Skip to main content

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग १

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग १

संपूर्ण गीत

कैवल्याच्या
चांदण्याला भुकेला
चकोर
चंद्र व्हा हो
पांडुरंगा, मन करा थोर

बालवयी खेळी रमलो,
तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे
पैलतीर

जन्ममरण नको आता, नको
येरझार
नको ऐहिकाचा नाथा
व्यर्थ बडिवार

चराचरा पार न्या हो
जाहला उशीर
'पांडुरंग' 'पांडुरंग'.
मन करा थोर

गीत : अशोकजी परांजपे
संगीत आणि स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी

मानव जन्माचं सार्थक आणि अंतिम ध्येय , आपल्याला ज्ञात असो वा नसो , एकच असत ते म्हणजे मोक्ष , मुक्ती, हृदयांतरी वसलेला आत्मा आपला पिता व माता सर्वकाही असलेल्या नारायणाला सुपूर्द करणं हेच असत. निदान तसा विधात्याच्या रचनेचा भाग वा उद्देश असतो. याची जाणीव वा जाण असणं हीच एक मोठी भाग्यकारक गोष्ट आहे.

हा एक योग आहे. या रचनेत प्राणी कर्मगतीनुसार एक एक क्रम वा पद पुढे पुढे सरकतो. कदाचित अनेक पद वा योजनं दूर सुद्धा जाऊ शकतो. नव्हे सर्वसामान्यपणे जातोच जातो. कारण आपलं इप्सित वा ठिकाण माहीत नसलेला यात्री जसा कुठेही विश्राम घेतो, काही आलेलं स्वीकारतो, काही मिळेल ते धन्य मानतो वा कशात कशात गुंतत असतो. त्याच्या लेखी थांबलो तीच आपली दिशा , तेच आपलं स्थान वा तेच ध्येय.

हा योग देखील मात्र कर्मानेच लेखी येतो. पण मूळ उद्देश वा अंतिम ध्येय वा साध्य माहीत नसल्यामुळे व्यर्थ फेऱ्यात अडकलेला जीव हा जत्रेतील पाळण्यात अडकल्यासारखा असतो. जसा पाळणा हलेलं , फिरेल वा वेग घेईल त्यानुसार त्याला कोणताही पर्याय नसल्यामुळे फिरत राहणे गरजेचचं असतं. पाप वा पुण्य या दोन्ही मनाच्या अवस्था आहेत कारण विधात्याच्या नजरेत फक्त कर्म आणि त्याचे फल याच गोष्टी असतात. किंबहुना त्याच त्याने या जगाचा मार्गदर्शक म्हणून नेमलेल्या आहेत.

यावर अजून माया ही एक अजब गोष्ट निर्मात्याच्या कल्पनेतून प्राण्याच्या मार्गात जन्म ते मृत्यू येऊन उभी असते. ती बुद्धीचा असा काही भेद करते की प्राणी भास व आभास या मितीत अडकून आपली कक्षा विसरून जन्म मृत्यच्या फेऱ्यात अडकून जातो. बर यात माया स्वतः काही करत नाही. ती बुद्धिभेदाने फक्त कर्म करण्यास , न करण्यास वा अस्थिर करण्यास प्रवृत्त वा निवृत्त करते. हीच माया सजीव वा निर्जीव दोन्हीना समान न्यायात तोलून आपले इप्सित साध्य करते.

क्रमशः

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०१/२०१९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...