भोग आणि ईश्वर ३५९
एक समज आहे की, निर्गुणाची उपासना म्हणजे अप्रकट चैतन्यशक्तीची उपासना. पण खोलात जाऊन याचा गुह्यार्थ पाहिला तर, वास्तविक जे अप्रकट वाटतं ते प्रकट आहेच. कारण चर्मचक्षुना जे दिसत नाही ते नाहीच, हे प्रमेय म्हणजे एक प्रकारे माया आहे किंवा आभास अथवा illusion आहे. कारण चर्मचक्षुना न दिसणाऱ्या आणि देहातील ज्ञानेंद्रियांना न जाणवणाऱ्या अनेक गोष्टी अस्तित्वात आहेत, हे नक्की.
ज्ञान आणि ज्ञान ग्रहणाची इंद्रियव्यवस्था देताना विधात्याने द्विस्तरीय व्यवस्था केली आहे. ही द्विस्तरीय व्यवस्था म्हणजे काय. देहातील ज्ञानेंद्रियांना सगुण ज्ञान ग्रहणाची शक्ती प्रदान करून, देह आहे तोपर्यंत ज्ञानार्जन व ग्रहणाची शक्ती कार्य करेल याची व्यवस्था विधात्याने केली. हे सर्व ग्रहण केलेलं ज्ञान मेंदूत व मनात साठवून ठेवण्याची व्यवस्था केली.
मेंदूतील ज्ञान हे मृत्यूपर्यंत राहील याची व्यवस्था करून, विधात्याने त्या त्या भावनेची बीजं, मनातील शक्तिकेंद्रात निर्माण केली आहेत. म्हणजे दृश्य वा प्रसंग ज्ञानेंद्रियांना दिसतं वा जाणवतं, पण भाव आणि भावना मनातून व्यक्त होतात. आता या ठिकाणी असं म्हणता येईल का की, भावना किंवा इमोशन्स निर्गुण निराकार होत्या. नाही, असं म्हणता येणार नाही.
कारण एखाद्या दृश्याने प्रसंगाने त्या शक्तिकेंद्रावर आघात वा स्पर्श होऊन, ते अमूर्त वा अप्रकट भाव मूर्त रुपात देहातून प्रकट होतात. म्हणजेच सगुणत्व हे निर्गुणात दडलं आहे, असाच याचा अर्थ आहे. पण मनात अस्तित्वात असलेली शक्तिकेंद्रे ही या द्विस्तरीय व्यवस्थेतील दुसरा स्तर आहे.
ही द्विस्तरीय व्यवस्था कशासाठी करण्यात आली. याचं महत्वाचं कारण म्हणजे, देहाची ज्ञानेंद्रिये, फक्त सगुण तत्व जाणतात व ओळखू शकतात. पण ईश्वराचं निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूप अस्तित्व समजायला जाणायला व जाणवायला मनाची ज्ञानेंद्रिय गरजेची आहेत. कारण ज्या अप्रकट गोष्टी वा तत्व आहेत, ती मनातील ज्ञानेंद्रियाद्वारे आत्मतत्वाला जाणवून, त्याद्वारे त्या निर्गुण तत्वाचा बोध, मन व आत्मा याना होतो. यासाठी ही दुसऱ्या स्तराची व्यवस्था करण्यात आली.
मनाला पूर्ण एकाग्र वा एकचित्त करून, जाणिवांना विशाल व अतिसंवेदनशील करून, त्याद्वारे, अवकाशा तील, ब्रह्मस्वरूपाच्या अतिसूक्ष्म स्पंदनलहरी (cosmic waves) प्राप्त करून, त्यातून निर्गुण परब्रम्ह जाणून घेण्यासाठी, ही द्विस्तरीय ज्ञानेंद्रिय व्यवस्था, ईश्वराने विषेशरूपात फक्त मानवी देहाला प्राप्त करून दिली आहे.
यावर अजूनही चिंतन अपेक्षित आहे, पण उद्या. तोपर्यंत आपण भगवतनामात आपलं मन निराकार करण्याचा प्रयत्न करूया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment