भोग आणि ईश्वर ३६३
खरतर भोगांच्या काळात माणसाची बुद्धी व लक्ष हे पूर्ण पणे त्या काळावर वा त्यातून बाहेर पडण्यावर केंद्रित असतं. खूपवेळा आपण, ज्या घटनेने हा भोगांचा काळ सुरू झाला, त्या घटनेच्या धक्क्यामुळे, विचारहीन होऊन, त्या दुःखाच्या वाऱ्याबरोबर मती व मनसुद्धा भरकटवू देतो. अनेकदा आपण देव, दैव, नशीब, प्रारब्ध यांना दोष देऊन देवाच्या अस्तित्वावरसुद्धा मनातल्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
इथे मुळातच दृढपणे मनात धरण्याची एक गोष्ट म्हणजे आपल्या जन्माआधी जग होतं आणि आपल्या जन्मानंतर सुद्धा जग असणार, जसं ते आपल्या पूर्वजांच्या गमना नंतरसुद्धा सुरळीत सुरू आहे. म्हणजे या जगाला चालवणारा कोणी, मानव नक्कीच नाही अन्यथा इतके घातक असुर येऊनसुद्धा या जगाचं कोणीही काहीही वाकडं करू शकलेलं नाही आणि इतक्या मानवी पिढ्या येऊन गेल्या तरीही हे जग सुरूच आहे.
म्हणजे जर तसा कोणी आहे, जो हे जग चालवत आहे आणि त्याची काही विशिष्ट नियमावली आहे, ज्यावर आधारित हे जग, सुत्रबद्धतेने चाललेलं आहे, तर मग या सुत्रांना वा तत्वांना किंवा नियमांना धरूनच सर्व गोष्टी होणार. दुसरं असं की, समस्त ब्रह्मांडाचा विचार बाजूला ठेवून, फक्त या पृथ्वीचाच विचार जरी केला, तरी इतक्या असंख्य योनीतुन आपण मानव योनीत जन्माला आलो.
त्यातही भारतासारख्या सनातन धर्मसंस्कृतीचं माहेरघर असलेल्या देशात आपण जन्मलो. त्यातही, सारासार विचारांची मनाची जडणघडण आपल्याला लाभली, याचाच अर्थ आपलं प्रारब्ध व या जन्मातील कर्म, या आधारे आपण नक्कीच चूक व बरोबर यांचं मूल्यमापन करण्याच्या स्थितीत आहोत. आपण त्याचा सदुपयोग करतो, दुरुपयोग करतो की दुर्लक्षित करतो हे आपल्या संचित व कर्मफल यानुसार आपल्या बुद्धीला प्रेरित करेल आणि आपण तसा निर्णय घेऊ.
पण जो निर्णय घेऊ त्यामध्ये दोन मार्ग असतील. मगाशी मी भोगांच्या कार्यकाळाचा उल्लेख केला, त्याच उदाहरणाला पुढे नेऊन हा मुद्दा समजून घेऊ. भोगांच्या काळात आत्मबल जसं असेल, त्यानुसार निर्णय घेण्याची प्रेरणा मनुष्याला होईल किंवा होते. म्हणजेच सदैव दोन मार्ग उपलब्ध असतातच. पण आत्मबल दृढ आणि प्रेरणा दायी असेल, तर योग्य विचाराने व विवेकाने प्रेरित होऊन निर्णय घेतले जातात.
पण आत्मशक्ती क्षीण वा कमजोर असल्यास किंवा कमजोर झाल्यास, निर्णय हे काळाचा, मायेचा, दुःखाच्या आघाताचा जसा प्रभाव असेल, त्यानुसार घेतले जातात. हा झाला दुसरा मार्ग. म्हणजे मार्ग दोन हे केंव्हाही अस्तित्वात असतातच. पण आपण स्वआत्मप्रेरणा किंवा इतर घटक यांच्या प्रभावाने योग्य व अयोग्य, असे दोन पैकी एक निर्णय घेऊन मोकळे होते.
दुःखाच्या काळात विशेषत्वाने ध्यानात घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे सद्विचार विवेक व आत्मबल यांना कधीही सोडता कामा नये. दुःखाच्या भावनेच्या भरात आपण चुकीचा विचार करून, चुकीचे निष्कर्ष काढून चुकीचे निर्णय घेतो. प्रत्यक्ष दुःखाचा काळ हा थोडा असतो, पण अविचार, अविवेक यांमुळे त्यांचे परिणाम आपण दीर्घ करतो.
कारण पूर्वकर्माने, पूर्वऋणाने व पूर्वबंधनाने प्राप्त दुःख भोग हे फलस्वरूप आहे. पण त्यावर चुकीचा विचार करून आपण, आपलं सद्यकर्म चुकवून, हे कर्मफल परिणाम अजून पुढे नेऊन, पुढे येणारी किंवा त्या काळात प्राप्त सकारात्मक व चांगली कर्मफलं पाहात नाही आणि त्यांचा विचारही करत नाही.
यावर अजून आत्मचिंतनाची आवश्यकता आहे, म्हणून उद्याच्या भागात यावर विचार करूया. तोपर्यंत नामाने आत्मबल वृद्धी करून घेण्याचा प्रयत्न करूया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment