Skip to main content

Posts

भोग आणि ईश्वर ४५६

भोग आणि ईश्वर  ४५६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  पृथ्वीतत्वाबद्दल काल आपण चर्चा केली.  आता जलतत्व, पृथ्वीतत्वानंतर विचार करूया अग्नित्वाची. दधगता अंगार म्हणजे अग्नीतत्व. थोडक्यात काय तर सतत क्रोध आणि राग यांचा वास ज्या देहात बुद्धीत व मनात असतो, त्या व्यक्ती अग्नीतत्वाने युक्त असतात. म्हणजे यांच्या स्वभावात, बोलण्यात,  वागण्यात, विचारात, भाषेत क्रोधाचा वा रागाचा अंमल जास्त असतो.  अश्या व्यक्ती सहसा शांत असलेल्या किंवा फार।विचार व चिंतन करताना आढळत नाहीत वा दिसत नाहीत. पण असे लोकं फटकन बोलून, विचार न करता वागून बरेच वेळा गोंधळही निर्माण करतात. कधीकधी अश्या व्यक्तींच्या वागण्या बोलण्याने अनेकदा माणसं दुरावण्याची वा दुखावण्याची शक्यता असते. अश्या लोकांची विचारशक्तीसुद्धा अग्निप्रमाणे वेगवान असते. पण यातून अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात.  अग्नित्वानंतर वायू तत्व प्रभावित व्यक्तींबद्दल विचार करूया. या व्यक्ती बदलत्या विचारांच्या, मतांच्या असतात. अर्थातच ज्याला चंचल विचार, बुद्धी असं म्हणतात, त्याप्रमाणे असतात. कारण वायूच्या गती व बदलत्या स्थितीप्रणाने, या...

भोग आणि ईश्वर ४५५

भोग आणि ईश्वर  ४५५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  जलतत्व प्रभावित व्यक्तींचा एक स्वभाव आपण बघितला की, त्यांना, स्वतःला, सहसा कुठेही सामावून घ्यायला, समस्या येत नाही. म्हणजे अश्या व्यक्ती, जलाप्रमाणेच असतात. जसा प्रवाह, मार्ग, काळ, संगत असेल त्या प्रमाणे ते, त्या त्या प्रसंगात, समूहात व साच्यात स्वतःला सावरून व सामावून घेतात. यांना सहसा क्रोध वा नैराश्य येत नाही. कारण जसा काळ तसा स्वतःमध्ये, विशेषतः स्वतःच्या आचार, विचार व उच्चारात आवश्यक बदल करण्याचं कसब, त्यांच्याकडे जलतत्व प्रभावाने आलेलं असतं.  या लोकांना समूहात सामूहिक मानसिकता व एकांतात एकाग्रता, दोन्हीही साध्य होतं.म्हणजे विचारांचा ठामपणा असूनही, आपलाच हेका न चालवता, जसं सर्वमताने ठरेल, त्यानुसार करण्याचं तंत्र यांना जन्मतः अवगत असतं. पण कधीकधी अश्या व्यक्तींना समूहात स्वत्व गमावून, असेल ते स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. अर्थात यामध्ये आपण काही गमावत आहोत किंवा आपलं काही नुकसान करून घेत आहोत, असा कोणताही भाव, यांच्या मनाला स्पर्श करत नाही.  या गोष्टीचा एक फायदा असाही आहे की, बरेचवेळा मनात येणारे, भय, निर...

भोग आणि ईश्वर ४५४

भोग आणि ईश्वर  ४५४  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  प्रत्येक पंचमहाभूतरुप देहात, पाच शक्तींमधील, कोणती तरी एक किंवा अधिक शक्ती, त्या देहात, प्रारब्धवश, बलशाली असते. ती शक्ती मनाचा, बुद्धीचा आणि देहातील इंद्रियांचा ताबा, घेऊन, त्यातील मन, बुद्धी याना आयुष्यभर ग्रस्त करून, त्या मानवाचा स्वभाव वा वृत्ती ठरवते. म्हणून एखादी व्यक्ती लहानपणापासून शांत, एखादी धीरगंभीर, एखादी व्यक्ती उथळ, एखादी व्यक्ती बलशाली, एखादी विकृत असते.  अश्याप्रकारे विविध शक्तींच्या प्रभावाने मन आणि मनाचे खेळ चालतात. अर्थात त्या व्यक्तीचं बाह्यांगी व्यक्त झालेलं मन म्हणजे त्याचं व्यक्तित्व असतं. म्हणजे बाहेर जगताला दिसणारं व्यक्तित्व पाचातील एखाद्या स्वरूपाचं प्रकट रूप आहे आणि तो त्याच्या वृत्तीचा व स्वभावाचा भाग आहे. याबाबत आपण, दोन प्रकारे बघू शकतो.  एक म्हणजे, जर तो दोषपूर्ण स्वभाव व वृत्ती समोरच्या व्यक्तीचा वा आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीचा असेल तर, आपण सर्वात प्रथम, स्वतःला त्या लहरींच्या प्रभावा पासून, दूर ठेवण्याच्या प्रयत्न करूया. दुसरं त्याच्या दोषांना जाणून आपण स्वतःत आणि त्या व्यक्...

भोग आणि ईश्वर ४५३

भोग आणि ईश्वर  ४५३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  पंचमहाभूतरुप देहातील पाच तत्वाचं एकत्रित अस्तित्व आणि त्यांच्या संयुक्त समिकरणातून अखंड उभं राहिलेला स्वभाव, व्यक्तित्व, देहरचना, बुद्धीची झेप, मन आणि मनाची खोली, याचा एकत्रितपणा माणूस कोण आहे, कसा आहे व काय आहे, हे ठरवतो.पण यावरसुद्धा सर्वात प्रथम प्रारब्ध अर्थात पूर्वसंचित याचा मूलतः प्रभाव असतो आणि आपल्याला या एकत्रित समिकरणातून, जे व्यक्तित्व प्राप्त झालं, त्याला घडवणं वा बिघडवणं हे आपण, पुन्हा आपल्या कर्मभाराने ठरवतो किंवा लिहितो.  या पाच घटकातील जो घटक सर्वात प्रभावी व बलशाली आहे, तो घटक, त्या व्यक्तीचा स्वभाव, वागणूक हे सर्व ठरवतो. आता कोणता घटक जास्त प्रभावी, तेसुद्धा आपण पूर्वकर्माने ठरवत असल्यामुळे, हे पक्कं ध्यानात ठेवावं की,आज जसे आपण जगतो,वागतो वा कोणत्या गोष्टी आपल्या मनाला व बुद्धीला प्रेरित करून कर्म करवून घेतात, त्यानुसार, या जन्मातून जाताना आपण, पुढील जन्माचा आपला मनाचा आलेख लिहून ठेवतो.  आधीच्या जन्माबद्दल, काही क्षण आपण विसरून जाऊ. पण या जन्मात जसं वागतोय किंवा जसं पुढे वागू, त्या नुसार आपला स्...

भोग आणि ईश्वर ४५२

भोग आणि ईश्वर  ४५२  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  जल आणि मन यांचं तप्त होण्यातील साम्य आणि फरक पाहण्यासाठी दोघांचा तौलनिक अभ्यास करणं गरजेचं आहे. जल हे उशीरा तप्त होऊन, उशीरा थंड होतं, हे सर्वसामान्य विज्ञान, आपण लहानपणी शिकलो आणि थंडीत वा उन्हाळ्यात याचा प्रत्यय आपण, नैसर्गिक पाणीस्रोत असतात तिथे,घेतो वा अनुभवतो.घरी येणाऱ्या जलाला, तो प्रत्यय तितका सार्थपणे घेता येत नाही.  कारण घरचं पाणी अनेक माध्यमातून पोचत असतं. जसं, पाण्याच्या वाहिन्या, ज्या बहुतेक धातूच्या असतात आणि ज्या टाक्यांमध्ये ते साठवलं जातं,त्या सिमेंटच्या असतात. त्यामुळे घरात येणाऱ्या जलाच्या तांपमानवर, त्या माध्यमांचा प्रभाव असतो. पण सर्वसाधारणपणे जलाचं तापमान उशिरा चढतं आणि उशिरा उतरतं. त्या जलाला उष्ण करणारा घटक, म्हणजे सूर्याची उष्णता. ती उष्णता जशी चढत जाईल, तसतसं जलाचं तापमान चढत जातं. पण  सूर्य मावळल्यानंतरही, ते उष्ण असतं आणि उशिरा थंड होतं.  देहात जवळजवळ सत्तर टक्के पाणी असल्यामुळे, वास्तविक ते देह बुद्धी व मन, हे या नियमानेच, उशिरा कोप पावून, उशिरा शांत होणं गरजेचं आहे. पण तसं प्रत्यक...

भोग आणि ईश्वर ४५०

भोग आणि ईश्वर  ४५०  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  अहं हा एक प्रकारचा नकारात्मक, ऋणभारित भाव आहे, जो मनात जन्मतः रुजतो आणि देहाबरोबर वाढतो. सरतेशेवटी तो मृत्यूला तात्पुरता विश्राम घेतो, पण मनबकोषातून तो आत्म्यासह, चैतन्यावस्थेत विहरत राहून, आत्मा ज्यावेळी, पुनः एखाद्या गर्भात प्रवेश करतो, त्यासमयी मनकोषात स्थापित होतो. स्थापित होतो म्हणण्यापेक्षा, जो चेतानावस्थेत अर्थात निर्गुणावस्थेत असतो, त्याला मूर्त अर्थात सगुणरूप प्राप्त होतं.  देह गर्भातून बाहेर येताच, पूर्वजन्मातील संस्कारानुसार, हा पुनः कार्यरत होतो. म्हणून याला बाहेर काढायचं म्हटलं तर, त्याची मुळी इतकी खोलवर गेलेली असते, की मोठं कठीण काम होऊन बसतं. कारण ती मुळी एका जन्माची नसून, अनेक जन्मांतून वाढत आलेली, वटवृक्षा सम  घट्ट रुजलेली मुळी असते. वटवृक्षाच्या पारंब्यां प्रमाणे, याला अनेक अंग आणि प्रत्यंग असतात आणि त्या सर्वांची आपापली अंतरंगंसुद्धा असतात.  म्हणून याला काढण्यासाठी सर्वात प्रथम,लीनता अर्थात विनम्रता, हा सद्गुण अंगी धरला पाहिजे. विनयशील व्यक्तीला यश आणि अपयश दोन्ही सहजी पचवता येतं. पंचवणं म्...

भोग आणि ईश्वर ४५१

भोग आणि ईश्वर  ४५१  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  विनम्रता किंवा लीनता अर्थातच इंग्रजीत ज्याला low profile राहणं म्हणतात, त्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे तुमच्या मनाचा वारू, अकारण वा सकारण उधळत नाही आणि दोन त्यामुळे मनात ऋणभारित आयर्न निर्माण न होता धनभारीत आयर्न तयार होतात. ज्यामुळे मनातील मूळ स्वभावाच्या अवगुणांना, फार डोकं वर काढायची संधी मिळत नाही.  म्हणजेच जर स्वभावात अहंचा प्रादुर्भाव असेल, तर त्या अहंला वेळीच नियंत्रणात ठेवण्याचं महत्वाचं कार्य, ही विनम्रता करते. त्यामुळे त्याचा अंगीकार केल्याने, मन सुध्दा शांत आणि शीतलतेचा अनुभव करतं. मनाला प्रसन्नता आणि आल्हादता यांच्या अनुभूतीची सवय लावून घेतली तर, मन त्या वातावरणात कायम राहण्याचा प्रयत्न करते. शिवाय आपल्याकडे परंपरेने म्हटलच आहे की, विद्या विनयेन शोभते.अर्थात ज्ञान आणि त्या ज्ञानाची उपाधी विनयशील व निरूपाधिक असणाऱ्यांना शोभते.  अहं प्रमाणेच स्वभावातील दुसरा अवगुण जो, अनेक मार्गांनी घातक ठरतो आणि मनातील ऋणभार क्षणात प्रचंड प्रमाणात आणि अनियंत्रितपणे वाढवतो, तो म्हणजे क्रोध वा अतिराग. मुळात क्रोध वा राग...