Skip to main content

Posts

विश्वास आणि श्रद्धा म्हणजे नक्की काय.

विश्वास आणि श्रद्धा म्हणजे नक्की काय.  © संकल्पना, मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले विश्वास म्हणजे मनाला एखाद्या गोष्टीची वाटणारी.शाश्वती किंवा खात्री, जी मनाला पुढे जाण्यास गती देते. विश्वास हा सहसा दिसणाऱ्या वा अस्तित्वात असणाऱ्या गोष्टीं बद्दल असतो. पण श्रद्धा ही फक्त शुद्ध सात्विक आणि या जगतापार असलेल्या आणि तरीही जगताचा आधार असणाऱ्या, ईश्वर व सद्गुरूरूप चैतन्यशक्तीबद्दल असते. म्हणून जगतात दिसणाऱ्या ईश्वरी अस्तित्वाबद्दल विश्वास असावा आणि त्याच्या न दिसणाऱ्या, पण निरंतर प्रत्ययाला येणाऱ्या, अनुभूतीबद्दल श्रद्धा असावी. विश्वास म्हणजे पुरुष आणि श्रद्धा म्हणजे प्रकृती अर्थात विश्वास हा शिव आणि श्रद्धा ही शक्ती आहे. दोघेही एकमेकांच्या आधाराने असतात. दोघेही एकत्र असावेत अन्यथा दोघेही अपूर्ण आहेत. विश्वास हा आपल्या मनाचा अध्यात्मिक सहभाग आणि श्रद्धा ही ईश्वरीय सहभागाची खात्री समजावी. म्हणजेच आपल्या मनात विश्वास असेल तर, आत्म्याच्या माध्यमातून, ईश्वर तुम्हाला श्रद्धेचा त्याचा सहभाग प्रकट करतो. त्यामुळे विश्वास नसेल तर श्रद्धा दोलायमान असते. पण विश्वास असेल तर, श्रद्धा दृढ असते. अध्यात्म ...

राम अनुज भरत भाग ५८

राम अनुज भरत भाग ५८ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले माता सुमित्रा म्हणाली. " अरे रामा, हे काय करतो आहेस. मातेपुढे हात जोडून, कोणी कधी आर्जव करतो का. अरे का मला पापाची भागी करतोस. जसा माझा लक्ष्मण आणि शत्रुघ्न, तसाच तू सुद्धा आहेस की. जसं तू कर्तव्य श्रेष्ठ मानून, हे करतो आहेस ना, त्याचं तुझ्या कर्तव्यात, आमचा जो काही सहभाग अपेक्षित आहे, तो आम्ही प्रत्येकजण, नक्कीच देऊ. कदाचित नियतीची सुद्धा अशीच अपेक्षा असणार."  माता पुढे म्हणाली.  त्यामुळे, जे काही आपल्या परिवारात, नियती इच्छेने घडलं आहे, घडत आहे आणि यापुढेही घडेल, त्यात प्रत्येक सदस्याचा सहभाग हा नाईलाज म्हणून नसेल तर, तुझ्या कर्तव्य पालनात, आमचा उपयुक्त सहभाग म्हणून असेल. कौसल्या ताईंची कोणतीही चिंता,तू करू नकोस. मी मांडवी, शृतकीर्ती शत्रुघ्न आम्ही आनंदाने, पार पाडू. तुझ्या सुखरूप येण्याची प्रतीक्षा अत्यंत अपेक्षित आणि आतुरतेने आम्ही करत राहू.  परंतु तू या कर्तव्याच्या पथावर,कुठेही,मागचा, परिवाराचा आमच्या निष्ठेचा विचार करू नयेस. हेच सर्व...

राम अनुज भरत भाग ५७

राम अनुज भरत भाग ५७ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले   इतका अभूतपूर्व भाव सोहळा होता, त्या राज परिवारात की, सुमित्रा मातेला राम हा अधिक प्रिय होता आणि कौसल्या मातेला लक्ष्मण अधिक प्रिय होता. अर्थातच त्याची कारणं दोघींच्या दृष्टीने संयुक्तिक होती. राम हा धीर,गंभीर व शांत वृत्तीमुळे जगत प्रिय होता.पण कौसल्या मातेचा, लक्ष्मण हा कायम रामासोबत असल्या कारणाने, पुत्र म्हणूनच स्नेह होता. ज्या भावावस्थेत, परतीच्या प्रवासात, माता सुमित्रा शोक आणि दुःख यांनी ग्रस्त होती.  त्याच भावात माता कौसल्या सुद्धा होती. तिला राम वनवासात गेला याचं आणि चौदा वर्षे, त्याचा मुखचंद्रमा आपल्याला दिसणार नाही, या अतीव दुःख सागराचा डोह, पार करायचा होताच. पण अजूनही एक अत्यंत गंभीर विवंचना होती. ती म्हणजे, राजकन्या आणि राजा जनकांची प्रिय कन्या, दुलारी जनक नंदिनी सीता, कोणत्या अपेक्षेने, राजा जनक यांनी, तिला रामाला अर्पण केली.  पण आपण मात्र, तिला वनात धाडलं, याची अतीव दाहरुप टोचणी, तीक्ष्ण हत्यारा प्रमाणे, मनाला सतत टोचत होती....

राम अनुज भरत भाग ५९ च्या आधी थोडं मनोगत

राम अनुज भरत भाग ५९ च्या आधी थोडं मनोगत श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले या लेखा पूर्वी माझी मनोभूमिका मांडणं क्रमप्राप्त आहे, असं मला वाटतं. म्हणून ती मनोभूमिका मांडतो आहे.  मुळात रामायण हा भावाविष्कार आहे. ज्यामधे, त्यातील प्रत्येक पात्राचे, भाव आणि त्यातून आलेले संबंध, हृदयंगम चित्र उभे करतात. सर्वांना ज्ञात असेल की, रामायण हे प्रत्यक्ष घडण्याआधी, महर्षी वाल्मिकी यांनी साधारण हजार एक वर्षे आधी लिहिलं गेलं आहे. त्यानंतर, त्यानुसार घटना घडत गेल्या आणि रामायण, लिहिल्या नुसार सार्थ झालं. त्यामुळे त्यातील घटना जरी, तश्याच्या तश्या घटित झाल्या तरी, त्यामागील प्रत्येक पात्राचे भाव आणि कार्यकारण भूमिका ही मूळ लेखनाहून भिन्न असू शकते.  त्यामुळेच कैकयी विषयी, जे भाव, प्रत्यक्ष रामायणात खल पात्र म्हणून मांडण्यात आलेलं आहे. त्याहून थोडी भिन्न भूमिका, संत तुलसीदास विरचित रामचरित मानस यात मांडली आहे. कारण संत तुलसीदास यांनी मानसिक पातळीवर किंवा मनोव्यापारातून राम चरित्र मांडलं आहे. त्यामुळे त्यात त्यांनी कैक...

राम अनुज भरत भाग ५६

राम अनुज भरत भाग ५६ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले सुमित्रा, लक्ष्मणा च्या जन्माच्या आठवणीत हरवून गेली.  बाळरूप लक्ष्मण याच्या कळवळून रडण्याने, संपूर्ण राजपरिवार, चिंताक्रांत झाला होता. राजवैद्य झाले, बाहेरचे सर्व उपचार झाले. मुनिवर वसिष्ठ ऋषींच्या ब्रम्हवृंदाने, मंत्र उपचार करून झाले. पण तरीही, बाळ रूप लक्ष्मण काही केल्या, आपल्या दुःस्थीतीतून बाहेर येत नव्हता. त्याचवेळी महर्षी वसिष्ठ, नामकरण दिन आणि त्या कार्याची माहिती घेऊन व चारही बाळांची जन्म टिपणे घेऊन, राज महालात पातले.  त्यांच्या कानावर ही वार्ता, येतायेताच, पोचली होती. त्यांनी तोपर्यंत चारही टिपणांचा अभ्यास केला होता. त्यांनी आल्या आल्या सूचना केली की, या बाळाला, ज्येष्ठ बालक असलेल्या तेजस्वी बालका शेजारी आणून ठेवा. अत्यंत सुशोभित, सुवर्ण रत्नजडित पाळण्यात, शांत गंभीर भावात निजलेल्या, बाळरूप रामाच्या अत्यंत निकट, त्याचं पाळण्यात बाळरूप असलेल्या लक्ष्मणाला निजवताच, बाळ शांत होऊन, जणू काहीच झाल नव्हतं अश्या स्थितीत, अती दमण्याने, त्वरित नि...

राम अनुज भरत भाग ५५

राम अनुज भरत भाग ५५ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले महर्षी वसिष्ठ अत्यंत विनम्र भावात म्हणाले. " हे सर्व जगत, ज्यांच्या अधिपत्याने चालते, त्यांच्याच इच्छेने हा मार्ग निघाला.कारण राम मर्यादा सोडू शकतं. नव्हता आणि भरत आपला आग्रह सोडू इच्छित नव्हता. परंतु परम ईश्वराची योजना, पुढे नेणं त्यालाच क्रमप्राप्त होतं. त्यामुळे त्या त्या स्थितीत, योग्य त्या कार्यासाठी, सद्बुद्धी देण्याचं कार्य, तोच करतो.इथेही त्याचं ईश्वराच्या इच्छेने, हा राम पादुका प्राप्तीचा शुभयोग जुळून आला. "  भरत म्हणाला " गुरुदेव हा आपला विनम्र भाव आहे. अन्यथा आपली योग्यता, देवांचे गुरू श्री बृहस्पती यांच्या तुलनेची आहे, याच्याशी,आचार्य महर्षी भारद्वाज देखील सहमत होतील."  यावर, अर्थातच भारद्वाज महर्षींनी संमती दर्शवून, अतिथिंच्या जलपानाची व्यवस्था करवली. भारद्वाज मुनींच्या निव्वळ दर्शनमात्रासाठी आलेली सर्व मंडळी, जल पान करून, पुन्हा आपापल्या रथांमधे आरुढ झाले.  आर्य सुमंत यांनी आपला रथ, सर्वांच्या पुढे नेला आणि राजकुमार भरत याच्या...

राम अनुज भरत भाग ५४

राम अनुज भरत भाग ५४ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.. प्रभूंच्या अनुमतीच्याच अतिरम्य कल्पनेत, भ्राता भरत हरवून गेलेला असताना, अचानक महर्षी भारद्वाज यांच्या आश्रमा समीप आपण आलो आहोत, या जाणीवेने, भरताला भाना वर आणलं. भरताने आपला रथ, मुनिवर वसिष्ठ यांचा रथ महर्षी भारद्वाज यांच्या आश्रमाकडे वळवून, बाकीचा सर्व जमाव, रथ, अश्व इत्यादी सर्व, तिथेच थांबण्याचे आदेश, भरताने दिला. त्यानुसार कार्यवाही करण्याची सूचना आर्य सुमंत यांनी आपल्या सचिवांमार्फत दिली आणि स्वतः आपला रथ आश्रमाच्या दिशेने नेला.  त्यांच्या मागोमाग, वसिष्ठ महर्षी विराजित असलेला रथ निघाला. थोड्याच अंतरावर महर्षींचा रमणीय आश्रम परिसर दृष्टी पथात आला. आश्रमाच्या थोड्या अंतरावर, रथ थांबले. भ्राताश्री प्रभू श्रीराम, यांच्या पादुका आपल्या मस्तकी धारण करून, अनवाणी पायाने, भरत उतरला. त्याच्या पाठोपाठ, शत्रुघ्न उतरला. वैशिष्ठ महर्षींनी पुढे होऊन, आश्रमात प्रवेश केला.  महर्षी भारद्वाज, आपला नित्याहार उरकून, आपल्या विद्यार्थ्यांना वेद मंत्रांचा नित्य...