Skip to main content

आध्यात्म विराम ७

आध्यात्म विराम ७

कर्मगतीच्या भोगात व उपभोगात जीव आपला मार्ग, गती, स्थिती आणि स्थान यातील काहीही जाणत नाही. सर्वसामान्यपणे या विश्वातील किंवा या भूलोकीचे जीव, आपल्या आजच्या स्थितीला,भोग, उपभोग यांना जाणतो आणि मन बुद्धी याद्वारे त्यांचेच चिंतन, चिरंतन करतो. ह्याला आत्मकेंद्री जीव म्हणातात. पण ही आत्म केंद्रित वृत्ती, जीवाला भोगातून बाहेर पडून उपभोगांना प्राप्त करण्याकडे नेण्याचा प्रयत्न करते.

ही बुद्धी व वृत्ती, अनंत काळ याच भूतलावर भोग व उपभोग यांच्या चक्रात, जीवाला गुंतवून ठेवते. देह, बुद्धी, मन व वाचा, याच आत्मकेंद्रित वृत्तीतून कर्म करतात. प्रत्येक जन्मात, देह सोडताना, हेच संचित घेऊन, आत्मा व मनोमय कोष, आपला पुढील प्रवास सुरू करतात.
 
अनंताकडून अनंताकडे नेणारा हा प्रवास असतो. यामध्ये फक्त आणि फक्त, आज भोगत असलेले भोग,जीवाला ग्रासतात आणि इतर जनांना प्राप्त झालेले किंवा होणारे उपभोग, मनाला व्यथित, क्षतिग्रस्त, प्रेरित, उद्युक्त करून कर्मरत ठेवतात. 

इथे होणारी जीवाची तगमग, तळमळ, अतृप्त इच्छा, अतृप्त भावना या अनिष्ट आणि इष्ट मार्गाकडे नेणाऱ्या असतात. परंतु सर्वसामान्य जीव, यातील भविष्याची अनिश्चितता, कर्माचा आलेख, भोग आणि उपभोग यांची प्राप्ती होणं वा निसटून जाणं, यातच मग्न असतात.

 त्यांच्या लेखी, जीवन ही फक्त आणि फक्त या देहात करावयाची, मिळवावयाची, साधायची आणि जोडायची गोष्ट असते. त्यामुळे भोगांची प्राप्ती झाली की, खिन्नता आणि उपभोग निसटून गेले तरीही अपार खिन्नता हीच सदा सर्वकाळ मनःस्थिती असते. 

याची जाणीव विधात्याला असते किंवा समस्त जगता तील जीवांची चिंता हाच विधात्याच्या नित्य कर्माचा भाग आहे. यामधे विधाता एका विशिष्ट नियमाने व नीतीने बद्ध असतो. त्यामुळे, एखाद्या सत्पुरुष व साधुसंत यांसम, विधाता हा सहज आणि सरसकट सर्वांना सहाय्य करू शकत नाही. पण ही विधात्याची अगतिकता नसते. तर तो ईश्वरी व्यवस्थेचा भाग असतो. त्यातूनच त्याने निवडलेला, योजलेला व प्रकृती धर्म पाळून निर्मिलेला एक मार्ग आहे. 

पण त्यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. तोपर्यंत त्या अविनाशी, अच्युत, अनादी ईश्वराचं गुणगान, त्याच्या नामाच्या माध्यमातून करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...