ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास ९७ महाराजांनी मला देखील आसन ग्रहण करण्यास सांगितले. महाराजांनी वसिष्ठ ऋषिना आपल्या व आपल्या परिवाराच्या कुशलते विषयी विचारल्यावर महर्षि दुर्वास म्हणाले " हे राजन मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. फार पूर्वी देव आणि दैत्य यांच्यात युद्ध चालू होत. देवांच्या सेन्याकडून मार खाऊन, दैत्य जीव वाचवण्यासाठी भृगु ऋषींच्या आश्रमात पोहोचले. तेथे भृगु ऋषींची धर्मपत्नी हजर होती. भृगु ऋषी काही आश्रमाबाहेर गेले होते. भृगु पत्नीने आश्रमात शरण घेण्यास आलेल्या दैत्यांना जागा दिली. त्या दैत्यांना शोधत आलेल्या भगवान विष्णूनी जेंव्हा जाणलं कि भृगूपत्नीने त्या दैत्यांना आश्रय दिलाय. त्यांना राग आला. आणि त्यांनी सुदर्शन चक्राने भृगूपत्नीचे मस्तक धडावेगळे केले. त्यावेळी तेथे आलेल्या भृगु ऋषींनी ते दृश्य पाहिलं आणि भगवान जनार्दन अर्थात नारायण यांना शाप दिला कि, माझ्या निर्दोष पत्नीला तुम्ही मारलत त्यामुळे मी तुम्हाला शाप देतो कि तुम्हाला सुद्धा मृत्युलोकीं जन्म घेऊन अनेक वर्षांपर्यंत पत्नी वियोग सहन करावा लागेल. यानंतर भगवान विष्णू तिथून अंतर्...