Skip to main content

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

संपूर्ण गीत

कैवल्याच्या
चांदण्याला भुकेला
चकोर
चंद्र व्हा हो
पांडुरंगा, मन करा थोर

बालवयी खेळी रमलो,
तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे
पैलतीर

जन्ममरण नको आता, नको
येरझार
नको ऐहिकाचा नाथा
व्यर्थ बडिवार

चराचरा पार न्या हो
जाहला उशीर
'पांडुरंग' 'पांडुरंग'.
मन करा थोर

गीत : अशोकजी परांजपे
संगीत आणि स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी

भक्तीचा प्रत्यय आलेला भक्त आणि या अवीट गोडीची चव चाखलेला खरा ईश्वरप्रेमी ज्या  पोटतिडकीने साद घालतो आणि आर्ततेने विनवतो, ती भक्ताची विनवणी या गीताच्या माध्यमातून गीतकार अशोकजी परांजपे आपल्यासमोर मांडत आहेत. तंतोतंत त्याच भावाने.

कैवल्य प्रत्येक भक्ताची ती आस, जी आत्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य साधणारा योग. हा योग अनेक जन्मांच्या कर्मफल चक्राच्या पलीकडे नेऊन भक्ताला भगवंताच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करून देतो. कैवल्य म्हणजे मोक्ष, मुक्ती, जीवाशिवाची गाठ पडणं आणि सर्वसाक्षी ईश्वरा समक्ष सादर होणं.

पण फक्त इतकंच आहे का कैवल्य. नक्कीच नाही. स्वतः संतश्रेष्ठ तुकोबाराय आपल्या गाथेत म्हणतात " माथा पडती संतपाय ll सुख कैवल्य ते काय ll. कैवल्य म्हणजे फक्त मोक्ष नसावा अन्यथा तुकोबाराय अस का म्हणाले असते. कैवल्य म्हणजे वासनेचा अंधःकार संपून जीवाला खरा जीवनाचा अर्थ गवसण. त्या अर्थातील ईश्वर सापडणं. त्याची गोडी लागण आणि त्याला साद घालणं हे कैवल्य.

कैवल्य म्हणजे सायुज्य मुक्ती. जिथे स्व हा त्या स्वच्या निर्मात्यामध्ये संमिल्लित होऊन जातो, जिथे मी आणि तो वेगळे राहात नाहीत. नव्हे उरत नाहीत, नव्हे जिथे शून्य सुद्धा उरत नाही , ते कैवल्य. अश्या कैवल्याची आस लागलेला, त्या भेटीचा योग येण्याची दृढ इच्छा मनात धरून भक्ति मार्गात रत असलेला भक्त भगवंताकडे काहीही  मागत नाही, नव्हे तो मागूच शकत नाही. कारण तो सर्व हवं आणि नको यांच्या पलीकडे केंव्हाच गेलेला असतो. त्याला या भौतिक जगातील कशाचीही आस राहिलेली नाही.

त्या कैवल्याच्या, निजधामाच्या चांदण्यात न्हाऊन परम ईश्वराला पाहण्याची आस लागलेला भक्त त्याच आर्ततेने ईश्वराची आराधना , मनधरणी करतोय की ......

क्रमशः

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२५/०१/२०१९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...