Skip to main content

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ५


गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ५

संपूर्ण गीत

कैवल्याच्या
चांदण्याला भुकेला
चकोर
चंद्र व्हा हो
पांडुरंगा, मन करा थोर

बालवयी खेळी रमलो,
तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे
पैलतीर

जन्ममरण नको आता, नको
येरझार
नको ऐहिकाचा नाथा
व्यर्थ बडिवार

चराचरा पार न्या हो
जाहला उशीर
'पांडुरंग' 'पांडुरंग'.
मन करा थोर

गीत : अशोकजी परांजपे
संगीत आणि स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी

आणि मी कर्मदारिद्री यातून काहीही बोध न घेता बालपण वाया घालवलं. व्यर्थ काळ घालवला. हे बालपणाचं झालं त्यांनतर येणारा आयुष्यातील सर्वात महत्वाचा काळ म्हणजे तरुणपणाचा. हा खरा असा काळ की ज्या काळात शारीरिक व मानसिक शक्ती ही चरमसीमेवर म्हणजेच शिखरावर असतात. या वयात अनेक गोष्टी या , शारीरिक व मानसिक ताकदीने सहजसाध्य असतात. माणूस या गुणांमुळे मूळ प्रवाहातून बाजूला जातो.

या अनेक गुणांबरोबर वा सकारात्मक गोष्टींबरोबर मोह , लोभ, क्रोध, मद, मत्सर याला सहज बळी पडण्याचं वय. यामुळेच प्रवाहपतीत होण्याचं भय तितकंच अधिक असतं. म्हणून जे वाटत होतं वा घडू नये असं तुला ईश्वरा वाटलं होतं तेच घडलंय. संपूर्ण तरुणपण म्हणजेच तारुण्य या मोह , क्रोध, लोभ या अवगुणांना खांद्यावर वाहून त्या पखालीनी पापाचं ओझं वाढवून पुढच्या अनेक जन्माची जणू सोयच करून ठेवली आहे.

या संपूर्ण आयुष्याच्या पटावर सर्व गोष्टी वासनेच्या प्रवाहात वाहवत जाऊन सर्व आयुष्य वाया घालवल्यावर, आता वृद्धापकाळात या जीवनसागराचा किनारा पैलतीर दिसायला लागल्यावर या कर्मदारिद्री जीवनाची जास्त प्रकर्षाने जाणीव होऊ लागली आहे देवा. म्हणून तुझ्या एका कृपाकटाक्षासाठी मन तळमळ करत आहे.

या जीवनातील उणेपणाची आणि त्यातील मोह माया आदी बद्धध करणाऱ्या बाबींची जाणीव झाल्यावर व या सर्वात तूच एक नावाडी आहेस हे समजल्यावर आता पुन्हा या जन्म व मृत्यू या लक्ष लक्ष योनींच्या महाचक्रात अडकण्याची या आत्म्याची इच्छा नाही. तू आता सर्व उलगडून दाखवलस आणि कर्मफलांची ओझी वाहण्यात काय धन्यता आहे हे कळल्यावर, फक्त एकच मागणं आहे देवा, या पुनरपी जननं पुनरपी मरणं या येरझाऱ्या आता नकोत देवा. नका यामध्ये आता अडकवू या आत्म्याला.

ऐहिक सुखाची परमावधी झाली या आयुष्यात. सर्व आयुष्य जणू उपभोग घेत घालवलंय. या ऐहिक जगाचा पोकळपणा पाहिलाय. त्या पोकळ वाश्याला व्यर्थ बांडगुळ म्हणून चिकटून राहण्यात आणि त्याचा व्यर्थ बडेजाव करण्यात काही हशील नाही हे जाणवतंय देवा. म्हणून त्याचा सुद्धा सोस व मोह आता नको वाटतो. नको देवा ऐहिक सुखातील वा भौतिक जगतातील काही काहीसुद्धा नकोय. हे ऐहिकाचं अवडंबर दूर करा पांडुरंगा , पंढरीराया. इतकं तरी निदान मान्य करा , या पामराचं.

क्रमशः

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२७/०१/२०१९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...