भोग आणि ईश्वर ३००
आज ३०० दिवस झाले. १, डिसेंबरला एक शीर्षक, एक विषय आणि त्या विषयासंदर्भात अनेक मुद्दे,गोष्टी,प्रश्न, समस्या,माहीती आणि ज्ञान यांचा संपूर्ण परामर्ष घेण्याच्या उद्देशाने लिहायला सुरुवात केली आहे. हे कधीपर्यंत चालेल आणि किती लेखात संपेल, हे माझे सदगुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जाणतात. पण त्यांची इच्छा आणि प्रेरणा आहे तोपर्यंत हे सुरू राहील, हे नक्की.
लेख क्रमांक २९८ मध्ये भीष्मांच्या मागील जन्मासंदर्भात आणि त्याचा, त्यांच्या या जन्मातील, शरपंजरी होण्याशी संबंध आपण पाहिला. खरतर भीष्मांना मागील सर्व जन्म लक्षात असूनसुद्धा, जी गोष्ट किंवा या जन्मातील फल व त्याचा शंभर जन्म मागे, त्यांच्या हातून चुकून घडलेल्या, कर्माशी असलेला संदर्भ वास्तविकपणे श्रीकृष्णाच्या स्मरणातून प्रकट झाला किंवा समोर उघड झाला.
याचं मुख्य कारण म्हणजे श्रीकृष्ण परमज्ञानी असल्या मुळे आणि प्रत्यक्ष परम ईश्वर असल्याकारणाने, सर्व भूत वर्तमान व भविष्य जाणत होते. म्हणून कर्मफलांचं जे ज्ञान व समीकरण त्यांनी नुकतंच युद्धाच्या पहिल्या दिवशी प्रकट चिंतनातून, गीतेच्या स्वरूपात, अर्जुनाला कथन केलं, त्याचंच उत्तम उदाहरण म्हणून युद्ध संपल्या नंतर, भीष्मांच्या शंकेसंदर्भात परामर्ष घेताना , श्रीकृष्णांनी भीष्मांसह संपूर्ण जगताला, दाखवून दिलं.
म्हणजे कथन आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण, तिथल्या तिथे अठराव्या दिवशी, श्रीकृष्णांनी अर्जुनासह सर्वांना, अर्थात आपल्यालासुद्धा सांगितलं, जेणेकरून कुठेही कथन आणि त्याबद्दलची सिद्धता यात अंतर राहणार नाही. पण यातून जे दोन मुद्दे प्रकट होतात त्यावर विचार करूया. पण मधेच कालच्या भागात, अनेकांच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी, ज्या या जन्मातील कर्माशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाहीत त्याचे परिणाम मात्र, याच जन्मात, याच देहाला का भोगावे लागतात, याचा संबंध भीष्मांच्या या उदाहरणाशी कसा संबंधित आहे, हे लक्षात येण्या साठी मधेच कालच्या भागात, त्याबद्दल दीर्घ विवेचन केलं.
आता श्रीकृष्णांनी कथन केलेला कर्मफलाचा संबंध आणि त्यातून प्रकट होणारे दोन मुद्दे कोणते ते पाहूया. एक म्हणजे कर्मफल सोयीने भोगता येतं आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष भीष्मांनासुद्धा कर्मफल, थोपवून ठेवता आलं,पण टाळता आलं नाही आणि श्रीकृष्णसुद्धा ते टाळू शकले असते, पण तरीही, त्यांनी, ते टाळले नाहीत. या दोन्ही मुद्द्यावर चर्चा करूया.
मुळात कर्मफल पक्व होऊन, आपल्या मालकाकडे परत येतं, तेसुद्धा विशिष्ट कालावधीतच. यात कोणतीही दिरंगाई वा ढिलाई होत नाही. म्हणजे क्ष वेळेवर घडलेलं कर्म, क्ष अधिक काही निश्चित काळ, अश्या अचूक वेळे वर पुन्हा, मूळ कर्मदात्याकडे परत येतं. मागील एका भागात आपण पाहिलं आहेच की हाच सृष्टीचा नियम आहे की प्रत्येक कर्म वा कृती, तितकाच आणि तसाच उलट परतावा कर्मकर्त्याला देतं. म्हणजेच every action has equal and opposit reaction. म्हणजेच आपल्याच पूर्वजांनी सांगितलेलं व ईश्वराच्या मुखातून आलेलं आणि कालातीत सत्य असलेलं वचन, न्यूटनने तिसरा नियम म्हणून जगाला सांगितलं.
म्हणजे हा सृष्टीचा नियम आहे की केलेलं प्रत्येक कर्म अर्थात action, आपल्या लक्षावर आदळून, आपटून वा लक्षाला स्पर्श करून , पुन्हा त्या कर्मकर्त्याकडे, त्याच वेगात परत येतं. हा नियम मानवाच्या, नव्हे संसारातील वा ब्रह्मांडातील कोणत्याही सजीव वा निर्जीव गोष्टीला लागू होतो. एखादा चेंडू भिंतीकडे फेकला की तो तितक्याच वेगाने किंबहुना थोडा अधिक वेगाने मागे येतो.
तो पुन्हा फेकणाऱ्याकडे येईल किंवा दुसरीकडे जाईल, हे फेकणाऱ्याच्या कृतीवर अवलंबून आहे. पण मागे येईल हे नक्की. आता त्याचा वेग, परतावा, दिशा हे सर्व फेकणाऱ्याचा कोन कसा आहे, यावर अवलंबून आहे. म्हणजे मध्यातून फेकला तर समोर फेकणाऱ्याच्या दिशेनेच येईल. पण भिंतीकडे तिरका उजवीकडे फेकला तर त्याचा परतावा डावीकडे असेल आणि याचप्रमाणे उलट होईल.
या सर्वाचा कसा काय संबंध, कर्मफल, त्याच्या परताव्याच्या काळाशी आहे आणि त्यातून काय अर्थ घ्यायचा यावर उद्या चर्चा करूया. पण नामाचा आपला नियम वा नेम पाळूनच.
प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०) २५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख आहेत.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
Comments
Post a Comment