Skip to main content

२३ वर्षे मैत्रीची -2


२३ वर्षे  मैत्रीची - २

इतका विश्वास आंधळेपणाने पूर्ण टाकला रे

I know it डिअर सॉरी

नाही तुला आहे रे तो हक्क कधीच दिलाय तुला . कारण तुझा प्रत्येक शब्द आवडतो त्यात भाव शुद्ध असतो खरी शुद्ध मैत्री आहे मित्र या शब्दाचा किती छान अर्थ सांगितलास इतक्या वर्षांपूर्वी.  आणि खर तर तू काहीही बोलालास तरी  फरक नाही पडणार. 
का ग
अरे इतका आत आहेस मनाच्या अगदी आपला वाटतोस
एक विचारू 
काय रे इतकी वर्ष झाली,  पण अजुन काही वेगळ विचारायच असेल तर परवानगी का मागतोस. 

खर सांगू

हो सांग
..
हसलास का रे
तुझ बोलण किती निर्मळ आहे,  किती शुद्ध,  अगदी आहे तस,  23 वर्षांपूर्वीची कानन

वा 23 वर्ष घेतलीस या नावाने हाक मारायला धन्य झाला जन्म आज. 


त्या नावावर हक्क नव्हता माझा कधीच.  फक्त तनु या नावाशी संबंध होता. त्याच साठी आणि त्याच आठवणी होत्या

असेल पण मी सुद्धा कधी हां विचार केला नाही की तू कधीही त्या नावाने हाक का मारत नाहीस अरे हो वेळ आहे ना तुला

आता फक्त तुझ्या साठीच वेळ आहे प्रणाली नाही आता ,.......
ती त्याच्या खांद्यावर थोपटते त्याचा हात हातात घेतला आणि

खरच तीला जाऊन ... आजच 5 वर्ष झाली आणि प्रत्येक दिवशी एक जाणिव झाली ………

ती त्याच्या हातावर हात ठेवते

आल लक्षात

बोलू दे ग आज कोणाशीच नाही बोललो.  अनय हल्ली ……….

अनय तुझा ख़ास मित्र ना 

 हो तो भेटला नाही बऱ्याच वर्षात त्यामुळे तू एकच आहेस

हो आठवतय मला 5 वर्षांपूर्वी किती कठीण गेल तूला सावारायला

हो तेंव्हापासून प्रत्येक क्षण मी तूला अनुभवलय

प्रस्  ……

 हो… …  असो , खुप त्रास झाला सावरायला

आणि त्यात तूम्हा पुरुषाना शारीरिक कणखरपणा असला तरी मनाने तूम्ही खुप ह्ळवे असता तूम्ही,  म्हणून छोट्या गोष्टीना तुम्हाला साथ लागते स्त्रियांची त्याशिवाय तुम्ही खुप अपूर्ण आहात. 

आणि आम्हाला अस वाटत आयुष्यभर की तुम्हालाच आमची गरज
असते.

तस नाही रे,  तू म्हणतोस ती गरज ही शारीरिक आणि मानसिक,  दोन्हीप्रकारची असते .  त्यात तुम्ही कायम गल्लत करता आयुष्यभर आणि जेंव्हा कळत तेंव्हा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असता तुम्ही,  सर्व निसटून गेलेल असत,  घरंगळून गेलेला काळ परत येत नाही,  सूपातल already जात्यात पडलेल असत,  हाती फक्त पीठ सरलेल्या आयुष्याच आणि पश्चाताप फक्त.  पण तू तसा नव्हतास

परत

त्याच्या तोंडावर ठेवते

बर बोल
 

तू खरच सर्वच बाबतीत खूप छान होतास रे

मी जीवंत आहे अजुन 

 त्याला जोरात फटका मारत

अजुन थट्टा करतोस अरे होतास म्हणजे आपण नवीन मित्र होतो तेंव्हा खूप आश्चर्य वाटायच मला.

तुला exact  काय वाटायच ग माझ्या बद्दल आता तरी सांग अस म्हणत डोळा मारतो
परत दोन रट्टे मारते

लागतात तुझे हात च्यायला चॅट वर बर होत

म्हणून जास्त शेफ़ारुन गेलास आता शांत बसशील

वाटत तूला अस होईल

परत दोन फटके

त्याला पण ठोकत होतीस का ग कस सहन केल असेल

काही नाही तुम्ही सर्व प्रोफेशनल्स एकच

तो पण actor होता

पण मार खाल्ला का त्याने

नाही खुप शहाणा होता तो एकदम साधा

गरीब होता i mean झाला तो तुझ्या ठोकण्याने

त्याला कधी माराव लागल नाही

मुकाट्याने हात जोडून उभा राहात असेल बोला राणी सरकार काय कारण आहे आपल्या रागाच् अस म्हणत असेल नाहीतर बर त्याला माहित होत की फटकेच फटके नाही ऐकल तर
 

नाही तो खरच खुप शहाणा होता
 

हं

कारे एकदम हं केलस
 

अग ज्याला तू निवडलस तो जगात  बेस्टच् असणार

हो खरच तो बेस्टच होता

तुला आठवतो का ग

प्रस् मला स्वताला कशी विसरेन मी अरे

तनु i am sry
नाही मी थोड़ी

असुदे

क्रमशः 
 
 

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...