भोग आणि ईश्वर ३०५
माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.
चेंडूला दिलेल्या फिरकीप्रमाणेच, हवेतील इतर घटक जसं वातावरण, वारा, बाष्प इत्यादी, चेंडू भिंतीकडे जाताना आणि भिंतीला आपटून परत मागे येताना, असं दोन्ही वेळा, त्याच्या गती व दिशेला मदत किंवा अडथळा करू शकतात, हे साधं विज्ञान आहे. ही सृष्टीतील सर्व गोष्टी घडवताना, विधात्याने, प्रत्येक गोष्ट, म्हणजे अणुरेणू, हे वैज्ञानिक आधारावर बनवले किंवा योजले आहेत. अर्थातच हा नियम, या सृष्टीत घडणाऱ्या प्रत्येक दृश्य आणि अदृश्य गोष्टीला लागू होतो.
या जगतात घडलेलं कर्मसुद्धा या नियमातून वाचू शकत नाही. म्हणजे कोणतंही कर्म घडल्यानंतर इष्ट शक्तीकडे जाताना आणि तिथून कर्मफलात परिवर्तित होऊन, पुन्हा कर्त्याकडे येताना, मार्गातील, त्या भावाचे अथवा विरुद्ध भावाचे कारक, सहाय्यक व रोधक त्या कर्माला जाताना आणि येताना, अस दोन्हीवेळेला, सहाय्य अथवा बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यातून निर्माण होणाऱ्या घर्षणातून त्या कर्माची आणि त्या कर्मफलाची तीव्रता, गती व दिशा यात बदल होईल.
आता हा बदल इष्ट की अनिष्ट यावर, त्या त्या कर्माची व कर्मफलाची वृत्ती व व्याप्ती निश्चित होईल. मागच्या परिच्छेदात तीन शब्द आले, कारक, सहाय्यक आणि रोधक. आता त्यांचा विस्तृतपणे विचार करूया. हे तीन घटक म्हणजे मुख्यतः आपल्या संचितातील धनभार वा ऋणभार म्हणजे जमा किंवा खर्च, या जन्मातील कर्माच्या फलांची जमा वा त्यांचा भार, आपली मनोवृत्ती म्हणजेच सकारात्मकता वा नकारात्मकता हे सर्व म्हणजे कारक, सहाय्यक व रोधक.
म्हणजे असं बघा की, आपण फेकलेला तो चेंडू, आपण त्याला दिलेल्या गती व दिशेनुसार निघेल हे नक्की. पण निघताना आणि भिंतीकडे जाताना, त्याला हवेतील इतर बलं वा शक्ती, इतर मार्गाला किंवा दिशेला ढकलण्याचा प्रयत्न करतील. त्याच प्रमाणे त्याच्या वेगाला परावर्तित किंवा परिवर्तित करतील. परावर्तित म्हणजे गतीत बाधा आणि परिवर्तित गतीत वाढ. याच नियमाने आपण जमा केलेल्या संचितातील घटक, या जन्मातील त्यात झालेली वाढ किंवा घट, मनाच्या त्यावेळच्या स्थितीतील बल यावर ते कर्म इष्ट शक्तीकडे कशाप्रकारे जाईल हे ठरेल.
आता मुख्य मुद्द्याकडे वळूया. म्हणजे आपण मनात केलेला विचार वा एखादं कर्म, वर सांगितलेल्या सर्व घटकांतून जाऊन आपल्या फलार्थ सिद्ध होईल. म्हणजे आपण रागाच्या भरात केलेली एखादी कृती वा बोलणं किंवा नुसता विचार, एकदा निघाला की, त्यावर हे सर्व घटक कार्य करूनच ते फलदायी होईल. म्हणजे वृत्ती शांत, विचार स्थिर आणि मनाची स्थिती नेहमी सकारात्मक असण्याचं महत्व, यातून किती प्रकर्षाने जाणवतं किंवा सिद्ध होतं.
मनाची स्थिती, अवस्था, विचारांची गती व दिशा, बुद्धीची स्थिरता, हे सर्व बाह्य मनाप्रमाणेच अंतर्मनावर अवलंबून आहे. यावर अजून खोलात जाऊन उद्या विचार करूया, पण नामाच्या कर्माने आपलं मन सकारात्मक ठेवण्याचा, आपला प्रयत्न, आपण सुरूच ठेवू. सद्गुरुकृपा त्यात नक्की यश देईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्या मुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
Comments
Post a Comment