Skip to main content

आनंद २

Continuing आनंद

कालच्या आनंद चित्रपटावरील पोस्टला घरून

यात मन्नाडेंच एक गाण आहे. जेंव्हा आनंद, दोन्ही प्रियकर प्रेयसी म्हणजेच बाबुमोशाय आणि रुणु याना चौपटीवर घेऊन येतो. व्यक्त होण्यासाठी , मनातल एक एकमेकांच प्रेम सांगून मोकळ होण्यासाठी. आणि नन्तर दोघेही काही बोलत नाहीत हे पाहून बाबुमोशायला डरपोक आणि हैपोक्रेट म्हणून निघुन जातो. I hate you म्हणत.

या पार्श्वभूमीवर मन्नाडेंच एक छान गाण सुरु होत.  ' जिंदगी कैसी है पहेली ' सलिलदांच सुमधुर संगीत ट्रम्पेटने होणारी सुरवात आणि गुलज़ारजींचे शब्द. 

मरणाच्या दारात उभा असलेल्या आनंदला वास्तविक जीवनातला आणि जीवनाबद्दल  पडलेला प्रश्न. 

जिंदगी कैसे है पहेली हाये
कभी ये हसाये कभी ये रुलाये 

गेले क्षण परतून न येती 
उगा  वाकुल्या दावून  जाती
क्षणात हसवून जाती 
फसवून क्षणात निघुनी जाती 

कधी हसवणार तर क्षणात काही हिरावून घेऊन फसवून निघुन जाणार. 
खरच आहे ते.  

त्याच धाग्याला जोडून गुलज़ार पहिल्या कडव्यात लिहितात 

कभी देखो मन नाही जागे
पीछे पीछे सपनोके धागे
एक दिन सपनोका राही 
चला जाये सपनोसे आगे कहां 
जिंदगी ......

जीवन जगणे  सार्थ  कधी 
अन स्वप्न भासते कधी कधी 
स्वप्नांच्या या दुनियेमधुनी
जाती स्वप्नापार कधी 

कधी जीवंत भासणारं हेच जग कधी स्वप्नवत भासत आणि आज जे समोर  दिसतय ते स्वप्नांच्याही पलीकडे म्हणजेच भौतिका पलीकडे कधी जाईल सांगता येणार नाही. किती सोप्या भाषेत किती मोठं तत्वज्ञान मांडलय.

आणि 

दुसऱ्या कडव्यात लिहितात

जिन्होंने सजाये यहां मेले
सुखदुःख संगसंग झेले
वही चुनकर खामोशी
यूँ चले जायें अकेले कहां
जिंदगी ......

तर्हेतर्हेचे रंग लुटुनिया
सुखदुःखाना झेलुनिया
कधी हरवले वाटेवर ते
एकटेच स्वर होऊनिया

पहिल्या कडव्याला पुढे नेत गुलज़ार जीवनाची निराशा वा वास्तव बाजू प्रखरतेने मांडतात दुसऱ्या कडव्यात. ज्यानी या जगात रंग भरले अनेक गोष्टी निर्माण केल्यात, सुख आणि दुःख दोन्हींचा सामना केलाय समर्थपणे , तेच एक दिवस अचानक शांत होऊन या समृद्ध जीवनाचा , जगताचा निरोप घेते झालेत. सर्वात श्रेष्ठ कोण जीवन की हे सर्व संपवणारा मृत्यु. किती योग्य, किती यथार्थ 

मला वाटत बाह्य जगाला भासणारा आनंद प्रत्यक्ष आत, मनात खुप धीर गंभीर आहे आणि जीवनाची वास्तविकता पूर्णपणे ओळखलेला असा एक सज्ञानी , संयत, सर्व स्विकारून सुद्धा जीवनाच्या या उदास बाजूबद्दल तटस्थपणे वेगळ मत मांडून , त्यावर आपल्याला विचार करायला लावणारा आहे. म्हणजेच जीवन जगताना या वास्तविकतेच भान असेल तर खुपसे ईगो, ईर्षा, वाद संपून जीवन अधिक सफल, परिपूर्ण, शांत आणि संयत होईल. 

यात अजुन एक गोष्ट म्हणजे हे सर्व जे दिग्दर्शकाला , लेखकाला अपेक्षित आहे आणि आनंदच जे व्यक्तित्व आहे त्याच्या गूढ , पण सखोल परिक्षणाची यथायोग्य मांडणी गुलज़ार किती सहज सोप्प्या शब्दात मांडतात. अगदी समर्पक शैलित.

क्षणिक सुख, क्षणिक दुःख असलेल्या या क्षणभंगुर जीवनाच्या वास्तविकतेच भान ठेवून सुद्धा आनंद सारख आनंदी ,मनसोक्त आणि निखळ आयुष्य जे कदाचित काही क्षणांच आहे , ते तितक्याच ताकदिने आणि आपल्या सोबत असलेल्या सर्वानाच आनंदी ठेवून समर्थपणे जगता येत. 

हेच आनंदच्या व्यक्तिमत्वाच सार. जीवनाच  न उलगडलेल कोड गुलजार आणि आनंद मिळून सोप्प्या परिभाषेत सार्थपणे सांगतात.

सदा आनंदी 

© प्रसन्न आठवले

०१/०१/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...