भोग आणि ईश्वर २९७
वास्तविक अर्थाने व दृष्टीने पाहिलं आणि सांसारिक दृष्टी बाजूला ठेवली तर, एक नक्की जाणवतं, की जितका मळ वा मैला जास्त, तितकी शुद्धीकरणप्रक्रिया जास्त जरुरी असते. म्हणजेच एक अर्थ यातून , जो निघतो, तो सर्व अर्थाने कर्मसिद्धांतज्ञान याच्याशी सहज जुळतो. कसा ते पाहू. ज्याला आयुष्यात जास्त त्रास, भोग, दुःख भोगावं लागतं, त्यांचं पूर्वकर्म अत्यंत घोर असतं, त्या कर्मफलांचा परिणाम म्हणून हे असं खडतर आयुष्य वाट्याला येतं.
आता शुद्धीकरणाच्या दृष्टीतून विचार केला, तर हे जाणवेल की, भोगप्रद, अनिष्ट कर्मामुळे त्यांच्या आत्म्यावर मागील जन्मातील कर्माची जी पुटं वा काजळी जमली आहे किंवा असेल, ती या जन्मातील फक्त सत्कर्मानी धुतली जाणार नाही. म्हणून ते भोग, दुःख हे सर्व भोगूनच, त्यांना ती शुद्धीप्रक्रिया पूर्ण करत करत पुढे जाणं गरजेचं आहे. अर्थात सत्कर्म दान आदी पुण्यकारक गोष्टी गरजेच्या आहेतच, पण पुरेश्या नाहीत.
म्हणजेच जेंव्हा या सर्वांतून ते या जन्मात जातील आणि या जन्मात पुनः अनिष्ट कर्मांचा पसारा उभा केला नाही, तर पुढील जन्मात आत्मोन्नती व आत्मउद्गार हा नक्कीच साधला जाईल.,कदाचित या जन्मातसुद्धा साधू शकेल, पण ते संचितावर अवलंबून असेल. यातून एक नक्की की, कर्म सिद्धांतानुसार बघा किंवा या आत्मशुद्धीच्या दृष्टिकोनातून बघा, प्रमेय हेच मांडता येईल की, सुख आणि दुःख ही कोणीही तुम्हाला अडकवायला किंवा मुद्दामहून त्रास द्यायला निश्चितच करत नाही. तर ती एक आत्मशुद्धी प्रक्रिया आहे. त्याला त्याच अर्थाने स्वीकारून, त्यातून सुखरूप बाहेर पडून, शुद्ध होत होत आयुष्याच्या वाटेवर पुढे जाणं, हेच योग्य व अपेक्षित कर्म, सद्यस्थितीत व या जन्मात आहे, हे नक्कीच.
हा नियम वा सिद्धांत सर्वांना लागू होतो का. तर , हो, नक्कीच. कारण प्रत्येक कर्मात कर्मबद्धता, प्रत्येक जीव, निर्माण करत असतो. त्या कर्माबद्धतेतून निष्ट वा चांगल्या कर्माचं फल हे शुद्धीसाठी आणि अनिष्ट वा वाईट कर्मांची फलं, घर्षणाचं माध्यम म्हणून विधात्याने त्याच्या जन्ममृत्यू साखळीत गोवलेलं आहे. हेच सर्व संत महंत यांनी वेगवेगळ्या भाषेत वा शैलीत सांगितलं आहे. फक्त इतक्या स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात काल बंधनामुळे, सांगितलं नसेल, किंवा त्याचा उचित मतितार्थ जनसाधारण समजतील किंवा त्यांनी तो समजावा असं, त्यांनाही कुठेतरी वाटलं असेल.
म्हणूनच सुख आणि दुःख एकसमान माना हा घोष, प्रत्येक महान व्यक्ती वा संत महंत यांनी पदोपदी आर्जवून सांगितलं आहे. ते आता ध्यानात असू द्या. याला अजून एक कोन आहे, तो म्हणजे ज्यावेळी आपण सुखात हरवून व हरखून जातो आणि दुःखात कोमेजून जातो, त्यावेळीं मायेचा प्रभाव सुरू होतो. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत जेंव्हा, आपण संयम वा मर्यादा सोडतो, त्याक्षणी माया आपल्या मनाचा ताबा घेते. मायेचा हा
खेळ अजब आहे आणि तो कधी कुठे घात करेल हे भगवंत सुद्धा जाणत नाहीत.
माया ग्रासते म्हणजे काय होतं, तर आपण या शुद्धीप्रक्रियेतून जात असताना, त्यावेळी अपेक्षित कर्मांच्या विरुद्ध अर्थाने कर्म करून, अजून अजून अडकत जातो. मुळात या प्रक्रियेतून जाताना , म्हणजेच कोणतंही शुद्धीकर्म होत असताना, त्यात बाधा येईल असं चुकीचं कर्म न करणं. कारण त्यामुळे शुद्धी करण प्रक्रिया निरर्थक होतेच.पण आपण अजून अजून काजळी चढवत जाऊन, प्रक्रिया साखळी लांबवतो.
म्हणजे या काळात अपेक्षित आहे की सर्वात प्रथम आपण मनातून किल्मिष, गैरहेतु वा गैरअर्थ काढून टाकले पाहिजेत. ही शुद्धीकरण प्रक्रिया आहे आणि आत्मशुद्धीसाठी मला यातून जाण्याशिवाय पर्याय नाही. हे सुद्धा मनात ठसवून ठेवावं की, यात माझंच भलं आहे आणि ही प्रक्रिया माझ्यासाठी गरजेची आहे. विशेष करून दुःख व भोग या काळातच मनाचा तोल जाऊन, मार्गभ्रष्ट होण्याचा धोका जास्त असतो. म्हणून चूक होणार नाही यासाठी, अश्या काळात जास्त जागृत असणं, अति आवश्यक आहे.
याच विषयावर अजून चिंतन करूया,पण उद्याच्या भागात. तोपर्यंत नाम हेच उत्तम माध्यम आहे, मनाचा तोल सांभाळण्या साठी, हे ध्यानात असू द्या.
प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०) २५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख आहेत.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
Comments
Post a Comment