Skip to main content

Posts

भोग आणि ईश्वर २५५

भोग आणि ईश्वर २५५ काल आपण पाहिलं की, मनाच्या परिघातून, नकार, विकार व अनिष्ट विचार पुसून टाकले की, मनाचा आरसा स्वच्छ होतो. खरतर एखादा आरसा पुसायला, स्वच्छ कपडा हवा आणि तो कपडा नित्य स्वच्छ करत राहणं सुद्धा आवश्यक आहे. अन्यथा एका काळानंतर त्या कपड्याची घाण आरशाला लागायची आणि आरसा स्वच्छ होण्याऐवजी, अजूनच अस्वच्छ व्हायचा. म्हणजे व्यवहारात हे तंत्र आपण कोणतीही वस्तू स्वच्छ करायला वापरतो. मग मन,बुद्धीआणि आत्म्या यांच्या बाबत हे तंत्र का नाही वापरायचं. नव्हे तंत्र हेच वापरायचं आहे, पण इथे कापड नसेल तर, एक असं माध्यम प्रत्यक्ष ईश्वराने निर्माण केलं आहे की, ज्याच्या योगे आपण मन बुद्धी आणि आत्मा या तिन्हींची शुद्धता साधू शकतो. ते तंत्र काळाच्या कोणत्याही कसोटीवर आणि युगांच्या कोणत्याही स्थितीत अनंत पापांची रास, लीलया स्वच्छ करून मन, बुद्धी व आत्मा यांना लख्ख करून, उजळून प्रकाशमान करून देतं. त्या तंत्राचं नाव आहे, सद्गुरू आणि त्यांची कृपा. या गुरुचरणांना वंदून, त्यावर नीत लवून आणि शरण राहून, आपली साधना करत राहणं, इतकंच आपलं कर्म आहे. या एकाच कर्माचं फळ अनंत रुपात, अनंत क्षणात, अनंत जन...

भोग आणि ईश्वर २५४

भोग आणि ईश्वर  २५४  खरच मनाचा डोलारा सांभाळणं हे म्हटलं तर अत्यंत जिकिरीचं आणि म्हटलं तर सहजसाध्य असं कर्म आहे. मुळात आपण ज्यावेळी नकारात्मक वा निराश वा अनुत्साही असतो, त्यावेळी कुठेतरी मनात एखाद्या गोष्टीची नाराजी, एखाद्या कटू आठवणींचा पडदा, एखादी सल किंवा एखादा नकारात्मक विचार बॅक स्टेजला अर्थात मनात पडद्यामागे कार्यरत असतो. किंबहुना मी म्हणेन, तसं काही नसल्याशिवाय मन उगाचच निराश वा निरुत्साही वा नकारात्मक असणार वा राहणार नाही. अश्यावेळी आपल्याच मनाशी आपण संवाद साधून,  त्यातून ही नाराजी वा नकारात्मकता काढून त्याजागी उत्साह, उमेद, चैतन्य भरलं पाहिजे. पूर्वीच्या काळी मानसोपचार तज्ञ ही संकल्पनाच नव्हती. पण त्यावेळी मानसिक समस्या नसतील असं म्हणणं धाडसाचं आहे. मागे आपण पाहिलं, त्याप्रमाणे मन म्हणजे अवकाशा समान  आहे. हे अवकाश वा ब्रह्मांडातील कोणतीही गोष्ट अथवा काळाचं चक्र हे वर्तुळाकार आहे.  म्हणजेच कुठेतरी त्या वर्तुळाचा एकशेऐंशीवा बिंदू आणि तिनशे साठावा बिंदू नक्कीच असणार. या वर्तुळाच्या परिघामध्ये आपलं मन घिरट्या घालतं किंवा भ्रमण करतं. म्हणजे एकशेऐंशीव्या बिंदू...

भोग आणि ईश्वर २५२

भोग आणि ईश्वर  २५२ वास्तविक जे आत्मज्ञान वा मोक्षप्राप्तीसाठीचं ज्ञान ईश्वरी संकल्पातून प्रकट झालेलं,  गुह्य पण सर्वजनांसाठी असलेलं ज्ञान, सर्वांनाच प्राप्त व्हावं, हा जगतपिता ईश्वराचा स्वच्छ आणि शुद्ध हेतू. मूळ संस्कृत असलेल्या, देवभाषेत ते युगानुयुगे मांडलं  गेलं. त्याचा अर्थ, अन्वयार्थ, मतितार्थ, गुह्यार्थ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचून, त्यांनाही या जीवनातून, मुक्त होऊन, ईश्वरप्राप्ती व्हावी या हेतूने प्रेरित होऊन, ज्ञानी व मुमुक्षूंनी हे सत्कार्य करावं, जेणेकरून सद्हेतू साध्य होईल, हा ईश्वरी हेतू यामागे होता.  पण काळाच्या, विकारांच्या ओघात, हे ज्ञान काही मोजक्या हातात राहिलं आणि उद्देश असफल राहिला. कर्म ज्ञान व या दोन्हीना जोडणारी आणि ईश्वरप्राप्तीचा खरा मार्ग असलेली भक्ती, आपलं स्वरूप हरवून बसली. त्यामुळे प्रथम कुरुक्षेत्रावरील युद्धप्रसंगी श्रीकृष्णांनी आणि नन्तर कलियुगात बाराव्या शतकात, स्वतः श्रीविष्णूंचा अंश असलेल्या, ज्ञानोबामाऊलीनी, ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचं कार्य केलं.  म्हणजेच सर्व जीवांची चिंता वाहणारे, स्वतः वेळोवेळी येऊ शकतात, येतात हा...

भोग आणि ईश्वर २५३

भोग आणि ईश्वर  २५३  भोगाच्या वाटेवर किंवा उपभोगाच्या राजमार्गावर, मन हे नेहमी आपल्याच विचारात असतं. त्यातून, म्हणजे मनातून, जे विचार येतील, त्यामागे आपण कायम ओढले जातो. कोणतीही चांगली, सात्विक, शुभ गोष्ट करण्याचं योजताना,  मन सर्वात प्रथम साशंकता हे आपलं पहिलं आणि नकारात्मकता हे दुसरं हत्यार परजतं. आपण कोणतीही शुभ, सात्विक, चांगली गोष्ट करताना ती नीट होईल का हा विचार करतो. याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे, आत्मविश्वास व श्रद्धा यांचा अभाव. किंबहुना या अभावामुळेच मन नकारात्मक व साशंकता या अवगुणांना नेहमी सर्वात पुढे करतं. आता मन करतं म्हणजे आपणच, असा एक सहज विचार येईल. वास्तविक अर्थाने तसंच असायला हवं. म्हणजे आपणच नकारात्मक व साशंक असतो का किंवा आहोत का. याचा खोलात जाऊन विचार केला तर हे लक्षात  येईल की, खूपवेळा मन आणि आपण भिन्न आहोत असा भास काही काही वेळा होईल. कारण आपण म्हणजे देह, की बुद्धी की मन की आत्मा. यावर नन्तर विचार करू.  म्हणजे आपण वेगळंच योजन करत असताना, मन मात्र वेगळ्या दिशेने चालत असतं. त्याच्याबरोबर ते आपल्याला सुद्धा सोबत घेऊन जात असतं. बरेचदा आपण ...

भोग आणि ईश्वर २५१

भोग आणि ईश्वर  २५१ खूपवेळा असं होतं की, आपण नाम घेत असतो आणि आपलं मन भलताच विचार करत असतं. अशावेळी खरच आपण करत असलेल्या नामाचा लाभ होतो की, ते हवेत मारलेल्या तीर किंवा बाणाप्रमाणे विरून जातं, हा एक प्रश्न काय मनाला सतावत असतो. कारण आपण सांसारिक जीव असल्याकारणाने, विरक्त व वैराग्यपूर्ण जीवन जगणाऱ्यांप्रमाणे, आपण निर्विकार वा निर्विचार होऊ शकत नाही, म्हणजे पूर्णपणे विचाररहीत होणं अवघड आहे.  यावर विचार करण्याआधी एक गोष्ट ध्यानात घ्या की, ईश्वराने या गोष्टीचा विचार केला नसेल असं शक्य नाही. कारण या सर्वांचा कर्ता धर्ता आणि हर्ता तोच आहे. म्हणजे मन निर्माण करताना किंवा, मनरुपात मानवी देहाचा भाग म्हणून प्रस्थापित होत असताना, ईश्वराला देह, देहाच्या मर्यादा, त्याच्या जबाबदाऱ्या, त्यावरील माया व इतर अनिष्ट गोष्टी व विकार यांचा होणारा प्रभाव, माहीतच असणार.  दुसरं महत्वाचं तत्व लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे ईश्वराने गीतेत सांगताना काही गोष्टी स्पष्ट केल्यात, त्या म्हणजे, मनाचा व्यापार, बुद्धीची गणितं, देहाच्या अवस्था, या सर्व सांभाळणं, हे अत्यंत कठीण आहे. त्यात प्रत्येकाला आपलं मन आपल्य...

भोग आणि ईश्वर २५०

भोग आणि ईश्वर  २५० आज सलग २५० दिवस या विषयावर लिहिण्याचं कार्य, माझे सद्गुरू माझ्याकडून करवून घेत आहेत, याचा आनंद होत आहे. त्याचप्रमाणे हे काम, जितके दिवस त्यांना करवून घ्यायचं आहे, तितके दिवस, माझ्याकडून ते होत राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.    परवाच्या उदाहरणाला पुढे नेऊ आणि थोडा अजून सखोल विचार करूया. पोपट म्हणजे आपलं मन,  सुखात असताना, समोर भोग, संकट, काळजी, अडचणी या रुपात मागील कर्म आपल्याला, त्या सुखाच्या क्षणांचा आनंद घेऊ देत नाही. क्षणात मनातील भय विचारांना उंचावर घेऊन जातं आणि बुद्धीच्या व देहाच्या गरुडाला त्वरित कामाला लावतं. विचार मन करतं, बुद्धीला चालना व प्रेरणा देतं आणि या इंधनाने देहाचं वाहन कार्यरत होतं. बर केलेली कृती योग्य की अयोग्य हे परिणाम समोर दिसेपर्यंत समजत नाही. जेंव्हा समजतं, तेंव्हा समोर येणारे परिणाम देहाला भोगावे लागतात आणि बुद्धी व मन विचारात पडतात की, हे समोर येऊन उभं आहे, ते वास्तव काय आहे आणि हे कसं आलं. पण त्यावेळी बिथरलेलं हे मन, हे मान्य करायला तयार होत नाही की, यामागे माझंच कर्म कारणीभूत आहे. बरं गोंधळात पडलेलं मन पुन्हा, त्य...

भोग आणि ईश्वर २४९

भोग आणि ईश्वर  २४९ काल आपण पाहिलेल्या कथेमध्ये तीन जणांचा प्रत्यक्ष सहभाग आहे आणि एक नामोल्लेख आहे, चित्रगुप्तांचा. मुळात हा पोपट मनाचं प्रतीक आहे, जो त्वरित कार्य करण्यास बुद्धी व देह यांना प्रवृत्त करतो. गरुड हा त्या बुद्धी आणि देह यांचं प्रतीक आहे  आणि यमराज हा नियती वा प्रारब्ध यांचं प्रतीक समजुया.  आता प्रारब्धाचं भय समोर फलरूपात समोर येऊन उभं राहिल्यानंतर, मनाची सर्वात प्रथम प्रतिक्रिया ही भीतीची असते वा असणार. कारण स्थितप्रज्ञ व्यक्ती सोडून, बाकी सर्व सामान्य जीव हे याचप्रकारे प्रतिक्रिया वा प्रतिसाद देतात. त्यानंतर प्रत्यक्ष कृती होते. इथेच मनातला विवेक कार्य करू शकतो व मनाला निश्चितपणे चुकीच्या कार्या पासून परावृत्त करू शकतो. आता हे उदाहरण प्रत्यक्ष मृत्यूचंच असल्यामुळे, आपण होणारा परिणाम टाळू शकतच नाही, हे नक्कीच.  पण त्या यमराजाच्या जागी आपण प्रारब्ध कल्पिलेलं असल्यामुळे, जीवन जगताना, ते कोणत्याही कर्म फलाच्या स्वरूपात, अकल्पितपणे समोर येऊ शकतं.  म्हणजेच जे समोर येईल, ते चांगलं किंवा वाईट असं काहीही असू शकतं. मात्र त्यावर मनाची प्रतिक्रिया वा प्रतिसाद...