Skip to main content

आध्यात्म विराम ४

आध्यात्म विराम ४ (नवीन लेखमाला)

कालचाच विषय पुढे नेऊ. याच कारणाने असे खरे संत, साधू वा महाराज आणि स्वामी आपल्या भक्तांना वा साधकांना किंवा त्यांच्याकडे आलेल्या सामान्य जनांना, इतकी कृपा कधीच करत नाहीत, ज्यायोगे, तो जीव, प्रपंचात, कर्मसागरात हरवून जाईल आणि मूळ उद्देशा पासून इतका दूर जाईल की, तो भवसागरात, बुडून जाईल. 

असे ज्ञानी जन, आपल्या सद्गुरू रूप अधिकारात, इतकीच कृपा करतात की, भक्त वा साधक, निराशेने, दुःखातिरेकाने, आत्मवंचनेने मार्गभ्रष्ट न होता, मार्गात राहतील. एकदा सदर जीव मार्गात राहिला की, प्रारब्ध, संचित आणि उत्तम कर्म योगाने, तो पुढे जात राहील. ही कृपेची पद्धती अद्भुत असते. सद्गुरू सर्वज्ञानी असल्या कारणाने, कधी कधी कृपा वा सहाय्य न करण्यात सुद्धा, साधकाचं हित आहे, हे जाणल्यामुळे, अशी कृपा न करण्याचा मार्ग सुद्धा अश्या ज्ञानी जनांकडून योजला जातो

काही उदाहरणं घेऊ म्हणजे मुद्दा समजेल आणि पुढे जाता येईल. आपण दुःखातून, वाईट परिस्थितीतून, आयुष्यातील अत्यंत कमजोर काळातून जात असताना. सद्गुरू आपल्या ज्ञानाची, धैर्याची, चिकाटीची, स्थिरतेची परीक्षा पाहताना, कृपा न करण्याचा निर्णय घेतात. असा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा, त्यांचं सदर जीवाकडे दुर्लक्ष झालेलं नसतं. उलट अश्या साधकांकडे त्यांचं जास्त प्रकर्षाने लक्ष असतं. 

लहानपणी मुलांना चालायची सवय लावण्यासाठी एखादा गाडा किंवा walker दिला जातो. त्यामागचा उद्देश, त्यांना चालण्याची सवय व्हावी, त्याचप्रमाणे पाय व देह तयार व्हावा, हा असतो. पण ठराविक काळानंतर हा गाडा काढून घेतला नाही, तर सुट्ट चालण्याची सवय न होता, मुल कायमचं त्यावर अवलंबून राहू शकतं. हे त्याच्या पुढील काळासाठी घातक आहे. 

हे जाणूनच, माता पिता त्याला सुरवातीच्या उभ राहून, चालण्याच्या सरावाच्या काळात, पडू देतात, पण जाणीव पूर्वक, मदत करत नाहीत वा हात देत नाहीत. कारण एकदा तशी सवय लागली की, ते मूल कधीच स्वतःचं स्वतः उठून चालू शकणार नाही, हे आई जरूर जाणते. 
मग कल्पना करा, या विश्वाची जननी आणि चैतन्य रूपातील त्याचे प्रतिनिधी असलेले ईश्वरी अंश मोक्षाच्या मार्गातील जीवांना फुकाचे आणि अवाजवी सहाय्य कसे काय करतील. पण असे न करण्यात आपले हित आहे, हे आपल्या ध्यानात येण्याची जरुरी आहे. 

दुसरी गोष्ट, चालायला व्यवस्थित शिकलेल्या मुलाला, पडल्यानंतर, सहाय्याची अतिरिक्त आवश्यकता नाही आणि ते मूल आपणहून, उठून पुन्हा चालायला सुरूवात करू शकतं. हेदेखील माता जाणते. म्हणून मनातून, त्या मुलाची करुणा असूनही, त्याला मुद्दामहून सहाय्य न करण्याचं हित ती माता जपते. 

विषयाची व्याप्ती मोठी असल्यामुळे, आपण हा उद्या विषय पुढे नेऊ. पण अश्या ज्ञानी जनांचे आभार मानत राहू आणि त्यांच्या कृपा कटाक्षात राहण्याचा, नित्य प्रयत्न करत राहू. 

याव्यतिरिक्त काही जीव, हे आत्ममार्गात, अग्रेसर आहेत, हे ईश्वर किंवा ईश्वरी अंश जाणत असतात. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...