Skip to main content

भोग आणि ईश्वर ६२७

भोग आणि ईश्वर ६२७
 
©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
 
आज जवळजवळ तेरा महिन्यांच्या अंतरा नंतर, पुन्हा हा विषय सुरू करताना, कशी सुरुवात होईल, काय लिहिलं जाईल, असे अनेक विचार येत होते. पण दुसरा एक विचार या सर्वांना छेद देऊन पुढे आला. तो म्हणजे एवढे ६२६ भाग सलग ६२६ दिवस, ज्या सद्गुरूंनी लिहून घेतले. तेच माझे श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज, इथून पुढचे भाग, लिहून घेतील. कारण आधीचे ६२६ भाग त्यांनीच, कोणत्याही अभ्यासाशिवाय, माझ्याकडून लीलया लिहून घेतले. म्हणजे हे एक वर्षांपेक्षा जास्त काळ न लिहिण्याची आणि आता पुन्हा लिहिण्याची प्रेरणा तेच आहेत. 

म्हणून नव्या दमाने, भाग ६२७ पासून पुन्हा लिहायला घेण्याची सद्बुद्धी,त्यांनीच दिली,हे जाणून आणि समजून लगेच बसलो. फक्त एक आहे विषय कुठे होता आणि पुन्हा कुठून सुरू करायचां, हा विचार करण्या पेक्षा, जे, जसं जमेल तसं आणि तिथून सुरू करुया. जे योग्य आणि सर्वांना गरजेचं आहे, तेच महाराज मांडून घेतील. त्यामुळे आता श्रीगणेश करूया आणि पुन्हा एकदा भोग आणि ईश्वर या विषयाला सुरुवात करुया. जय श्रीराम

खरतर भोग आणि उपभोग या आपल्या जीवनातील दोन अश्या गोष्टी आहेत, ज्या आपली बुध्दी, मन, देह या सर्वांना मिळून एकत्रितपणे किंवा वेगवेगळ्या प्रकारे, कार्याला जुंपते. नव्हे तर माया आपल्या प्रभावाने, या सर्वांना तसं वागण्यास भाग पाडते. यातील देह, बुद्धी आणि याचा, या जड तत्वाच्या असल्या कारणाने, त्या वळवण्यात सहज साध्य नसतात. पण मन हे इंद्रिय असं आहे की, ते अत्यंत चंचल आहे आणि कोणत्याही भावात अती शीघ्र विचलित होऊन, स्वतःसह इतर इंद्रिय, बुद्धी, याचा व संपूर्ण देह याना कार्याला जुंपतं. 

विशेषतः क्रोध आणि काम हे दोन भाव इतके विलक्षण प्रभावी आहेत की जे, इतर सर्व भावांना भस्मित, भ्रमित करून, त्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून किंवा त्यांना नष्ट करून, बुद्धी, देह आणि इंद्रिय याना संमोहित करून टाकतात. सर्वप्रथम यात बुद्धीचा ग्रास जातो. तदनंतर देह, इंद्रिय याना हा दाह सहन करावा लागतो. हे सर्व इतक्या सहज आणि क्षणिक असतं की, विवेकाला विचार करायला, वेळ मिळत नाही. 

जर देहाला, काही विशिष्ट परिस्थिती मुळे, या कार्यात सहभागी होणं शक्य नसेल तर, मनात आणि बुद्धीत, त्याची बीजं रुजलेली राहून, परिस्थिती वश होताच, देह आपलं कार्य करून हेतू साध्य करतो. यामधे क्रोध हा अती विषारी आणि अती जलद अर्थात शीघ्र प्रभावी आहे. सहसा तो कोणत्याही क्षणी, स्थळी व स्थितीत आपला प्रभाव दाखवून मन, बुद्धी व देह याना काबूत घेतो. कारण क्रोध हा एक अग्नी आहे. तो कधीही काहीही जाळण्यास, नष्ट करण्यास आणि आपल्या अग्निपाषात प्रसंग, व्यक्ती, आजूबाजूची परिस्थिती याना स्वाहा करण्यास तत्पर आणि सक्षम असतो.

अश्या स्थितीत, व्यक्तीचा स्वतः वर ताबा राहत नाही. व्यक्तीला, त्या स्थितीत आपल्या कृतीवर नियंत्रण असत नाही. किंबहुना मनासह संपूर्ण देह त्या संमोहात असतो. याचं सर्वात महत्वाचं कारण,मनाप्रमाणेच,बुद्धी हे देखील, मेंदूशी बद्ध असूनही,चल तत्वाशी निगडित आहे. त्यामुळे, मनाच्या प्रभावात त्वरित, सर्व प्रथम बुद्धी येते. 

नंतर हे दोन मिळून देहाला आपल्या प्रभावात आणतात. कारण मेंदूत व देहात पाझरणारे स्त्राव अर्थात हार्मोन्स, जे मज्जासंस्था, चेतापेशी याना प्रभावित करून, कार्य करवून घेतात, ते स्त्राव विशिष्ट, संवेदना, लहरी, कंपनं यांच्याशी निगडित असतात.

पण मन आणि देह यांना नियंत्रणात ठेवू शकणारा विवेक बुद्धीच्या स्थानी असतो. जो मनाच्या वा मनाकडून आलेल्या प्रत्येक लहरी, कंपनं आणि भावसंवेदना याना बुद्धीच्या कक्षेत पाठवण्याआधी त्यांना सर्व बाजूने व सर्व तऱ्हेने, तपासतो. त्यांची योग्यायोग्य चिकित्सा करतो आणि त्यातून जे हितकारक असेल त्यानुसार बुद्धीला ग्रहण करण्यास देतो. 

असा हा सूक्ष्म रूप विवेकाचा पडदा, मन आणि बुद्धी यांच्यामधे कसा उभा करावा आणि त्याला कार्याला लावून, मनाचा अती शीघ्र संदेश, कसा पडताळून पहावा, यावर चिंतन पुढच्या भागात करूया. पण तोपर्यंत आपण नामाचा उतारा घेतच राहूया. 

भोग आणि ईश्वर पुस्तकं ३ व ४ यांच्यावर काम सुरू आहे आणि लवकरच, त्यांच्या प्रकाशनाबद्दल सूचित करण्यात येईल. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. 

त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/१०/२०२३
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...