भोग आणि ईश्वर ३५४
आत्मबुद्धी व आत्मनेत्र ही, मन आणि आत्मा यांच्या संयोगा तून किंवा दृढ संबंधातून प्राप्त झालेली देणगी आहे. हा समसमा संयोग महदभाग्याचा योग आहे. योग म्हटल्यावर त्यामागे काही कर्म, प्रयत्न, प्रयास, साधना, तप इत्यादी असणारच. कारण योग हे कर्माशिवाय प्राप्त होत नाही आणि प्रयासाशिवाय शक्य होत नाही.
योग: कर्मसु कौशलम हे भगवद्गीतेत स्वतः भगवंतांनी सांगितलं आहे. ज्याचा अर्थ, योग म्हणजे कर्मातील कौशल्य. म्हणजेच कोणत्याही कर्मात जाणीवपूर्वक व प्रयत्नपूर्वक कौशल्याने केलेलं कर्म म्हणजेच योग आहे. त्यामुळे आत्मबुद्धी जागृत होण्यासाठी निश्चित कर्म व प्रयास अत्यंत जरुरी आहे. त्यामुळे साधना वा तप आचरण हा याचा प्राण आहे.
इथे एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवली पाहिजे की आत्म बुद्धी ही जागृत व्हावी लागते, याचा अर्थ ती असते. कारण जागृती वा जाग त्याच गोष्टीला येऊ शकते जी, मुळात अस्तित्वात आहे. कारण जागृत तीच गोष्ट होऊ शकते जी निद्रिस्त आहे, पण मुळात आहे. म्हणजेच आत्मबुद्धी ही आत्मा अस्तित्वात येतो किंवा परमांशा पासून विलग होतो त्यावेळीच, आत्मतत्वाचा तो अविभाज्य भाग असतो.
इथे एक उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल. अमिबा या एकपेशीय प्राण्याबद्दल आपण शाळेत वाचलं आहेच. तो स्वतःच्या एका अंशातून दुसरा एकपेशीय जीव तयार करतो. प्रथम त्याचा केंद्रक विभागला जातो आणि तद्नंतर नवीन एकपेशीय अमिबा तयार होतो. परम अंशातून ज्यावेळी एक आत्मतत्त्व विलग होते, त्यावेळी मूळ परम आत्म्याचे सर्व गुण या अंशरूप आत्मतत्वात असतातच.
फक्त त्यांचं प्रकटीकरण विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून आहे. म्हणजेच आत्मनेत्र जागृत होऊन, त्या माध्यमातून आत्मबुद्धी जागृत होण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण व्हावी लागते. ती परिस्थिती निर्माण होण्यासाठी मनाची एकाग्रता व संयम साधून मनाला स्वतःच्या अंतरंगात डोकवायला लावण्याचा प्रयास करणं खूप महत्वाचं आहे.
असा प्रयास करण्याची बुद्धी होण्यासाठी ईश्वरी व सद्गुरु कृपा होणं अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तीची स्वतःची इच्छा असावी लागते, त्या इच्छेच्या जागृतीसाठी पुन्हा कृपायोग असावा लागतो. या सर्व योगांसाठी काय काय आवश्यक आहे आणि मानव काय करू शकतो हे, पुढील भागात पाहूया. पण यासाठी आवश्यक नाम मात्र नित्य सुरू ठेवूया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment