Skip to main content

Posts

भोग आणि ईश्वर ५४५

भोग आणि ईश्वर  ५४५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)      कालपर्यंत आपण पाहिलं की, आपल्या मनातील विचार हे आपले खरे मार्गदर्शक, दिशादर्शक असतात. हे विचार दूषित वा पूर्वग्रहदूषित असतील,तर आपल्याला दिसलेला वा जाणवलेला मार्ग, साफ चुकीचा असू शकतो. जर मार्ग चुकला तर, आपलं कर्म चुकणार आणि चुकीच्या कर्माचं, त्यानुसार फल, समोर येऊन उभे राहणार. त्यावेळी आपल्याला हे लक्षातही येणार नाही की, आपणच चुकीच्या विचाराने भारले जाऊन, आपलंच कर्म चुकीचं लिहून ठेवलं, जे काळाने आपल्यासमोर आणून ठेवलं.   म्हणून आधी मार्गदर्शक योग्य असणं खूप महत्वाचं आहे. आता आपले विचार हे, आपलं ज्ञान, जाणिवांची जागृती आणि त्यांची व्याप्ती, अनुभव,अनुभूती,कल्पना, भविष्या बद्दल ज्ञान, माहिती व अंदाज या सर्वांवर अवलंबून आहे व असतं. यामध्ये खूप महत्वाचा घटक जो योग या तत्वाशी जोडलेला आहे, असं आपण दोन तीन दिवसां पूर्वी पाहिलं.  ज्यामध्ये, ज्ञान जाणीवा अनुभव या बरोबरच योग देखील आपल्या विचारांना, मनाला आणि बुद्धीला कार्यरत, प्रेरित व उर्जित करायला कारणीभूत असतात, असं म्हटलं.  यातील ज्ञान व जाणीवा या विचार...

भोग आणि ईश्वर ५४४

भोग आणि ईश्वर  ५४४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     ज्यावेळी दुःखं आणि भोग यांचा काळ येतो, तो सर्वात प्रथम बुद्धीचा आणि त्यायोगे मनाचा मार्ग धूसर करतो. म्हणजे आपण इतर गोष्टी विसरून जातो आणि सर्वात प्रथम, याचं विचारात गढून जातो की, असं घडलच कसं. कारण आपला स्व त्यावेळी आपल्याला, मार्गदर्शन करत असतो. हा स्व, अश्यावेळी बरोबर उलट शिकवणं वा विचार निर्माण करतो, ज्यायोगे आपण कोणी महान वा उच्चतम आहोत आणि आपल्या बाबत असं का घडू शकतं,  या विचाराने मन, चक्रावून जातं.  हा विचार मनात, पूर्वसंचितातील विचारांची, ज्ञानाची प्रगल्भतेची शिदोरी, त्यावर या जन्मात झालेले संस्कार आणि त्या संस्कारा तून झालेली जाणिवांची  उत्पत्ती, या सर्वातून येतात. म्हणजे आपला स्व हा,या सर्वातून किती प्रगल्भ व सुसंस्कृत झाला आहे किंवा अपरिपक्वच आहे, यावर अवलबून असतो. जसजशी हि प्रगल्भता वाढत जाते, माणूस दुःख दैन्य व भोग याच्या परीघ काळात, योग्य पासून ते  अयोग्य पर्यंत अनेक प्रकारचे  विचार करतो. अनेकवेळा, प्रगल्भता असूनही, एखाद्या योग्य क्षणी माणूस चुकीचा विचार करून, दुःखाची आणि भोगांची...

भोग आणि ईश्वर ५४३

भोग आणि ईश्वर  ५४३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    सद्गुरू प्राप्ती आणि त्यांच्या कृपेचा लाभ, हे मुख्यतः प्रारब्ध, संचित, पूर्वकर्म यांचा परिपाक असतो. मुळातच आत्मा देह बदलत बदलत अनेक जन्मातून,अनेक कर्माच्या गाठी उकलत, पुन्हा नवीन कर्माच्या गाठी बांधत मार्गक्रमण करत असतो. प्रत्येक जीव, याच माध्यमातून व याच मार्गाने जातो.  संचिता तील ठेव ही खूप मोठी जमा पूंजी असते, ज्यावर सध्याच्या जन्मातील काही योग, भोग व उपभोग अवलंबून असतात.   भोग आणि उपभोग याबद्दल आपण याआधी बोललो आहोत आणि त्याची जाण अनुभवामुळे प्रत्येकाला असेलच. पण योग यासाठी म्हटलं की, काही गोष्टी फक्त योग असेल तरच घडून येतात.त्या सांसारिक वा प्रापंचिक परिणामात बसत नाहीत.  पण त्या जीवनाला कलाटणी किंवा त्यात अमुलाग्र बदल घडवून, आत्मजीवनाला आवश्यक वळण देणाऱ्या असतात.  कारण देह व देहाचे भोग व उपभोग हे नेहमी देहापर्यंतच मर्यादित असतात. आपण ते भोग व उपभोग मनाच्या माध्यमातून, आत्म्या पर्यंत पोचवून, जन्मोजन्मी साठी पुढे नेतो.  (यावर विस्तृत विवेचन नंतर करूया).  योग ही अशी गोष्ट आहे, ज्यामुळे म...

भोग आणि ईश्वर ५४२

भोग आणि ईश्वर  ५४२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    काल आपण, स्वयं ईश्वरी चैतन्याने प्रेरित किंवा भारलेले सद्गुरू यांविषयी पाहिलं. पण तरीही, जी विशेषणं व गुण वैशिष्ट्य आपण पाहिली, ती सर्वसाधारणपणें सर्वच सद्गुरूंना लागू होतात. किंबहुना, त्या गुणविशेषानी युक्त चैतन्य स्वरूप व्यक्तित्व,  हे सद्गुरू पद प्राप्त करण्यास योग्य आहे.  पण यामधे सर्वात प्रमुख गुण म्हणजे साधक, भक्त यांविषयी अपार करुणा व प्रेम.ज्यामुळे, साधकांच्या भक्तांच्या दुःखाने व्यथित होऊन, त्यांचा पुत्रवत सांभाळ कारण, हा विशेष स्वभाव, हे सद्गुरुंचा स्नेहाचं विशेष वैशिष्ट्य आहे. म्हणूनच सद्गुरूंना माऊली म्हणूनही संबोधलं जातं, ते याचमुळे. अपार करुणा हा त्यांचा आत्मविशेष असतो म्हणजे तो त्यांच्या आत्म्याचा गुणधर्म असतो.  हा स्नेह, भक्तांविषयी ही चिंता हा प्रत्येक सद्गुरुंना, आपले साधक , शिष्य व भक्त यांच्याशी बांधून ठेवते.  खरतर सद्गुरू होणं, ही ईश्वरी कृपेशिवाय, अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणजेच पर्यायाने असं नक्कीच म्हणता येईल की, प्रत्येक सद्गुरूंच्या मागे, ईश्वरी पेरणा, शक्ती व ऊर्जा ही नक्कीच असत...

भोग आणि ईश्वर ४९६

भोग आणि ईश्वर  ४९६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  आपण काल पाहिलं की श्रद्धा ही विश्वासाची परिसीमा आहे. म्हणजेच विश्वास हा जेंव्हा शतशः असतो किंवा संपूर्ण असतो, त्यावेळी तो श्रद्धेचं रूप घेतो. वास्तविक अर्थाने आपण एखादी गोष्ट, व्यक्ती किंवा पूजनीय व्यक्तित्व आपल्या अस्तित्वापेक्षाही परम सत्य मानतो, त्यावेळी तिला श्रद्धा म्हटलं जातं. आपण श्रद्धेच्या माध्यमातून आपल्या आराध्याला आपल्याहून भिन्न मानत नाही, त्यावेळी श्रद्धा दृढ झाली आणि मी व आराध्य यात काही अंतर उरलं नाही, अशी दृढता व विश्वास त्यात निर्माण होतो.  अनेकांना या गोष्टीचा वा भावाचा प्रत्यय त्यावेळी येईल किंवा येतो, जेंव्हा श्रद्धेचा भाव मनातील इतर सर्व भावांना व्यापून उरतो. त्यावेळी श्रद्धा मनातील सर्व केंद्रांवर वा शक्तीस्थानांवर विराजित होते. अर्थात आपल्यातील इतर सर्व भाव, त्या एकाच भावात लुप्त होऊन, एक अलौकिक भाव तयार होतो. अश्या स्थितीला मानव येण्यासाठी स्मरण, शरण व श्रद्धा या त्रिसूत्रीचा दृढतेने अवलंब अत्यंत महत्वाच...

भोग आणि ईश्वर ४९३

भोग आणि ईश्वर  ४९३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  आपण ज्या विषयासंदर्भात चिंतन करत आहोत, त्या शरणागती बाबत मनात अनेक विकल्प उभे राहतात. त्या विकल्पातून, शंकाकुशंका, इष्ट अनिष्ट विचार येतात. याचं कारण म्हणजे मनात सकार  व नकार भरलेला आहे. तो मनातून तो आत्म्याला देखील ग्रासून उरतो. सर्व शंका, संशय, संदिग्धता या मनातूनच उत्पन्न होतात. मुळात त्या तिथे असतात, फक्त काहींच्या बाबतीत, ते भाव विशेष प्रकट होऊन, मनावर राज्य करतात.  या व्यक्तींना अंशतः ते संपूर्ण अश्या वेगवेगळ्या प्रमाणात, या शंका, संशय व संदिग्धता या भावांनी ग्रासलेलं असतं. ग्रासणं या शब्दातच,ते भाव मनाचा घास घेतात हे अध्याहृत आहे. पण हे ग्रासणं कायमस्वरूपी, तेंव्हा असेल ज्यावेळी ते, संपूर्णपणे मनाला ताब्यात घेतं. हे भाव मनात हळूहळू ते अतिजलद पसरतात. त्यामागचा तर्क किंवा कारण असं आहे की, मनाच्या कुवतीवर यांचं प्रवेशणं ते प्रसारित होणं अवलंबून आहे.  कुवत म्हणजे मनाची स्वतःची शक्ती, बल व ऊर्जा. म्हणजे जर मनाच...

भोग आणि ईश्वर ५४१

भोग आणि ईश्वर  ५४१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     प्रत्येक जीवांश मुक्त होऊन, पुन्हा परम अंशात विलीन व्हावा, ही ईश्वराची, ब्रम्हांड रचनेवेळची इच्छा होती आणि कल्पांतापर्यंत ती असणार. पण सर्व स्थळी, सर्व काळी आपण उपस्थित राहू शकणार नाही,या अपरि हार्यतेतूनच, सद्गुरू तत्वाची निर्मिती झाली. कारण इश्वरेच्छा बलीयसी, हे तर सत्य वचन आहेच.  म्हणून या ईश्वराच्या प्रतिनिधींना या जगतात, सामान्य माणसाच्या कल्याणार्थ धाडण्यात आलं. किंबहुना त्यांचं अस्तित्व हे जगतजीवन सुलभ, सुसह्य करून, मुक्ती व मोक्ष मार्गाची वाट साध्य करून देणं, यासाठीच आहे. पण यासाठी आवश्यक तयारी प्रत्येक जीवाकडून, करून घेणं, हे महद्  कार्य या भूतलावर, अव्याहत, म्हणजे काळाच्या आदी पासून ते कल्पाच्या अंता पर्यंत, निरपेक्ष भावनेने, निष्काम कर्म योग्या प्रमाणे करण्यासाठी, चैतन्य रूप ते मानवी देह धारण करण्याची शक्ती, सिद्धी, पात्रता मिळवण्यास योग्य असलेले, परम साधक, गुरू तत्वाचे आद्य श्रीदत्तगुरू यांच्या परम कृपेने, गुरुपद प्राप्ती करतात.  यासाठीची घोर साधना, तप, त्याग, वैराग्य, निष्ठा, ध्येयासक्ती हे...