भोग आणि ईश्वर २३३
या करोनाच्या काळात मला, एक सर्वोच्च सकारात्मक बाब, जी आज दोन वर्षे जाणवली आणि खरच डोळे भरून आले. कारण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थिती मुळे खूप गोष्टी मूलतः बदलल्या आहेत. सर्वच क्षेत्रात, परीक्षेच्या काळाला, जवळजवळ सर्वजणच सामोरे जात आहेत. त्यामुळे जणू स्थित्यंतराची स्थिती आहे.
अनेक क्षेत्रात गोष्टी बदलत आहे. सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, राष्ट्रीय, व्यक्तिगत पातळीवर वर्षानुवर्षाच्या पद्धती, बदलल्या. त्या बदलांना काही जणांनी सहज तर काही जणांनी नाईलाजाने का होईना स्वीकारलं. स्वीकारार्ह होतं ते स्वीकारून पुढे नेल्या. पण नवीन स्थितीनुसार त्याज्य वा बदलण्यास तयार नसलेल्या गोष्टी, वृत्ती, स्थिती, या टिकणार नाहीत.
ही सर्व स्थिती असताना, भारतीय सांस्कृतिक वारसा असलेल्या, अनेक गोष्टींचा कस हा या काळात लागला. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्यात मोठ्या गोष्टींपर्यंत सर्वच धार्मिक, अध्यात्मिक चालीरीती, पूजा, देवदर्शन इत्यादी सर्वच बाबतीत हा कस लागलाच. पण त्यामुळे भारतीय सनातन सांस्कृतिक चालीरीती, रिवाज, प्रथा, परंपरा या किती लवचिक आहेत आणि आपल्या सर्व धार्मिक प्रथा तयार करताना किती दूरचा आणि सत्ययुगापासून ते कलियुगाच्या अंतापर्यंतचा विचार केला गेला असेल, याचा अंदाज येतो.
आपल्या सर्व संतमहंतांनी, वेद पुराणं, ग्रंथ यांनी ही गोष्ट वारंवार, प्रत्येक युगात, शतकात पदोपदी सांगितली आहे, की अध्यात्माची, आत्मोद्धाराची सुरवात ही देहाचा स्व विसरून, आत्म्याचा स्व ओळखण्यासाठी आहे आणि असावी. परम आत्मा हा अंशरूपात किंवा अणूरूपात हृदयस्थ विराजित आहे. त्याला ओळखून त्याला जागं करायची गरज आहे.
त्यामुळे ते साधण्यासाठी, अंतरात डोकावून, अंतर्मुख होऊन, त्यामार्गे परम ईश्वराला प्राप्त करण्याचं साधलं पाहिजे. त्यासाठी त्याला अंतरातून साद घालता येते. सद्गुरूंची कृपा होण्यासाठी आणि त्यांच्या मार्फत आपलं इप्सित साधण्यासाठी, फक्त आणि फक्त एकच मार्ग ईश्वराने स्वतः सांगितला आहे, तो म्हणजे स्मरण.
हे स्मरण कुठेही कधीही आणि कशाही स्थितीत करता येतं. कदाचित याचीच परीक्षा घेत किंवा सद्यस्थितीत कोण हा मूळ हेतू साध्य करत आहे, याचा शोध काळ करत असेल. आधीच्या परिच्छेदात म्हटल्या मुद्द्यांचा प्रत्यय सध्या येत आहे.
साधकांनी, भाविकांनी आपापल्या साधनेला वर्ष दिड वर्षाच्या कठोर काळात नुसतंच पुढेच नेलं नाही तर, त्याला व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर नवीन माध्यमातून वृद्धिंगत केलं आहे. खरा देव व खरा धर्म हा मनातून साधता येतो, याची जाणीव व शिकवण या भरतभूमीने जगाला शिकवलेलं असल्यामुळे आपण या बदलाला फार लवकर व लवचिकपणे आत्मसात केलं.
याचं सर्वात मोठं उदाहरण हे आषाढी वारीच्या बदलत्या स्वरूपातसुद्धा आज दोन वर्षे झाली, पाहायला मिळालं. उपलब्ध काही व्हीडिओ पाहिले आणि भक्त व भगवंत यांच्या या मनोमिलनाचा प्रत्यय व प्रचिती यात आली. वारीला न जाऊ शकल्याची खंत नक्कीच मनात होती. पण पालखी घेऊन जाणाऱ्या शासकीय गाड्यांवर, रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी करून, फुलं, भंडारा, गुलाल, बुक्का उधळून आणि जाणाऱ्या गाडीला हात जोडून, विठूमाऊलीवर असलेलं आपलं शब्दा पलीकडील अव्यक्त प्रेम, कृतीतून आणि डोळ्यातून व्यक्त केलं.
हे दृश्य पाहून कित्येकांना अश्रू अनावर झाले. भक्त आपल्या भगवंतांवर प्रेम करतो, तेंव्हा काळाची, संकटांची कोणतीही मालिका यामध्ये येऊ शकत नाही आणि ते निर्व्याज प्रेम माऊलीच्या चरणी पोचतच. भले मग प्रत्यक्ष पंढरीला जाता आलं नाही, तरी हे प्रतिका त्मक नमन विठुरायाच्या हृदयी रुजू झालंच.
या सर्व घडामोडी पाहून आणि श्रद्धेचा हा सागर बघून, नक्की खात्री वाटते की, ही सनातन संस्कृतीच या जगताचा स्थायी आधार आहे व असेल. त्यामुळे याच्या मध्ये कोणतंही संकट आडवं येऊ शकत नाही.
म्हणून प्रत्येकाने आपल्या परीने या नामसागरात आपला थेंब ओतत जा, त्याचा महासागर करण्याचं कार्य, सद्गुरू पाहून घेतील. म्हणून नित्य नाम घ्या, नित्य पुण्यसंचय करा. उद्या पुढे बोलू.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments
Post a Comment