Skip to main content

Posts

कान्हा तव मुरली

 ।।कान्हा तव मुरली ।। मी तर व्याकूळ तूज भेटीला तू नच सोडी कारे तिजला तू तर कायम तिजला हरखून धरिसी अधरी जैसी प्रियतम ।। मी नच बोलिन तूज संगे रे जर ती आहे प्यारी तूजला माझे मी पण गेले विसरून तूज भेटीमी आहे आतूर ।। तरी नच येसी माझ्या भेटी कारण संगे आहे वैरीण कृष्ण सखा करी मन्दस्मित अंन वदले ऐसे त्या राधेला ।। तू तर प्रियतम माझी असशी कैसे मी गुज सांगू तुजला आतूर नच मी तूज भेटीला का हे भासे कायम तूजला ।। मी तर आतूर जैसा भ्रमरची करितो गुंजन पाहून कमला राधा बोले तरीही कान्हा का नच पटते तव बोलाला ।। का मज भासे तू तर वदसी सदा सदा जे रुचते मजला कान्हा पकडून बोले राधे ये मी पटवून देइ तुजला ।।   दावे मग तो रूप साजिरे  देखे राधा त्या हृदयातच पाहुनी आपूले रूप देखणे राधा लाजून हो वनमाला ।।  कवी : प्रसन्न आठवले 

जीवन सुगंध -५

जीवन सुगंध -५ माया ही विश्वाची चालक असल्याचा आभास निर्माण करते पण प्रत्यक्ष परिस्थिति भिन्न असली पाहिजे कारण जो चालक असतो तो जनक नियंता आणि अन्तःकर्तासुद्धा असतो म्हणजेच निर्माता नियंता आणि उद्धारकर्ता देखील असतो . आता या निकषात माया बसते का ते पाहू. अस समजा की एक पाण्याच्या ओहोळामध्ये एक कीड़ा पडलाय. यात माया काय करेल ती त्या किड्याला झुलवेल  आणि नंतर त्याचा अंत काळ आला की सोडून जाईल दुसऱ्या लक्षा कड़े. आता याच जागी भगवंत काय करतील त्याला बचावाचे काही मार्ग उपस्थित करतील. पण तेहि त्याचे काही आयुष्य शिल्लक असेल. पण जर अंत समय निकट असेल तर त्याच्या पुण्याई नुसार काही अशी व्यवस्था करतील की ज्यामुळे त्याचा अन्तःकाळ सुकर होईल. आणि तो प्राणी मोक्षाला अथवा त्याच्या पूर्व कर्मा नुसार पुढील जन्मी सहज जाईल. पण हे सर्व तेंव्हाच शक्यआहे जेंव्हा त्या प्राण्याचा स्वतःचा कर्माचा साठा पुण्यरूपात शिल्लक असेल. असही कर्म प्राणी तेंव्हाच करेल जेंव्हा तो मायेच्या बंधनात न अडकता कर्म करेल. आता माया कशी काम करते ते पाहू. तुम्ही सरळ मार्गी गृहस्थ आहात अश्या वेळेला तुम्हाला विचलित कर...

श्रावण

श्रावण  हिरवाळीच्या गालीच्यातून तृणपुष्पांची शाल पांघरुन जलबिंदूची चादर ओढून श्रावण आला बरसत बरसत ।। आकाशाच्या चारी दिशानी निसर्ग आपूल्या अष्ट भुजानी सोडून दिधल्या अनंत धारा श्रावण आला बरसत बरसत ।। नभो मंडळी दाटी झाली मेघांची ती गर्दी जमली वसुंधरा ही तृप्त जाहली श्रावण आला बरसत बरसत ।। ऋतुपर्व हे सुरु जाहले लगबग लगबग सारे करती दशोदिशाना हर्ष भरुनी श्रावण आला बरसत बरसत ।। आता सारे फुलले मोदे रंगांचीही झाली उधळण निसर्गातही अवघी धुंदी श्रावण आला बरसत बरसत ।। कवी : प्रसन्न आठवले 

कवडसा - 23

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव ,    तसा  घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …२२ शीतल : तुला मला या प्रकारे भेटावस का वाटल ( हसून ) का असा stunt करण्याची सवय आहे तुला.  योगेन्द्र : (शांत पणे हसत ) मला असे सुखद वाटणारे धक्के i mean pleasant surprises द्यायला आवडत. in fact its my way of presenting things .  शीतल : वा म्हणजे स्वतःच्या मर्जीने घडवलास की काय accident,  मला भेटण्यासाठी ( हसते) योगेन्द्र : मी देवाला इतकंच सांगितल की मला शीतल समर यांना भेटायचय तेहि hospital मधे . Thats all i did . पुढच त्याने arrange केल .  शीतल : देवा वर विश्वास दिसतोय तुझा.   देव भोळा वगैरे नाहीस ना.  योगेन्द्र : नाही देवभोळा निश्चित नाही या जगात कर्म श्रेष्ठ मानतो मी. देव आणि दैव हे कर्माच्याच गती वर अवलंबून असत ही माझी धारणा आहे. sorry पहिल्याच दिवशी lecture थोड़ जास्त झाल.  शीतल : अरे नाही पण खुप छान बोलतोस तू . अस जाणवतय की,  त...

जीवन सुगंध - ४

जीवन सुगंध - ४ आता या मायेचा विचार करुया. ही माया एका अर्थी भगवंत निर्मित म्हणजे विश्वाचा आधार, पण दुसऱ्या अर्थी वाटेच दूसर टोक, म्हणजे निश्चितच विचार करायला लावणारी गोष्ट किंवा बाब. पण ती संपूर्ण विश्वाला सुद्धा वाटेच्या दुसऱ्या टोकाला म्हणजेच भगवंताच्या विरुद्ध बाजूला अर्थातच इश्वरापासून लांब घेऊन जाते. इतकी प्रचंड ताकद तिच्यापाशी  कशी. त्यासाठी तिच्या निर्मितीचा विचार करू . मुळातच हे विश्व भगवंताला  झालेल्या मोहातून निर्माण झाल. त्यामुळे हाच मोह माया रुपात पूर्ण विश्वात संचारला. हीच ती माया. आता तर्काने एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जेंव्हा हां मोहच जर निर्मितीच कारण आहे तर हे विश्व सुरळीत चालू राहाव यासाठी ही गरजेचीच आहे हे पटत.  पण त्यात ही मेख पण आहे की जर तुम्हाला या विश्वाच्या पसाऱ्यातच अडकायच असेल तर कोणाची ना नाही.  मग या मायेचा तुम्ही विचार केला नाहीत तरी चालेल.  कारण प्रत्येक जण प्रत्येक क्षणी त्या मायेच्या आधीन आहे आणि जातोच आहे. ही माया म्हणजेच जिला भगवंताची सावली असही म्हटल जात.  तर तर्काने हेही  जाणू शकता की सावली म्हणजे...

जीवन सुगंध - ३

जीवन सुगंध - ३ सरळ घडणारी कोणतीही गोष्ट नेमकी आपल्याच बाबतीत वाकडी का घडते हा प्रश्न पडलाय ना. आणि इतरांच्या बाबतीत सरळ कस  घडत हे कोड पण पड़ल असेल तर त्याच उत्तर ऐक . त्याच खर तर खूप सोप्प उत्तर आहे की ते आधीच मायेच्या अधीन असतात प्रश्न असतो तो तुमच्या आधीन होण्याचा. त्यासाठी तुमचा बुद्धिभेद करण्याचा हां प्रयत्न असतो. ते ज्याना आपण याबाबतीत आदर्श मानतो त्यांची निर्मितीच यासाठी झालेली असते . त्याना आपसूक मिळणाऱ्या गोष्टी आणि आपल्याला न मिळालेल्या किंवा मिळून सुद्धा आपण आपल्या चूकीशिवाय गमावलेल्या गोष्टी या सर्वाची निर्मितीच मुळात आपल्याला मूळ स्वरूपाला म्हणजेच मगाशी सांगितलेल्या वाटेच्या दुसऱ्या टोकाकडे तुम्हाला जाऊ न देण्याचा मायेचा खटाटोप. बर यात तीच यशस्वी होण न होण हे तस बघितल तर आहे  आपल्याच हातात.  कारण विधात्याने सर्व घडवलय वा ठरवलय ते कर्माधिष्टित. म्हणजे एका अर्थाने तुझ्याच हातात. पण……  हा पणच खुप महत्वचा ठरतो आयुष्य घडवायला . पुन्हा घडल की बिघडल याची परिमाण जी जगाची वेगळी आणि  नियंत्याची वेगळी. यात चूक कोण बरोबर कोण हे सुद्धा प्रत्येक जण आपल्...

जीवन सुगंध - २

जीवन सुगंध - २ आणि हां प्रवास तरी कसा, किती, कुठे, कोणाबरोबर, किती, वाटेत कोण भेटणार, ते  किती काळ बरोबर हे पण माहित नाही. बर एक प्रकारे माहित नाही हे छान आहे.  कारण त्यामुळे जगण्याला एक अर्थ आहे आणि पुढे जगण्याची जिद्द कायम आहे.  पण त्याची दूसरी बाजू ही की जेंव्हा निराशा दुःख अपमान या गोष्टी समोर येतात, तेंव्हा अस वाटत की हे आधीच कळल असत तर कष्टतरी वाचले असते.  पण मग या सगळ्यात जगण्याचा निश्चीत अर्थ काय,  मार्ग कोणता,  वाटचाल कशी करावी,  या सर्व बाजूंचा थोड़ा स्वार्थी होऊन विचार करावा हे एक उत्तर सापड़तय. स्वार्थ कसा सांगतो.  त्या आधी या विश्वाच एक कोड खरच कोड आहे की एक सहज अनूभवाव अस काही आहे हे आपण पाहुया.  ही एक लेखमाला असेल अस म्हटल तर वावग ठरू नये.  या विश्वाच्या निर्मितीच एक कारण जे सांगितल जाते आणि पुराणात सुद्धा लिहिलेल वाचायला मिळत ते हे की, जगननियंत्याला एक सहज पडलेल स्वप्न आहे त्यामुळेच ते भास् आणि सत्य यामधला एक जोड रस्ता आहे. त्याच एक टोक म्हणजे माया आणि दूसर टोक म्हणजे स्वतः नियंता. आता कोण कूठून निघा...