Skip to main content

भोग आणि ईश्वर २३२

भोग आणि ईश्वर  २३२

चातुर्मासारंभ म्हणजे दृढ संकल्पाचा, पवित्रतेचा मांगल्याचा आरंभ. कारण शास्त्रीय दृष्टीने हा काळ पावसाळी हवा, खराब हवामान यामुळे पसरणाऱ्या रोगराईचा काळ. पारमार्थिक अर्थाने  असुरी शक्ती, दानवी कामना या सर्वांना पोषक काळ. या खरतर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

म्हणजे आध्यात्म, संस्कृती याकाळाकडे एका दूषित व नकारात्मक शक्तींचा उदयकाळ म्हणून पाहतं. तर वैज्ञानिक दृष्टी या काळाकडे खराब हवामान, त्यामुळे बिघडणारं शरीर व मनस्वास्थ्य या दृष्टीने पाहतं. वातावरणातील बदलाची शास्त्रीय कारणमीमांसा ही भौतिक कारणांवर अवलंबून आहे. ज्याचं पृथक्करण करता येतं आणि त्यासाठी निश्चित कार्यवाहि प्रतिबंधक उपाय व इलाज या स्वरूपात मांडता येते. 

मानव हा मन बुद्धी देह व या सर्वांना चालवणारी आत्म शक्ती म्हणजे या देहात स्थित आत्मा यासर्वांचा संयोग आहे. यातील प्रत्येक घटकाला स्वतःची तहान व भूक आहे. जोपर्यंत यातील प्रत्येक घटक आपली भूक मर्यादित ठेवून वाटचाल करतो, त्यावेळी वा तोपर्यंत सर्व गोष्टी नियंत्रणात राहतात व नियंत्रित करता येतात. 

प्रत्येक घटकाला वास्तविक एक ज्ञानेंद्रिय आहे. जसं देहासाठी अनेक ज्ञानेंद्रिये, बुद्धी, मनासाठी संवेदन शीलता व जाणिवा आणि आत्म्यासाठी जागृती.  या सर्वांची सांगड घालण्यासाठी मन व विचार हा एक लवचिक धागा तयार करण्यात आला. या काळात होणारं दूषित वातावरण, देह बुद्धी, मन आणि आत्मा या सर्वांना आपापल्या परीने ग्रासतं वा ग्रासू शकतं. शरीरासाठी सात्विक खाणं, दोष वाढतील असं अन्न सेवन न करणं हे उपाय प्रचलित करण्यात आले.

बुद्धीसाठी लागणारं, उच्च विचार हे खाद्य,  नियमित मिळावं म्हणून, पोथ्या, स्तोत्र मंत्र यांचा जागर, कथा कीर्तन या माध्यमातून उत्तम, असे सद्विचार कानामार्गे बुद्धीवर पडावे हा उद्देश. वातावरणातील दुषितपणा, पावसाळी हवामान यांनी देह बुद्धी व त्याद्वारे मनावर आलेली मरगळ दूर व्हावी आणि या वातावरणात नकारात्मकता वाढू नये म्हणून मनाला गुंतवून ठेवण्या साठी सकारात्मक लहरी निर्माण करण्यावर भर दिला गेला. 

या सर्व व्रत वैकल्य, पूजाअर्चा, सण भेटीगाठी देवदर्शन हे सर्व मनाचा तोल सांभाळून, मन आपल्या मूळ उद्देशा पासून दूर जाऊ नये यासाठी. म्हणजेच आपल्या पूर्वजांनी केलेल्या या चातुर्मासाच्या व्रताने शास्त्रीय, मानसिक, आत्मिक या सर्व गोष्टींचा विचार करून काही ठोकताळे ठरवून, विचारांची पक्की बैठक आखून दिली. जेणेकरून देह बुद्धी मन हे तिन्ही घटक आपल्या मर्यादा न सोडता वातावरण, षड्रिपु, माया, असुरी व दानवी रूपातील आत्मघातकी शक्ती यांना परस्पर नियंत्रणात ठेवलं जाईल. 

याचं अजून एक कारण म्हणजे, हा काळ दूषित वातावरण असूनही,  जर देह बुद्धी व मन या गोष्टी नियंत्रणात असतील तर, सृजनशीलतेचा आणि उत्तम संकल्प व संकल्पना याना सिद्धी देणारा काळ आहे. याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे, बाहेरील वातावरण फार बाहेर पडायला पोषक नसल्याने आत राहण्याचा वा आत डोकावून बघण्याचा काळ आहे. बघा विचार करून. या काळात करत असलेल्या सण, व्रत, धार्मिक पूजा विधी, स्तोत्र कथा पठण कीर्तन गायन इत्यादींमुळे मन अंतर्मुख होण्यास मदत होते.

याचं कारण म्हणजे या सर्व गोष्टी मनाला भारावून टाकतात. ज्याचा थेट परिणाम सुप्त मनावर काही गोष्टी बिंबवण्यात होतो. म्हणजेच एकाग्रता साधून आपल्या इप्सिताच्या वाटेवर पुढे जायचं असेल आणि मनाचा व आत्म्याचा ठाव घ्यायचा असेल तर हा काळ उत्तम आहे. म्हणूनच संकल्पांच्या सिद्धीसाठी व अंतर्मुख होण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे हे चार महिने. 

बघा प्रयत्न करून, नामाच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी उत्तम काळ आहे. अंतर्मुख होण्यासाठी नाम घ्या, संकल्प पूर्वक नाम घ्या आणि या चार महिन्याचा परिणाम साध्य करून घ्या. उद्या पुढे जाऊया. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२०/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...