Skip to main content

Posts

श्रीरामरक्षा स्तोत्रातील एक श्लोक आणि त्याचा भावार्थ भाग १

  श्रीरामरक्षा स्तोत्रातील एक श्लोक आणि त्याचा भावार्थ भाग १ आपदाम्-अपहर्तारम् दातारं सर्व संपदां । लोकाभिरामं श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ॥ मराठी मध्ये आपण आपदा आणि विपदा असे दोन शब्द बरेचवेळा एकत्र वापरतो. कदाचीत दोन्हीमध्ये तसा भेद  वाटत नाही तरीही यात मूळ भेद  आहे. आपदा म्हणजे नैसर्गिक संकटं जसं  पूर, भूकंप, वादळ इत्यादी. ज्याला शास्त्राच्या भाषेत अरिष्ट म्हणतात. जे पूर्णतः मानवी कर्म व प्रयत्न यांच्या पलीकडे आहे. म्हणजेच ज्यामध्ये मानव पराधीन असतो वा त्याला या संकटातून मार्ग काढणं व्यक्तिगत पातळीवर अशक्य असतं . विपदा म्हणजे व्यक्तिगत आयुष्यात घडणाऱ्या वाईट, चुकीच्या, अनिष्ट परिणाम करणाऱ्या, व्यक्तिगत क्षती पोचवणाऱ्या घटना. आपदा मुळातच सार्वजनिक प्रारब्ध वा निर्बल ग्रहशक्तीचा परिणाम असतो. म्हणजेच नीचतम ग्रह बलिष्ठ असतात आणि पुण्यकारक ग्रह हे निर्बल असतात. अश्यावेळी सार्वजनिक संकटं जसं पूर, वादळ, साथीचे रोग, युद्ध ,  भूकंप इत्यादी येतात. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते. अश्यावेळी तुमच्या प्रारब्धात जितकी शक्ती असेल आणि त...

कन्हैयालाल माणेकलाल तथा के. एम. मुंशी

 कन्हैयालाल माणेकलाल तथा के. एम. मुंशी (३० डिसेंबर १८८७ ते ८ फेब्रुवारी, १९७१) नेहरूंनी बळी घेतलेल्या अनेक व्यक्तिमत्वांमध्ये कुलपती कन्हैलाल माणेकलाल तथा के. एम. मुंशी यांचा नंबर सरदार पटेल, सुभाषबाबू यांच्या नंतर बराच वरचा लागतो. नेहरूंची  राजकीय महत्वाकांक्षा, सत्तालोलुपता आणि त्या अनुषंगाने येणारी अपरिहार्यता याचे अनेक जण बळी ठरलेत. पण के. एम. मुंशी हे यातील अग्रणी नाव असण्याचं कारणच वा पातकच  तसं आहे.  ते म्हणजे उध्वस्त झालेलं सोमनाथ मंदिर बांधण्याचं महत्तम कार्य त्यांनी नेहरूंचा विरोध असताना आणि सरदार पटेल यांच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करून सरदार पटेल यांच्या आत्म्याला मरणोत्तर सद्गती प्रप्त करून दिली. कारण या मंदिर उभारणीच्या कार्याला सरदार पटेल , मुंशीजीं आणि त्याच्या प्राणपतिष्ठापनेच्या कार्याला तात्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांच्या भूमिकेला नेहरूंनी प्रचंड विरोध करून हे काम न होऊ देण्यासाठी त्यावेळी आकाशपाताळ एक केलं होतं . तरीही सरदार पटेलांच्या पश्चात ते पूर्ण झालं याचं खूप मोठं श्रेय मुंशीजींना जातं .  या सोमनाथ मंदिरा...

जगणं, आनंद आणि आपण. !!

  जगणं, आनंद आणि आपण. !!   आजच एक जण म्हणाला कि, कालच्या पेक्षा आजचा दिवस छान गेला. मी म्हटलं उद्याचा दिवस अजुन उत्तम जाईल, फक्त तुलना आजच्या दिवसाशी नको करुस. कारण तुलना केली कि त्या आनंदातला आनंद निघून जातो. कोणताही आनंद तुलनात्मकरित्या तपासला कि, त्यातील आनंद कमी वा जास्त वाटतो वा भासतो. पण तो तसा असतोच असं नाही. म्हणून निर्भेळ आनंद् घ्यायचा असेल तर तुलना न करता आताचा आनंद हा अतुलनीय आहे हे समजावं. त्यामुळे एकतर आहे तो आनंद योग्यरित्या जगता येतो आणि प्रत्येक आनंद हा हवाहवासा वाटतो. मन पुढच्या प्रत्येक आनंदात तितक्याच उत्साहाने सामिल होऊन जगण्यातील गोडी टिकून राहाते. अन्यथा होतं काय की एखाद्या सुमधूर गीतात मन अडकून राहातं आणि त्याआधीची वा त्या नंतरची कोणतीही गाणी एकतर आवडत नाहीत आणि जर आवडली तर त्याइतकं नाही पण हे छान आहे असं मत मन बनवून मोकळ होतं. म्हणून तुलनात्मकरित्या जगलेला आनंद , मग तो कोणत्याही गोष्टीचा असो, मापात मोजला जाऊ शकतो. त्यानंतर मनाला त्याच प्रकारच्या आनंदाचा शोध घेण्याचा मोह व व्यसन जडतं. त्यामुळे एकतर तसा आनंद मिळेपर्यंत वा तसा क्षण जगण्यात येईपर्यं...

🌹 *श्री विष्णु सहस्त्रनामावलिः* 🌹

🌹 *श्री विष्णु सहस्त्रनामावलिः* 🌹 १. ॐ विश्वस्मै नमः । २.ॐ विष्णवे नमः । ३. ॐ वषट्काराय नमः । ४. ॐ भूतभव्यभवत्प्रभवे नमः । ५. ॐ भूतकृते नमः । ६. ॐ भूतभृते नमः । ७. ॐ भावाय नमः । ८. ॐ भूतात्मने नमः । ९. ॐ भूतभावनाय नमः । १०. ॐ पूतात्मने नमः । ११. ॐ परमात्मने नमः । १२. ॐ मुक्तानां परमायै गतये नमः । १३. ॐ अव्ययाय नमः । १४. ॐ पुरुषाय नमः । १५. ॐ साक्षिणे नमः । १६. ॐ क्षेत्रज्ञाय नमः । १७. ॐ अक्षराय नमः । १८. ॐ योगाय नमः । १९. ॐ योगिविदां नेत्रे नमः । २०. ॐ प्रधानपुरुषेश्वराय नमः । २१. ॐ नारसिंहवपुषे नमः । २२. ॐ श्रीमते नमः । २३. ॐ केशवाय नमः । २४. ॐ पुरुषोत्तमाय नमः । २५. ॐ सर्वस्मै नमः । २६. ॐ शर्वाय नमः । २७. ॐ शिवाय नमः । २८. ॐ स्थाणवे नमः । २९. ॐ भूतादये नमः । ३०. ॐ निधयेऽव्ययाय नमः । ३१. ॐ समभवाय नमः । ३२. ॐ भावनाय नमः । ३३. ॐ भर्त्रे नमः । ३४. ॐ प्रभवाय नमः । ३५. ॐ प्रभवे नमः । ३६. ॐ ईश्वराय नमः । ३७. ॐ स्वयम्भुवे नमः । ३८. ॐ शम्भवे नमः । ३९. ॐ आदित्याय नमः । ४०. ॐ पुष्कराक्षाय नमः । ४१. ॐ महास्वनाय नमः । ४२. ॐ अनादिनिधनाय नमः । ४३. ॐ धात्रे नमः । ४४. ॐ विधात्रे नमः । ४५. ॐ धातवे उ...

गीत विश्लेषण : गीत ॥ श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम ॥भाग ४

गीत विश्लेषण :  गीत  ॥ श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम ॥भाग ४ श्री रामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणं । नव कञ्ज लोचन कञ्ज मुख कर कञ्ज पद कञ्जारुणं ॥१॥ कन्दर्प अगणित अमित छबी नव नील नीरद सुन्दरं । पटपीत मानहुँ तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरं ॥२॥ भज दीनबन्धु दिनेश दानव दैत्य वंश निकन्दनं । रघुनन्द आनन्द कन्द कोसल​ चन्द दशरथ नन्दनं ॥३॥ सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अङ्ग विभूषणं । अजानु भुज शर चाप धर संग्राम जीत खरदूषणं ॥४॥ इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनं । मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलदल गंजनं ॥५॥ इथे भजणे याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.  भ शब्दापासून भगवंत आणि त्याची प्रेमाने आळवणी करणारा भक्त हे शब्द तयार झाले. ज्या क्षणी कल्पनेने परम आत्म्याने  मायारूप जग उत्पन्न केले त्याच क्षणी त्या मायेच्या आधीन राहून आपल्या भक्तीने भगवंतापासून भिन्न झालेला, परम आत्म्याचाच अंश,, भक्तरूपात त्या अभिन्न अंगाकडे अर्थात पूर्ण स्वरूपाकडे जाण्यासाठी आतुर असा भक्तदेखील निर्माण झाला. मुळात फक्त ईश्वर प्राप्ती ही मूळ संकल्पना आणि उद्देश आत्म्याचा आहे. परंतु पंचमहाभूत...

गीत विश्लेषण : गीत ॥ श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम ॥भाग २

गीत विश्लेषण :  गीत  ॥ श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम ॥भाग २ श्री रामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणं । नव कञ्ज लोचन कञ्ज मुख कर कञ्ज पद कञ्जारुणं ॥१॥ कन्दर्प अगणित अमित छबी नव नील नीरद सुन्दरं । पटपीत मानहुँ तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरं ॥२॥ भज दीनबन्धु दिनेश दानव दैत्य वंश निकन्दनं । रघुनन्द आनन्द कन्द कोसल​ चन्द दशरथ नन्दनं ॥३॥ सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अङ्ग विभूषणं । अजानु भुज शर चाप धर संग्राम जीत खरदूषणं ॥४॥ इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनं । मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलदल गंजनं ॥५॥ भक्ताला भगवंताचं दर्शन व्हावं हा योग भक्ताच्या भक्तीतील तन्मयतेवर लीनतेवर अवलंबून असतो. अर्थात प्रारब्ध , संचित आणि भाग्य हे देखील यात महत्वाचं असतंच हे नक्की. अनेक जन्मांच्या पूर्वपुण्याईवर या दर्शनाचा लाभ अवलंबून असतो. ते दर्शन होणं हे महत्भाग्य आणि असं दर्शन घडल्यावर या जन्मात काही करण्याचं राहात नाही. मुळात प्रत्यक्ष महर्षी वाल्मिकीं एक दिव्य महर्षी. एका सामान्य वाल्या कोळ्याचा एक महर्षी होतो हे योग्य अनुसंधान, साधना, तपश्चर्या, योग, चिकाटी याची प्रचिती व प...

गीत विश्लेषण : गीत ॥ श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम ॥भाग ३

गीत विश्लेषण :  गीत  ॥ श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम ॥भाग ३ श्री रामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणं । नव कञ्ज लोचन कञ्ज मुख कर कञ्ज पद कञ्जारुणं ॥१॥ कन्दर्प अगणित अमित छबी नव नील नीरद सुन्दरं । पटपीत मानहुँ तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरं ॥२॥ भज दीनबन्धु दिनेश दानव दैत्य वंश निकन्दनं । रघुनन्द आनन्द कन्द कोसल​ चन्द दशरथ नन्दनं ॥३॥ सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अङ्ग विभूषणं । अजानु भुज शर चाप धर संग्राम जीत खरदूषणं ॥४॥ इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनं । मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलदल गंजनं ॥५॥ खरंतर स्वतः गोस्वामी तुलशीदास यांनी प्रत्यक्ष रामाचे दर्शन घेऊन या गीताची रचना केले आहे हे नक्की.  परंतु त्याच वेळी हे गीत समस्त राम भक्तांना प्रेरणादायी ठरावं म्हणून मनाला संबोधून वदलं  असल्याचं दर्शवून ही रचना केली आहे हे पदोपदी जाणवतं.  म्हणूनच तसा उल्लेख ते सुरवातीलाच करतात.  स्वतःच्या मनाला, श्रीरामांचं अलौकिक दिव्य दर्शन आत्मा मनाला संबोधून, वर्णीत आहे ही संकल्पना म्हणजेच आत्मा हा मनाच्या पार जाऊन, तिथून त्रयस्थपणे मनाला या दिव्य दर्शन...