Skip to main content

श्रीकृष्ण नीति ८

श्रीकृष्ण नीति ८
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

कालपर्यंत आपण श्रीकृष्ण व श्रीराम याना भिन्न रुपात पाहात होतो. त्यांचं भिन्नत्व हे मुख्यt: देह भिन्नतेमुळे, त्याकारणे भूमिका सुद्धा वेगवेगळ्या होत्या. काळाच्या दोन वेगवेगळ्या बिंदुंवर भगवंतानी घेतलेली दोन रूपे . एकच आत्मा दोन भिन्न प्रकृती स्वरुपात प्रकट होऊन, काळाला सुसंगत अश्या भूमिकेतून, आपल्या उद्देश्याप्रत गेले वा पोहोचते झाले. 

असो तात्पुरतं इतकंच समजूया की, सध्या आपण काळाच्या त्या भागात आहोत अर्थात द्वापारयुगामध्ये, जिथे मुल्यांची पुनर्माण्डणी सुरु झाली. म्हणून त्या काळाचा मागोवा घेणाऱ्या काही घटनांचा तपशील आज मांडतो. इथे काही अचंबित करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या पुढीलप्रमाणे 

- सत्यवतीच्याच लग्नाआधीच्या पुत्रापासून म्हणजेच व्यासऋषिपासून पुढे वंशावळ चालू होते, जेंव्हा सत्यवतीची दोन्ही मूल चित्रांगद आणि विचित्रवीर्य हे असफल असतात, पुढे वंश चालवायला. त्यातील चित्रांगद हा अहंकारी असल्यामुळे, त्याच नावाच्या गन्धर्वा हातून मारला जातो आणि विचित्रवीर्य हा संततिसाठी असमर्थ होता. मग महर्षी वेदव्यास याना (सत्यवतीच्या प्रथम विवाहापासून अर्थात पराशर ऋषींपासून असलेल्या पुत्राला) पाचारण करून २ राजकन्यापासून (ज्या भीष्मानी जिंकून आणलेल्या असतात. वास्तविक ३ राजकन्या असतात.पण अंबा पलायन करते,म्हणून २) दोन पुत्र होतात.

एक धृतराष्ट्र, जो जन्मांध असतो व पंडु आणि तिसरा दासीपुत्र विदुर (कारण अंबा आपल्या जागी एका दासीची नेमणूक करून आपण निघून जाते. वास्तविक अर्थाने या संततीचा कुरु वंशाशी काहीच संबंध नाही. कारण व्यास हे पराशर ऋषि आणि सत्यवती यांचे पुत्र आहेत,तरीही ते कुरुवंशीय म्हणून मान्यता पावले. भीष्मादिकांनीसुद्धा हे त्याकाळी स्वीकारलं. कारण नियोग पद्धतीने संतती प्राप्ती त्याकाळी सर्वमान्य पद्धती होती. (यावर पुढे कधीतरी लिहीन. पण ही पद्धत आताच्या विर्यदान किंवा कृत्रिम गर्भधारणा याची थोडी अप्रगत पण शास्त्र मान्य पद्धती होती) 

वास्तविक पराशर ऋषि हे वसिष्ठ ऋषींचे नातू. पण त्या पराशर ऋषींचा पुत्र असलेले वेदव्यास, कुरु वंश पुढे नेऊ शकत होते, हे शास्त्र मान्य होतं आणि स्वीकारलं जात होतं. पण यात अजुन एक गोष्ट सिद्ध होते की, स्त्रीला त्याकाळी इतका अधिकार होता कि तिची आधीच्या लग्नाची संतती सुद्धा दुसऱ्या लग्नाच्या नंतर संतती निर्मितीचा अधिकार प्राप्ति करू शकत होती, तिच्या नन्तरच्या विवाहात. विषय थोड़ा खोलात जाऊन बघावा लागेल. (नन्तर एक लेखप्रपंच करीन यावर महाभारत कालीन स्त्रियां व त्यांचे तात्कालीन अधिकार).

- कुंतीला सर्व पुत्र हे तिच्या पतिपासून न होता, तिला मिळालेल्या वरदानातून जन्माला आले. इतकं स्वातंत्र्य स्त्रियांना होतं आणि त्यालाही राजमान्यता होती. यात एक बाब जाणवते ती म्हणजे कोणतीही नवीन वा वेगळी अश्या सर्व गोष्टी राजमान्य झाल्या की समाज मान्य होत असाव्यात आपसूक. हा परिपाठ वास्तविक रामायणाच्या पूर्ण विसंगत आहे. तिथे एक धोबी ठरवतो की, राजाने केलेलं योग्य की अयोग्य ( हा पुन्हा एक वेगळा विषय आहे विवादास्पद मुद्दा नन्तर जमल्यास यावर प्रयत्न करीन लिहिण्याचा ). 

- स्त्रियांना पती निवडायचं स्वातंत्र्य म्हणजेच स्वयंवराचा अधिकार होता..

- हे सर्व आज इथे विस्ताराने लिहिण्याचे कारण की महाभारतातील काळ, जो श्रीकृष्णाचा समकाल आहे , तो किती चित्र विचित्र समाज, लोक , रीतिरिवाज यानी भरलेला व भारलेला होता. तो रामायणाहून सर्वार्थाने किती वेगळा होता. म्हणजे पूर्णतः भिन्न आणि अत्यंत क्लिष्ट वातावरण, असलेला काळ.

अश्या वातावरणात असताना, त्यावर मात करून, शत्रूला नमोहरम करण्यासाठी, तितकीच हुशारी, राजकारणी व्रुत्ती आणि शक्त्या व युक्तयांचा वापर हे सर्व नवीन तंत्र, नवीन पद्धतीने जन्माला घालून, आजपर्यंत न वापरल्या गेलेल्या क्लूपत्या वापरणं, हे खुप मोठ कार्य भगवंतानी केलय. एका अर्थी राजकारणातले बरेचसे डावपेच श्रीकृष्णानी त्यावेळीच जन्माला घातले आहेत. 

वरील सर्व गोष्टींचा जरूर विचार करा. आजच्या पुरतं इथेच थांबूया. उद्याच्या भागात पुढे जाऊया. आजच्या लेखावर सखोल विचार करा.

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

© प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
१०/०५/२०२०
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

भाग अष्टम समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...