Skip to main content

Posts

भोग आणि ईश्वर १९२

भोग आणि ईश्वर  १९२   बरेचवेळा असं वाटतं की, इतकं सर्व ज्ञान देवाने, विधात्याने, विश्वनिर्मात्याने भूलोकी वेगवेगळ्या रुपात येऊन मांडलं, वेद, उपनिषदे, पुराणं, अध्यात्मिक वाङ्मय, सद्गुरूरुपात  अध्यात्मिक मार्गी साधकांच्या, चिंतन कर्त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत करोडो लोकांपर्यंत पोचेल अशी व्यवस्था निर्माण केली. जशी मायेमुळे व वासनेमुळे विषयाकडे ओढ निर्माण होते आणि वैषयीक माणूस त्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करू धजावतो. त्याच्या विरुद्ध टोकाला हे ज्ञान मिळवण्याची, जोपासण्याची, जतन करण्याची, त्याचा प्रसार करण्याची जिज्ञासा, लालसा, ओढ निर्माण होऊन, संसाराच्या पसाऱ्यात सर्व तापत्रयांकडे दुर्लक्ष करून, हा व्याप लोकांपर्यंत पोचवण्यासाठी धडपड करून, प्रसंगी अवहेलना सहन करून, या ज्ञानाप्रत लोकांना पोहोचण्या साठी, कष्ट घेणारे देखील याच जगतात आहेत.  दोघांनाही मायेच्या वासनेची आंच आहे. पण एकजण त्या मध्ये स्वतःला बुडवून सर्वस्व, म्हणजेच सर्व कर्म त्याचसाठी करतो. तर दुसऱ्या बाजूला एक आपली वृत्ती स्थिर राखून, आपल्या साधनेच्या तापात त्या वासनेला जाळतात आणि त्यावर आरूढ होऊन स्थिरचित्त, स्...

भोग आणि ईश्वर १९१

भोग आणि ईश्वर  १९१   काल आपण पाहिलं की,ज्ञानी माणूस ज्ञानाच्या सहाय्याने आत्मोन्नती साधत अंती आत्मउध्दार साधतो. ज्ञानाने त्याच्या जाणिवा प्रगल्भ होतात, मनाच्या कक्षा रुंदावतात सत् असत् याचा बोध झालेला असतो. मोह माया, काम क्रोध यांचा प्रत्यय आलेला असतो, भगवंताचं सतस्वरूप जाणलेलं असतं. त्यामुळे साधायचं काय आणि सोडायचं काय, याची जाण आलेली असते. मुमुक्षत्व प्राप्त झालेलं असतं.  उन्नती आणि अधोगतीचे मार्ग आणि खाचाखोचा माहिती असतात. मनःचक्षु उघडले असल्या कारणाने काय पाहायचं आणि काय न पाहता पुढे जायचं, हे समजलेलं असतं, मर्यादा आणि शक्तीस्थान, जाणिवा आणि उणिवा माहिती असतात. भरकटायचं का नाही आणि भरकटल्यास काय परिणाम होणार, हेदेखील समजलेलं असतं.  हे ज्ञानी माणसाबद्दल झालं. आता कर्ममार्गी माणूस कर्तव्य आणि कर्माच्या मर्यादा यांनी बद्ध असतो. तो मुमुक्षु व ज्ञानी माणसाप्रमाणे प्रगल्भ नसला तरीही, कोणतं कर्म श्रेष्ठ व कोणतं कनिष्ठ यांना समजून असतो. आपल्या कर्माच्या कोणत्या हिश्श्याने आपण बद्ध होऊ आणि कोणते कर्म करूनही आपण अबद्ध राहू हे ओळखून, तो एखाद्या ज्ञानी माणसासम कर्मफल त्याग क...

भोग आणि ईश्वर १९०

भोग आणि ईश्वर  १९० सद्गुरुकृपा, साधनेची दृढता हे सर्व आपल्या श्रद्धा आणि विश्वास यावर अवलंबून आहेत. मुळात दृढता ही मनाच्या स्थिरतेवर आणि स्थिरता ही मनाच्या बलावर अवलंबून आहे. मनाचं बल किंवा शक्ती हे, येणारे प्रत्येक आघात, भोग आणि उपभोग यांना पचवून पुढे जाण्याच्या मनाच्या क्षमतेवर अवलंबून आहे. मनाची ही क्षमता मनाला शांत करण्याची हातोटी अर्थात किमया साधण्यावर अवलंबून आहे. खरतर हे एखाद्या अडथळ्याच्या शर्यतीप्रमाणे आहे. पण शर्यतीत आपल्याला पूर्ण कल्पना असते की, आता आपली कसोटी आहे,  शारीरिक व मानसिक कुवतीची, शक्तीची. मात्र तिथे आपल्याला माहीत असतं म्हणजेच काही अंशाने किंवा पूर्णांशाने आपण मनाने तयार असतो की, आता मला शर्यतीत भाग घ्यायचा आहे. त्यासाठी आपण तयारी केलेली असते किंवा करत असतो.  पण जीवनाच्या त्या वाटेवर, जिथे आपल्याला मार्ग माहीत नाही, अडथळे समजत नाहीत, तयारीची माहिती नसते, मनाला कल्पनाच नसते, अश्या सर्व स्थितीत कसोटी देणार कशी, कोण आणि कशाची. म्हणजेच हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, आपण कुठून आलो, कुठे जाणार, काय साध्य करायचं, जे साध्य करायचं त्यातील या एका जन्माच्या प...

अथर्वशीर्ष भावार्थ भाग ९

अथर्वशीर्ष भावार्थ भाग ९ त्वं चत्वारिवाक्पदानि। श्रीगणपती अथर्वशीर्षातील पाचव्या श्लोकातील हा एक भाग आहे. ज्याचा भावार्थ आज जाणून घेऊया. मुळातच श्रीगणेश हा सर्व भाषा, वाङ्मय, साहित्य, संस्कृती, कला, ज्ञान, विज्ञान या सर्वांचा कर्ता आणि धर्ता असल्यामुळे, सर्वांचाच उगम त्यापासून अर्थातच श्रीगणेशापासून होतो.  म्हणजेच आपलं लहानपणापासून बोलायला शिकणं, शब्द, त्यानंतर वाक्य, उच्चारण, त्यांचे अर्थ जाणून संवाद साधणं, प्रश्न समजून उत्तरं देणं, शब्द त्यांचे अर्थ, मतितार्थ, गर्भितार्थ, गुह्यर्थ, गहनार्थ इत्यादी जाणणं, ते जाणून मस्तिष्क मन , हृदय आणि सर्वात शेवटी अंतरात्मा, यामध्ये ते झिरपून, आत्म्याद्वारे, अंततः परम आत्मा त्याचं गुह्य जाणणं आणि ते जाणून त्या परम ज्ञानाचा अर्थ लक्षात येऊन जीवनात संतोष पावणं हे सर्व श्रीगणेशामुळे साध्य होतं. म्हणजेच जर श्रीगणेशाची कृपा लाभली तर, या सर्व गोष्टी साध्य होऊन, जन्माचं सार्थक होतं. हे सर्व श्रीगणेशामुळे साध्य होतं, याचं कारण हे सर्व मूळ श्रीगणेशापासून उत्पन्न झालं. विधात्याने सर्व सृष्टी घडवताना, तर्कसंगत पणे प्रत्येकाला विशिष्ट शक्तींकडून ऊर्जा, चेतन...

भोग आणि ईश्वर १८८

भोग आणि ईश्वर  १८८ सद्गुरुसेवा, सद्गुरूचिंतन आणि सद्गुरूंनी दिलेला मंत्र, या त्रयीच्या आधारे,प्रत्येक जीव आपल्या आयुष्याची गाडी सुरळीत चालवून या जन्मी मुक्तीच्या वाटेवर बराच पुढे जाऊ शकतो. या तीन नियमांचं पालन केलं तर, आपण अनेक संकटं व भोग यातुन सुखरूप बाहेर पडू शकतो, संसारात अर्थात अधिभौतिकात, तरून जाऊ शकतो आणि  अध्यात्मिक मार्गावर उन्नत होऊ शकतो.  हे असं होण्यात कसलीही अडचण खरतर यायला नको. परंतु तरीही हे या सूत्रातील समीकरणानुरूप होत नाही. याचं महत्वाचं कारण या समीकरणात धरलेल्या सूत्रात दोन क्ष आहेत.  ते क्ष, जे आपल्याला गृहीत धरून, योजलेले आहेत, ते व्यक्तिसापेक्ष असल्यामुळे, गणिता तील सुत्रांप्रमाणे, हे समीकरण कार्य करत नाही. अर्थातच प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्व, स्वभाव, गुणविशेष, प्रारब्ध, संचित यानुसार सदर सूत्रातील क्ष ची किंमत,प्रभाव आणि शक्ती बदलत जाते. या सूत्राला चालवायला जरुरी ऊर्जा ही आत्मयज्ञातून प्राप्त होणार असल्यामुळे, वाफेवर वा विजेवर चालणाऱ्या इंजिनाप्रमाणे कार्यरत असतं. म्हणजेच जसा इंजिनाचा वेग हा उपलब्ध वाफेच्या वा विजेच्या प्रमाणाशी समान असल्य...

भोग आणि ईश्वर १८८

भोग आणि ईश्वर  १८८ सत्ययुगापासून या भूमीची ही परंपरा आहे की दारात याचक म्हणून कोणी आलं तर,  त्याला विन्मुख पाठवता कामा नये. या तत्वाचे अनेक दुरुपयोग सुद्धा केले गेले. त्या विषयात न पडता, याचक या शब्दाच्या विवेचनाकडे आपण वळूया. याचक म्हणजे मागणारा,काही मिळावं यासाठी, ज्यांच्याकडे ते आहे, त्यांच्याकडे जाऊन, ती गोष्ट, वस्तू, प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना, अर्चना करणे म्हणजे याचना करणे.  एखादा भुकेला भिक्षेची, अन्नाची प्राप्ती करण्यासाठी, ज्याच्या घरी ते आहे, त्याच्या घरी जाऊन, त्या अन्नाची याचना करतो. एखादा निर्धन, धनवानाकडे धनाची याचना करतो.अज्ञानी माणूस ज्ञानी माणसाकडे ज्ञानाची याचना करतो. म्हणजेच जे नाही आणि ते गरजेचं आहे, ते मागणं म्हणजे याचना करणं.  मुळात याचक बनून याचना त्याच गोष्टीची केली जाते, ज्या गोष्टीची कमतरता आहे. म्हणजेच खरा याचक तोच ज्याला आपल्याकडे नसलेली गोष्ट हवी आहे आणि त्या गोष्टीने समृद्ध असलेला दाता अस्तित्वात  आहे. त्याच प्रमाणे सदर गोष्टींच्या बदल्यात दाता कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही. म्हणजेच दाता याचकाला निरपेक्षपणे सदर गोष्ट पुर...

भोग आणि ईश्वर १८७

 भोग आणि ईश्वर  १८७ परमार्थाच्या मार्गावर प्रत्येकजण,खरतर वाटचाल करत आहे, कळत वा नकळत. कारण जाणतेपणी वा अजाणते पणी प्रत्येकाला भोग भोगूनच पुढे जावं लागतं. भोग आणि उपभोग हे कर्माशी निगडित असल्यामुळे आणि प्रत्येक कर्माचा हिशोब चुकता करावा लागत असल्यामुळे, क्षणक्षण व कणकण आपण मार्गस्थ होतच आहोत,मोक्ष किंवा मुक्तीच्या वाटेकडे.  फरक इतकाच आहे की ज्ञानी मनुष्य त्यावर डोळसपणाने वाटचाल वा मार्गक्रमण करतो आणि अज्ञानी मनुष्य चुकत, धडपडत, खाच खळग्यात फसत, अडकत, टक्के टोणपे खात, पडत ठेचकाळत, दुःख कष्ट याचे घाव झेलत पुढे जातो आणि अर्थातच अत्यंत धीम्या गतीने वाटचाल करतो. म्हणजे थोडक्यात अनेक जन्मात एक पायरीसुद्धा पुढे न सरकता, त्याच ठिकाणी थांबून राहतो वा मागेपुढे होत, अंती तिथेच तिष्ठत राहतो. वास्तविक विधाता मनात असुनही, नियमबद्ध असल्यामुळे, प्रत्यक्ष मदत काहीच करू शकत नाही. अश्या असहाय्य स्थितीतील ईश्वरानेच यातून अज्ञानी जनांना बाहेर काढून मुक्तीची वाट दाखवण्यासाठी, त्या खडतर मार्गावर वाट दाखवणारे वाटाडे अर्थातच गाईड नेमले वा स्वतः त्या रुपात तिथे प्रकट झाला आणि गुरुतत्व, संत महंत, य...