Skip to main content

भोग आणि ईश्वर २५

भोग आणि ईश्वर  २५
   
मनाला स्थिरता येण्याची पहिली पायरी त्याला मनसोक्त बागडू देणं. कदाचित हा थोडा वेगळा प्रयोग वाटेल.  पण यातून एक गोष्ट कळते ती म्हणजे असं बागड म्हटलं तरी मन तसं करेल असं नाही. कारण मन हे बंडखोर आणि व्रात्य मुलासारखं असतं.

ज्यावेळी आपण त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा जास्त उसळी मारतं. पण ज्यावेळी त्याला जाणीवपूर्वक निरंकुश करू त्यावेळी ते फार बंडखोरी करत नाही, असा माझा अनुभव आहे. तरीही प्रत्येकाच्या मूळ वृत्ती व स्वभावानुसार या अनुभवात फरक पडू शकतो. पण मूळ तत्व तेच आहे की, जेंव्हा आपण काही न करता बसण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ते जास्त त्रास देतं, नको ते विचार, नको त्या गोष्टी विचारात येऊन, जाणवून देतात की, आम्ही स्वस्थ बसणार नाही. 

आपण हाच धागा पकडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून त्याचं  काही दिवस निरीक्षण करा., ज्यामुळे विचारांची दिशा, मनाचा स्वैर ओढा कुठे आहे याचा स्वतःला अंदाज येईल. कारण ज्यावेळी आपण शांत असतो, अर्थात बाह्यांतरी जेंव्हा आपण शांत असतो, त्यावेळी आत त्या मनाला खदखद होत असते. पण एक लक्षात घ्या, हा प्रयोग सतत काही दिवस जाणीवपूर्वक करा. 

याचं कारण असं की, ज्यावेळी एका ठराविक काळापुरती देहाची साथ मनाला मिळणार नाही, त्यावेळी त्या ठराविक काळापुरती मनाला जाणीव होईल की इथे एवढा वेळ आपण फक्त आतल्या आत खेळू शकतो. बाह्य जगताकडून अर्थात देह आणि मेंदू यांकडून काहीही प्रोत्साहन वा साथ मिळणार नाही. 

अगदी ताजं उदाहरण देतो, लॉकडाऊन नन्तर काही काळ मजा वाटली, घरी बसून कार्यालयीन कामं करण्याची, पण नन्तर  आठ पंधरा दिवसनांनंतर ते घरी राहून काम करणं हे त्रासदायक वाटायला लागलं. त्याचप्रमाणे काही दिवस मुक्त बागडणारं मन काही दिवसानंतर छळायचं थांबून चलपणा व चंचलता कमी करेल. कारण मुक्त विचारांच्या गतीने ते स्वतः त्रस्त होऊन हळूहळू मार्गस्थ अर्थात, आपल्याला त्याला ज्या ध्येयाकडे न्यायचं आहे, त्यावर येण्यास राजी होईल. 

थोडक्यात समर्थांनी समजावून सांगितलेलं ऐकण्याच्या स्थितीला येईल. आता हा प्रयोग सुरू केल्यानंतर याची दुसरी पायरी म्हणजे ज्या गोष्टी मनाला आवडत नाहीत, त्यातील अर्थातच सुधारणात्मक (म्हणजे नकारात्मक नाही पण प्रायोगिक तत्वावर सकारात्मक काही गोष्टी) मुद्दाम करायच्या, अगदी जाणीवपूर्वक.

उदाहरणार्थ, खूप वेळा तब्येत व्यवस्थित असूनसुद्धा एखादया वेळी आपल्याला आळसामुळे बाहेर जायचा किंवा एखादी गोष्ट करण्याचा कंटाळा येतो. त्यावेळी मुद्दाम ती गोष्ट करायची, म्हणजे मुद्दाम पाच दहा मिनिटं का होईना मुद्दाम एक चक्कर मारून यायचं. मी माझंच उदाहरण देतो हा प्रयोग मी लहानपणी मुद्दाम केला वा करत असे. मला फार पूर्वी कारल्याची भाजी आवडत नसे, पण मुद्दाम ती खाऊन पहायचो, सुरवातीला कमी कमी पण मुद्दाम करायचो, नन्तर आपोआप ती आवडायला लागली आणि आता कारल्याची भाजी नित्य गोडीने खातो.

याचं सर्वात मोठं तर्कशास्त्र असं की, विचारांची लढाई विचारातून करायची, पण त्याला कृतीची जोड द्यायची. अर्थात हे करताना हे भान राहिलं पाहिजे की आपण काही चुकीचं करत नाही. कारण नाहीतर चला मला दारू आवडत नाही तर पिऊन पाहू मुद्दाम मनाविरुद्ध, असले विघातक प्रयोग टाळून, जे सकारात्मक परिणाम करणारे प्रयोग आहेत ते, करायला सुरुवात करावी. चंचल मनाला, मनाविरुद्धच्या कृतीने मुद्दाम डिवचून सुरळीत करण्याचा एक प्रयोग.

पहा करून. बघूया पुढची पायरी पुढील भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२५/१२/२०२०

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...