Skip to main content

भोग आणि ईश्वर २२६

भोग आणि ईश्वर  २२६

चित्त एकाग्र करून , त्या चित्ताला आपण आपल्या इप्सिताच्या पूर्ततेसाठी, कार्यार्थ सिद्ध करू शकतो, हे अभ्यासातून सिद्ध करणारे ते ज्ञानी अर्थात मुमुक्षु. या सर्व प्रक्रियेची सिद्धता, त्याचा मार्ग, ते साध्य करण्याच्या मार्गातील अडीअडचणी, त्यांना पार करण्याचे वा टाळण्याचे मार्ग हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचलं तेच मुळात या सुरवातीच्या साधक वा संशोधक सिद्धपुरुषांमुळे.

या चित्त स्थिर ठेवून, त्यातून निर्माण होणाऱ्या लहरीं मार्फत आपल्या इप्सितातील इष्ट ध्येयापर्यंत पोचण्या साठी हे चंचल मन कुठेतरी एखाद्या लक्षावर वा ध्येयावर किंवा एखाद्या निश्चित स्वरूपावर केंद्रित करून, त्यामार्गे चंचल मनाला कार्यप्रवृत्त करणं हा एक मोठा योग आहे. तो साधण्यासाठी काही क्रिया व प्रक्रिया शोधण्यात आल्या. त्या क्रिया व प्रक्रिया सहजभाषेत लिहून त्यांना यौगिक क्रिया असं नाम देण्यात आलं. 

अश्या या यौगिक क्रियांनी, अस्थिर मनाला आधी स्थिर करून, त्यानंतर त्याला एका स्वरूपावर केंद्रित करून, त्या एकाग्रतेतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा, चैतन्याचा उपयोग या जगतापार असलेल्या आणि मानवी देहासह, संपूर्ण सृष्टी आणि ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या,  विश्वाच्या कारकाकडे वळवून त्या मनाला त्या कारकाच्या समीप नेण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच अध्यात्मिक मार्ग अवलंबणं. 

मन ही अशी गोष्ट आहे, जिला काहीतरी उद्देश ध्येय देत असताना, ते ध्येय वा उद्देश चित्रस्वरूपात समोर असेल तर सुरवातीला अस्थिर मनाला एकाग्र व्हायला, त्याचा जास्त उपयोग होतो, किंवा ती स्थिरता लवकर साध्य होते. यातूनच ईश्वराची सगुणरूपातील संकल्पना चित्र आणि चित्रसदृश लिपीबद्धता अर्थात नाम हे समोर आलं. 

खरतर नाम हेदेखील त्या, जगताबाहेरील शक्तीचं चित्ररूपातील सादरीकरणच आहे. कोणत्या ना कोणत्या रूपातील हे सादरीकरण, म्हणजेच ज्या शक्तीचं मुळस्वरूपच माहीत नाही, त्याला सगुणात अर्थात निश्चीतस्वरूपात मांडणं आहे. कारण निर्गुण आणि निराकार असं म्हटल्यावर मन कसलीच कल्पना करू शकत नाही आणि आपण जाणतोच की, मन हे कुठल्यातरी दृश्य कल्पनेनेच प्रेरित होऊ शकतं वा प्रेरित करता येऊ शकतं. 

म्हणून मनाला त्या एका प्रतिमेवर किंवा नामावर स्थिर व्हायला लावणं म्हणजे चित्ताची स्थिरता साधणं. विचार करा, एखाद्या फिरत्या लंबकावर मन स्थिर करताना आधी नजर त्या लंबकावरील एखाद्या बिंदूवर स्थिर करण्याचा नित्य अभ्यास करणं जरुरी असतं. त्या नंतर त्यात प्राविण्य मिळू शकतं. हे प्राविण्य किंवा प्रभुत्व मिळवायला डोळे आणि लंबक या अस्तित्वात असलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे तिथे मनाला डोळ्यांच्या माध्यमातून स्थिर होण्याचा मार्ग उपलब्ध आहे. 

पण जिथे दृश्यात नसलेली वा आपण न पाहिलेली, पण जगताच्या अस्तित्वाचा कारक असलेली ईश्वर या  नावाची, अदृष्य स्वरूपातीळ संकल्पनेवर मनाला स्थिर व्हायला लावताना, त्या संकल्पनेवर मनाचे नेत्र अर्थात आसक्ती वा ओढ यांना घेऊन जाणं गरजेचं आहे. हे घेऊन जाणं वा ओढ लावणं त्या गोष्टीवर ठाम विश्वास असल्याशिवाय होऊ शकत नाही. 

कारण मनाला काही निश्चित संकल्पना लागतात, सुरवातीला स्थिर व्हायला. एकदा स्थिरता प्राप्त झाली की, मन या एकग्रतेच्या अभ्यासाचा उपयोग, कोणत्याही लक्षावर स्थिर होण्यासाठी करू शकतं. म्हणून प्राथमिकतेत त्या लक्षाचं निश्चित असणं जरुरी आहे. ते प्रतिमारुप वा नामरूप ध्येय समोर असल्यावर, मनाला तिथे आसक्ती वा ओढ निर्माण करायला, तिथे विश्वास वा श्रद्धा निर्माण होणं गरजेचं आहे.

अशी श्रद्धा वा विश्वास तेंव्हाच निर्माण होऊ शकते जेंव्हा ष्ठा स्थापित होणे अर्थात नितिष्ठते करणे शक्य होईल. म्हणजेच निष्ठा ही विश्वास व श्रद्धा यांची प्रथम पायरी आहे. आता वरील विवेचनावरून हे लक्षात येईल की आपल्या नामावर श्रद्धा व विश्वास येण्यासाठी त्यावर निष्ठा असणं का जरुरी आहे. तरीही निष्ठा म्हणजे नक्की काय हे उद्याच्या भागात बघूया. पण तोपर्यंत आपलं कर्तव्य म्हणून का होईना होईल तितकं नाम घेत रहा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१४/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...