Skip to main content

भोग आणि ईश्वर ६२६

भोग आणि ईश्वर ६२६
 
सुखाची प्रत्येकाची व्याख्या ही, वेगवेगळी असते. अगदी एका व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा ती काळानुरूप बदलती असते. उदाहरणार्थ, सामान्य परिस्थितीत व्यक्तीच्या अपेक्षांची उंची मर्यादित असते किंवा असू शकते. स्वप्न आणि वास्तव यातील भेद, परिस्थिती जाणत असलेलं मन, ओळखत असल्यामुळे, अपेक्षा मोघम असतात, पण स्वप्न वेगळी आणि मोठी असू शकतात.

त्यांच्या पूर्ततेसाठी, मनुष्य अनेक खटपटी लटपटी करत असतो. किंबहुना सांसारिक जीवनाचा तो एक अविभाज्य भाग आहे. जीवनात अनेक बदलातून जाताना, अनेकविध चढउतार पाहताना, शिखर आणि पायथा, या दोन्हींचा अनुभव घेत घेत पुढे जावचं लागतं. मन हे सर्व स्थितीत तितकच अविरत पुढे जात राहील, असं होत नाही. याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे, मनाची चंचलता. 

ही चंचलता लवचिकता ते अती स्थिरता या दोन टोकां पर्यंत ताणली जाते. काही मनं पटकन परिस्थितीचा आलेख जाणून, त्यानुसार बदलून, पुढे जातात अर्थात adjust होतात. पण ही elasticity गरजेप्रमाणे असेल तर, योग्य असते आणि प्रसंगी परिस्थितीला वळवण्याची ताकद निर्माण करू शकते. पण ही लवचिकता फक्त परिस्थिती नुसार वळण्यापुरती असेल, तर माणूस फक्त परिस्थितीचे फटके खात आयुष्य जगतो. 

कधी कधी चंचलता ही लवचिकता भासते किंवा तशी प्रतीत होते. पण त्याला लवचिकता म्हणता येणार नाही. याचं कारण म्हणजे, चंचल मन प्रत्येक क्षणी वेगळा विचार करतं आणि ते निर्णयास अक्षम असतं. पण लवचिक मन, हे आलेल्या परिस्थितीला वेळेत ओळखून, काळाची गरज वा आवश्यकता यानुसार योग्य तो निर्णय वेळेत घेऊन, त्यानुसार अमलबजावणी करण्यात पूर्ण सक्षम असतं. अर्थात असं लवचिक मन सुद्धा काही काही उद्देशाने व त्यानुसार धोरणाने बांधलेले वा स्थिर जरूर असते. 

त्यावर अजून विचार पुढच्या लेखात करून हा विषय पुढे नेऊया. अर्थात तोपर्यंत त्या मनाला नामाचं खत पाणी देतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. 

त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/१०/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...