भोग आणि ईश्वर ३४ आतापर्यंत केलेल्या विवेचनात आपल्याला काही गोष्टी कळल्या असतील, काही वळायला लागल्या असतील. तरी काही हळू हळू पचनी पडतील. मुळात या जगात आपलं येणं हे दोन कारणांसाठी आहे, हे आधी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला जन्मतः प्राप्त झालेल्या संचितातील भाग भोगून वा उपभोगून संपवण्यासाठी आणि त्याचबरोबर पुढील कर्मफल योग्य व्हावे याची तजवीज आता करावी यासाठी. मुळात आपण यात जो गोंधळ करतो तो ध्यानात घेतला पाहिजे. आपण आज जे चांगलं कर्म करतो त्याची आणि आज जे भोग भोगतो त्यांना एकत्र करून समीकरण मांडण्याचा प्रयत्न करतो वा मांडतो. गडबड तिथेच होते. साधं उदाहरण देतो.तुमचं आधीचं कर्ज बाकी आहे, ते भरत असताना सध्याच्या गरजा कमी करून ते फेडावं लागेल. त्यामुळे आताची मिळकत जास्त असूनसुद्धा ती पुरणार नाही किंवा पुरली तर हाती काही उरणार नाही. अश्या वेळी आपण सध्याच्या मिळकतीला दोष देऊ का. तर नाही देणार. मग आपण तो दोष आधीच्या शिल्लक कर्जाला देऊ आणि ते फेडू न शकलेल्या स्वतःला. यावर व्यवहारात एकच उपाय सध्याची मिळकत वाढवून आधीचं कर्ज फेडून टाकणं. म्हणजे मिळकतीवरील तो भार दूर करणं. पण हे...