Skip to main content

जानकी पुनःवनवास ९६

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ९६

मातेला आश्रमात जाताना पाहून अत्यंत दुःखी आणि व्याकूळ अन्तःकरणाने लक्ष्मणाने सुमंताना धिम्या गतिचा रथ गतीने चालवण्यास सांगितले.  लक्ष्मण अत्यंत दुःखी आणि संतप्त देखिल होता.  हा संताप कदाचित परिस्थितिवश अगतिकतेचा आणि अपरिहार्यतेचा होता. स्वतःचा होता, अश्या निंदनीय कृत्यात सहभाग असण्याचा होता, कदाचित ज्येष्ठ भ्राता यानी महाराज म्हणून घेतलेल्या निर्णयाचा होता आणि तो आपल्याला अमलात आणावा लागला याचासुद्धा होता.

सुमन्त परिस्थिति जाणुन म्हणाले

"लक्ष्मणा कदाचित तुला या परिस्थितिचा आणि या निर्णयाचा राग आला असेल. पण धर्मपरायण महाराजांनी मोठ्या कष्टाने आणि विचारपूर्वक हा निर्णय घेतला असणार."

" लोकांच्या मतावर आणि कल्पनेवर आधारित निर्णयाला सुयोग्य आणि  धर्माधिष्ठित निर्णय कस क़ाय म्हणायच आर्य. विचार हा सर्व बाजुनी घेऊन मग घेतलेला निर्णय हा सुयोग्य म्हणता येईल. लोकमताचा आदर ही एक वेगळी गोष्ट आहे पण कल्पनेच्या जोरावर केलेल्या मताला किती किंमत द्यावी हे प्रभुना ज्ञात आहे व ते न्यायी आहेत. तरीही."

"लक्ष्मणा महाराज खुप न्यायनिष्ठुर आहेत. ते सीतेलाच क़ाय पण प्रत्यक्ष तुला , भरत व शत्रुघ्न याना देखील त्यागणार आहेत. ही नियति आहे  लक्ष्मणा तू नियति, प्रारब्ध आणि दैव जाणत नाहीस किंवा आता क्रोध व दुःख यानी ग्रस्त असल्यामुळे तू विचार करू शकत नाहीस. पण खरोखर प्रारब्धाचे भोग हे न चुकणारे असतात हे मात्र नक्की. पण वचनबद्धतेने खरतर ही गोष्ट मी कोणालाही सांगू शकत नाही. माझ्याकडून तस वचनं स्वर्गीय महाराज दशरथ यानी घेतल होत की ही गोष्ट मी जनात कुठेही वदणार नाही. पण तुझ्या या कथनामुळे मी दिलेल्या वचनाला त्यागुन महाराज दशरथ यांची क्षमा मागून तुला हे गुह्य सांगण्यास विवश झालो आहे.

" आर्य सुमन्त आपण क़ाय म्हणत आहात ते काहीही कळत नाहीये आणि लक्षातदेखील येत नाहीये. कृपया विस्तार पूर्वक सांगाव"

" हे एक गुह्य आहे आणि हे तूदेखिल कोणालाही अगदी कोणालाही सांगणार नाहीस हे वचन मला दे. कारण आता आपण जनात नाही तर आरण्यात आहोत म्हणून मी तुला हे सांगू शकेन."

सुमन्त पुढे वदले

"लक्ष्मणा आज मला महर्षि दुर्वास यानी आपले पूज्य पिताश्री महाराज दशरथ याना सांगितलेले शब्द आठवले. नियति ही कधीही चुकत नाही हेच ख़र आहे.  लक्ष्मणा आम्ही , म्हणजे मी व स्वर्गीय महाराज दशरथ एकदा महर्षि वसिष्ठ याना,  काही कार्यानिमित्त भेटण्यास गेलो असताना तिथे महर्षि दुर्वास देखील होते.  महाराजांनी दोघानाही यथोचित प्रणाम केला. आम्हास बसावयास आसन देऊन वसिष्ठ ऋषिनी क्षेमकुशल विचारल. महाराजांनी मला देखील आसन ग्रहण करण्यास सांगितले.महाराजांनी वसिष्ठ ऋषिना आपल्या व आपल्या परिवाराच्या कुशलते विषयी विचारल्यावर महर्षि दुर्वास म्हणाले "

" हे राजन मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक"

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...