Skip to main content

Posts

अध्यात्म विराम १३०

अध्यात्म विराम १३० काल सांगितल्याप्रमाणे मूर्तीची कल्पना डोळ्यापुढे आणून, मन त्या स्वरूपात गुंतवण्याचा प्रयत्न करावा. यामधे सुरवातीला थोडा किंवा बराचसा गोंधळ होतो किंवा होऊ शकतो. याचं महत्वाचं कारण, मनाला असं ठरवून केलेलं चिंतन किंवा programmed thinking करायची सवय नसते. मुळातच ते मन त्याच्या मनात येईल तसं, चिंतन, विचार मंथन करतं आणि त्यानुसार दृश्य पाहून, त्यात रममाण होण्याची सवय लावून घेतलेलं एक अदृश्य तरीही अद्भुत इंद्रिय आहे.  आता या नवीन आणि मार्गदर्शन केलेल्या किंवा guided thinking ला ते पटकन स्वीकारेल, ही शक्यता फारच कमी असते.आपण ठराविक चाकोरीत जगताना,ऑफिस मध्ये नेमून दिलेलं आणि आपल्या हुद्द्याला पात्र असलेलं काम करतो.त्यावेळी मनाला फार फिरण्यास किंवा स्वतःच्या मर्जीने विचार करण्यास,फार कमी वाव असतो. त्यामुळे थोडा मोकळा वेळ गाडीत, वाटेत, प्रवासात मिळाला किंवा कुठेही थोडी उसंत मिळताच, मर्जीने फिरण्यास सुरुवात करत.  त्यामुळे त्याला मुद्दाम एखाद्या विचाराच्या किंवा कल्पनेच्या मागे जोडणं हे तसं कठीण कार्य आहे. विशेष करून, जेंव्हा आपल्याला एखादी गोष्ट वा विचार मुद्दाम करण्याच...

श्रीकृष्णनीती भाग ३७

श्रीकृष्णनीती भाग ३७ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! धर्म या संकल्पनेबद्दल विस्ताराने जाणून घेतल्यानंतर अधर्म काय हे कळायला खरतर अवघड नाही. जे धर्माविरुद्ध आहे, तो अधर्म. धर्म म्हणजे फक्त ईश्वरो पासना वा अध्यात्म आणि ततसंबंधी ज्ञानार्चन नव्हे, तर प्रत्येकाचं आपलं जीवन जगताना व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि मातृभूमीप्रती असलेली कर्तव्य म्हणजेच व्यापक अर्थाने धर्म. यातील कशातही केलेली चूक वा कर्तव्यमूढता हा अधर्म नसला तरी धर्म पालनात केलेली चूकच. परंतु यातील कोणत्याही गोष्टींबाबत केलेला अक्षम्य गुन्हा वा प्रतारणा वा प्रमाद म्हणजे अधर्म. अधर्म हा आपण स्वतः केला किंवा अधर्म करत असलेल्या व्यक्तीला जाणूनबुजून वा अजाणतेपणी केलेले सहाय्य. मुळात अधर्म हा पूर्वापार असुरांचा धर्म होता. त्यांच्या साठी धर्म पालन न करणं म्हणजेच धर्म. हे त्यांच्या बुद्धीनुसार वा विवेकाच्या अभावाने, अहंकाराच्या प्रभावाने, तामसीपणा मुळे, काम क्रोध यांच्याकडे मनाच्या असलेल्या नैसर्गिक ओढीतून व वाईट तेच चांगलं या बुद्धीच्या धारणेतून मना तील विकारांचा झालेला उत्पात म्हणजे अधर्म. आता म...

अध्यात्म विराम १२८

अध्यात्म विराम १२८ हे विश्व, लहरी, त्यांचं चुंबकीय बल व त्या बलाचा प्रभाव, यावर चालतं. ज्या लहरींची क्षमता जास्त, त्या लहरी, इतर लहरींवर प्रभाव टाकून, त्या लहरींना निष्प्रभ करतात. म्हणूनच शारीरिक क्षमता ही मानसिक क्षमतेच्या व्यस्त प्रमाणात असली तरीही, त्या लहरीच्या प्रभावाने, विश्वात अनेक गोष्टी शक्य होतात. एका विशिष्ट क्षमतेच्या पुढे, मानसिक किंवा इच्छाशक्तीच्या बलाला कार्याला लावून, आपला हेतू साध्य करून घेता येतो. याचही काही शास्त्र किंवा विज्ञान आहे. कोणतंही बल कार्य करण्या आधी किंवा apply होण्याआधी, जितकं शांत आणि स्थिर असेल, तितकंच प्रभावी आणि अनेक पटींनी मारा करतं. विज्ञानात याचं गोष्टीचा आधार घेऊन, अनेक गोष्टी साध्य केल्या किंवा करून घेतल्या जातात.आपल्या अध्यात्मिक कार्यात व मार्गात, जितकं प्रगल्भ व संयत मन, शांत असतं, तितकंच किंवा त्याहून कितीतरी पट त्याची कार्य शक्ती असते. कार्यशक्ती म्हणजे त्या उपकरणातील शक्ती व ऊर्जा यांच्या एकत्रित कार्याचा प्रभाव.  म्हणूनच एखादी व्यक्ती शांत, अर्थात आतून पूर्ण शांत असते व संयत असते, तेंव्हा तिचा प्रभाव अधिक पडतो. म्हणूनच फार न बोलणाऱ्य...
समस्त भगिनी वर्गाला जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐🍫🍨🍰 स्त्री सखी सचिव प्रिया अनेक रुपात वससी तू जगती या धरा असे वसुंधरा स्त्री कीर्ती, श्रुती, विद्या स्त्री ज्ञान धारीती अभ्यासाने हे जगत सांभाळले असे शक्ती रूप स्त्रीने स्वतःस ओळखून तिने आत्मतेज जागे करावे अपूर्व ध्येये लक्ष करुनी पादाक्रांत करावी धैर्याने अपकिर्ती न लागावी आपुल्या नामास कधीही इतुके सांभाळले जगती तर प्राप्त होईल तीज सारे मूलतः जे तेज प्रकटले असे तेच स्त्रीरुप म्हटले गेले ©® कवी : प्रसन्न आठवले ०८/०३/२०२३

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

समस्त भगिनी वर्गाला जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐🍫🍨🍰 स्त्री सखी सचिव प्रिया अनेक रुपात वससी तू जगती या धरा असे वसुंधरा स्त्री कीर्ती, श्रुती, विद्या स्त्री ज्ञान धारीती अभ्यासाने हे जगत सांभाळले असे शक्ती रूप स्त्रीने स्वतःस ओळखून तिने आत्मतेज जागे करावे अपूर्व ध्येये लक्ष करुनी पादाक्रांत करावी धैर्याने अपकिर्ती न लागावी आपुल्या नामास कधीही इतुके सांभाळले जगती तर प्राप्त होईल तीज सारे मूलतः जे तेज प्रकटले असे तेच स्त्रीरुप म्हटले गेले ©® कवी : प्रसन्न आठवले ०८/०३/२०२३

श्रीकृष्णनीती भाग ३६

श्रीकृष्णनीती भाग ३६ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) (आजचा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. योग्य टिपण्णी अपेक्षित आहे)  श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! धर्म हि संकल्पना मुळातच जगण्याच्या संकल्पनेशी निगडित आहे. त्यावर त्या त्या धर्माची संस्कृती ठरते. रूढार्थाने खरतर सनातन धर्म हा मूळ आणि धर्म या व्याख्येत बसणारा, सर्वात जुना धर्म आहे. कारण बाकी बहुतेक सर्व धर्मांच्या स्थापनेबद्दल निश्चित तिथी माहीत आहे वा ज्ञात आहे. परंतु सनातन धर्म, ज्याला हिंदू धर्म म्हणूनही म्हटलं जातं, त्याच्या स्थापनेबद्दल वा मूळ तिथीबद्दल काहीही सांगता येणार नाही, इतका तो जुना आहे.  अर्थातच मूळ आणि सनातन असल्यामुळे जन्म घेणाऱ्या प्रत्येकाचा धर्म, हा सनातन धर्मच असतो. कारण तो जन्मतः धारण केला जातो. अर्थात पंचमहाभूत देहात आत्मा प्रवेशल्यानंतर सर्वप्रथम पुरुषार्थ जो आत्म्यातून देहात प्रवेशतो तो धर्म. सनातन धर्मात चार पुरुषार्थ स्वीकारले आहेत. ज्यामध्ये धर्म प्रमुख आहे. बाकी तीन पुरुषार्थ आहेत - अर्थ, काम और मोक्ष। गौतम ऋषि म्हणतात - 'यतो अभ्युदयनिश्रेयस सिद्धिः स धर्म।' (जे कर्म केल्याने अभ्युदय और निश्रे...

अध्यात्म विराम १२५

अध्यात्म विराम १२५   भोगाच्या वाटेवरून आपण साधनेच्या मार्गावर येण्या साठी आपली पूर्वापुण्याई कमी येते. मुळातच सद्गुरू कृपा होण्यासाठी आपली तशी पात्रता असावी लागते. अध्यात्मिक मार्गात ही पात्रता, जन्म, जातपात, पैसा, श्रीमंती, गरिबी अश्या कोणत्याही निकषावर ठरत नसते. त्याचे निकष परम ईश्वराने घालून दिलेले आहेत आणि युगानुयुगे ते काळ, विधाता, निसर्ग, या सर्वांसहित असलेली ब्रम्हांड व्यवस्था त्यांचं चोख पालन करते. यात कुठेही कसलीही कसूर , चूक, प्रमाद होत नाही आणि होणार सुद्धा नाही. कारण ही सर्व व्यवस्था चालवणारे, त्यांना दिलेल्या निकष आणि नियम यांनी बद्ध आहेत. त्यांचं ते काटेकोर पणे पालन करतात. नव्हे त्यासाठी ते बाध्य आहेत. त्यांच्या व्यवस्थेत कोणतीही भ्रष्टता नाही आणि ती येणारसुद्धा नाही. याच कारण म्हणजे एकतर ती व्यवस्था भौतिक जगताच्या पार आहे. त्यामुळे मायेचे, मोहाचे पाश त्यांना लागू होत नाहीत. दुसरं म्हणजे त्यांच्या मतीमध्ये मानवी गुणधर्म नाहीत.  माणसाच्या बुद्धीला बंधनाचा, कर्माचा, मर्यादांचा आणि मोहाचा शाप आहे. तसा तो त्यांना लागू होत नाही. कारण मुळात ते सर्व चैतन्य रुपात आहेत आ...