांडात, या ब्रह्मांडाशी निगडित कोणतीही गोष्ट, विनाश पावणारी अर्थात नष्ट होणारी आहे. 

याचा अजून खोलात जाऊन विचार करूया, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत नित्यनवीन ज्ञान, आनंद देणाऱ्या नामस्मरणात रममाण राहू. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...