Skip to main content

Posts

स्त्री

  स्त्री    असते का खरच अबला ती का अनंत काळची माता ती एकाजन्मी साधते अनेक नाती असते का खरच .........   जी आदिरूप आदिशक्ती जी आत्मतेजाची प्रचिती जी स्वयं  वैराग्याची मूर्ती जी स्वप्रकाशाची सत्कीर्ती असते का खरच  ...   धीराची आहे जी सगुणी बाळासाठी आहे हिरकणी प्रसंगी निर्मोही जी निर्गुणी परी अंतर्यामी जी बहुगुणी असते का खरच   ......   पाळण्याची नाळ जिच्या हाती शिवाची स्वप्रकट जी शक्ती मायेचीही तीच आहे उत्पत्ती जगाचा अवोद्धहार जिच्या हाती असते का खरच .......   तिच्या अजोड शक्तीला नमन तिच्या अपूर्व धैर्याला प्रणाम संयत आत्मविश्वासाला सलाम विराट सामर्थ्याला  सादर वंदन असते का खरच .....                    प्रसन्न आठवले

स्वप्न या मानसी

  स्वप्न या मानसी       प्राण हां चालला तू ये ना जरा   वीज ही दौड़ते  तार झंकारली   प्राण हा ……  कोण मी काय मी  तूच हे जाणले स्वप्न या मानसी तूच साकारले गीत ते या मनी प्रीत होऊंन ये तू मला साथ दे प्रीत आकारु दे    प्राण हा …… हे कसे साहू  मी आज तू जाण गे या मना सावरा ये प्रिये आज गे तू तूझे चांदणे ये मला वाहण्या  तूझ्या  प्रेमाचे गूज आज ये सांगण्या प्राण हा …… मन जरी हे तूझे आज मी चोरले तूही हे जाणले मीही हे जाणले गूजनी भ्रमर हां फूल ते बाहतो तू मनी स्वप्न हे पाहसी जाणतो   प्राण हा ……  गंध हां प्रीतीचा पसरला दूर अन तू मला अर्पिले बावरे आज  मन तू अशी लाजूनी शोधीसी  चाँद तो  तो  तूला पाहूनी जाण हे लाजतो     प्राण हा ……  सानूले स्वप्न हे पाहिले मी असे  येउदे  लोचनी ते तुझ्या माऊनी   गीत ये गाऊ हे  जन्मजन्मि पुन्हा प्रीत ही जपवूनि ठेवू हृदयी पुन्हा   प्राण हा ……   कवी    ...

तूझे पाहणे

    तूझे पाहणे    तूझे पाहणे हे मना लोभले या डोळ्यात जग आहे सामावले तूझे पाहणे .....   जणू  या जीवनी मन हे वृंदावनी प्रीत ही वाटते जाग या जीवनी तूझे पाहणे ......   तू उगा लाजली लाज आधारली तूझ्या डोळ्यात स्वप्ने ही आकारली तूझे पाहणे ...   कवी : प्रसन्न आठवले

तूझी साथ

  तूझी साथ    तूझी साथ जर या जीवनी येई पहाट नवी  घेउनी  तूझी साथ .....   आला जसा बहर फूला तैसे मी पाहिले तूला तो एक वार नजरेतूनी  तूझी साथ .....   तू लावीले  हे वेड जे दिससी तू मज चहुकडे आता पुन्हा येसी फिरुनी तूझी साथ .......   मन का पुन्हा तूज बाहते ही नजर तूला का पाहते ये साथ देण्या या जीवनी तूझी साथ ......   कवी : प्रसन्न आठवले 

अश्क

  अश्क    उनकी यादों में जो कूछ अश्क निकल पड़े गर वो गैर थे तो ये क्यूँ आँखोसे चल पड़े उनकी यादो में ....   जिंदगी सोंपदी  हमने  उनके हातोंमे लेकिन कातिलों की तरहां रास्ते में वो चल पड़े उनकी यादो में .....   गैर तो गैर थे उनसे क्यों हो गीला आपको मानते थे अपना हम तो झूठे पड़े उनकी यादों में .......   फिक्र इस बात की है नहीं आज भी  राहे उल्फत में  देखा हम अकेले ही  खड़े उनकी यादों में ........   बस उन्हें दे खूशी और हमें  सारे गम क्यों की मुश्किल में तो रहना हमे ही पड़े उनकी यादो में ...........   गझलकार  : प्रसन्न आठवले

वेणू

      वेणू       वेणू तुझा वाजवी कृष्णा उरली ग्रीष्माचि तृष्णा   वेणू कृष्णा कृष्णा वेणू मूरली पावा वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू वेणू वेणू     उधळीत किरणे रवि हां निघाला तव प्रकाशे भूभार सजला तरी न का रे येई जाग तुजला कृष्णा  वेणू कृष्णा कृष्णा वेणू मूरली पावा वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू वेणू वेणू   मूरलीने निज मूरलीने जाग मनास बाधा मूरलीचा माग वेड लावुनि जीवास या रे जासी कुठे कृष्णा  वेणू कृष्णा कृष्णा वेणू मूरली पावा वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू वेणू वेणू     कवी : प्रसन्न आठवले     

२३ वर्षे मैत्रीची -2

२३ वर्षे  मैत्रीची - २ इतका विश्वास आंधळेपणाने पूर्ण टाकला रे I know it डिअर सॉरी नाही तुला आहे रे तो हक्क कधीच दिलाय तुला . कारण तुझा प्रत्येक शब्द आवडतो त्यात भाव शुद्ध असतो खरी शुद्ध मैत्री आहे मित्र या शब्दाचा किती छान अर्थ सांगितलास इतक्या वर्षांपूर्वी.  आणि खर तर तू काहीही बोलालास तरी  फरक नाही पडणार.  का ग अरे इतका आत आहेस मनाच्या अगदी आपला वाटतोस एक विचारू  काय रे इतकी वर्ष झाली,  पण अजुन काही वेगळ विचारायच असेल तर परवानगी का मागतोस.  खर सांगू हो सांग .. हसलास का रे तुझ बोलण किती निर्मळ आहे,  किती शुद्ध,  अगदी आहे तस,  23 वर्षांपूर्वीची कानन वा 23 वर्ष घेतलीस या नावाने हाक मारायला धन्य झाला जन्म आज.  त्या नावावर हक्क नव्हता माझा कधीच.  फक्त तनु या नावाशी संबंध होता. त्याच साठी आणि त्याच आठवणी होत्या असेल पण मी सुद्धा कधी हां विचार केला नाही की तू कधीही त्या नावाने हाक का मारत नाहीस अरे हो वेळ आहे ना तुला आता फक्त तुझ्या साठीच वेळ आहे प्रणाली नाही आता ,....... ती त्याच्या ...