भोग आणि ईश्वर ३५५
या ठिकाणी आता आपण जागृती जाणीव इत्यादी गोष्टीबद्दलचं ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. मुळात जाणीव शब्दात जाण येणं वा जाणणं अपेक्षित आहे. जाणणं म्हणजे काय तर एखाद्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त होणं आणि ते प्राप्त झाल्याचं उमगणं वा समजणं. म्हणजेच मी एखाद्या वक्त्याला वा प्रवचनकार यांना ऐकायला गेलो, पण माझं तिथे लक्ष नसेल तर, देहाने किंवा श्रवणेंद्रियाने आपलं काम चोख करूनही, मेंदू व मन यांनी त्या गोष्टींची नोंद न घेताच त्या गोष्टींचं आकलन होणार नाही.
आता इथे ज्ञान म्हणजे एखादी गोष्ट ज्ञानेंद्रियांद्वारे प्राप्त झालेली माहिती वा दृश्य , बुद्धी मन यांनी एकत्रितपणे ग्रहण करून, त्याचा अर्थबोध, मनःपटलावर उमटून तो उमगणं. म्हणजे बुद्धी मन यांचं एकत्रित कार्य आहेच, पण त्याही पलीकडे अर्थबोध होणं ही खरतर, artificial intellegence च्या पलीकडील गोष्ट आहे. म्हणजे जाण, ज्ञान, उमज हे कुठेतरी मनाच्या आभासी पटलावर तरंग निर्माण करून, त्या लहरीतून जो नाद उमटेल तो नाद जाणत जाणं.
म्हणजे ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहेच पण, ती मनाच्या आणि बुद्धीच्या पटलावर, एकत्रितपणे उमटून येते आणि तरच त्याला ज्ञान व जाणीव म्हटलं जातं. पण हे सर्व conscious व sub conscious mind यांमध्ये होणारी प्रक्रिया अजब आणि अद्भुत आहे. त्या प्रक्रियेच्या निर्मात्याला अनंत अनंत नमस्कार, ज्याने ही गुंतागुंतीची अद्भुत प्रक्रिया निर्माण केली.
म्हणजेच एकप्रकारे ही अमानवीय निर्मिती आहे, हे नक्की. या प्रक्रियेची तुलना कदाचित संगणकात घडणाऱ्या प्रक्रियेशी करता येईल. संगणकात सर्व प्रक्रिया ठरवून दिलेल्या प्रोग्रॅम नुसार घडते. इथे त्या प्रोग्रॅममधील आज्ञावलीशी समोर आलेली माहिती वा घटना पडताळून त्यानुसार योग्य तो अहवाल किंवा निकाल दिला जातो.
पण संगणक आणि मानवी ज्ञान प्रक्रियेतील मुख्य भेद म्हणजे, संगणकात आज्ञावलीनुसारच सर्व घडतं आणि आज्ञावली बाहेरील गोष्टी वा आज्ञा या नाकारल्या जातात. पण मानवी जाणीव व ज्ञान या प्रक्रियेत आज्ञावली नसून, बुद्धी, मन यानुसार कार्य होतं. प्रक्रिया नक्की काय घडते हे कळत नाही, पण जाणीवा व ज्ञान जागृत होऊन, अनेक अनाकलनीय गोष्टी उलगडतात, समजतात.
यावर अजून खोलात जाऊन चिंतन करूया, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत नामाचा रोजचा परिपाठ सुरूच ठेवूया.
आजच माझ्या मुलीचा शुभविवाह संपन्न झाला, त्यामुळे वरील गुंतागुंतीची प्रक्रिया, उद्या सखोलपणे पाहू.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment