Skip to main content

जानकी पुनःवनवास ६

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ६

भरताचा हा विलाप चालू असताना , महालात जो तो स्वागताच्या तयारीला लागला होता. समूर्ण अयोध्या आणि प्रजाजन १४ वर्षान्च्या प्रदीर्घ दुःस्वप्नातून बाहेर येऊन, सारी मरगळ झटकुन, जागी झालेली होती.

त्याच वेळी राजा जनकाच्या मिथिलानगरीतसुद्धा लगबग आणि उत्साह वाढलाय . कारण अयोध्येहुन आमंत्रणाची तबके आलेली होती. स्वतः मंत्री सुमंत हे सर्व घेऊन आले होते. आणि त्यांचा निरोप सुद्धा तसाच होता. राजा जनक आणि राणी याना लगोलग आयोध्येला घेऊन येणे, प्रभुंच्या आगमन आणि राज्याभिषेक सोहळया नन्तरच परत मिथिलेस प्रस्थान ठेवा असा आग्रहाचा विडा घेऊन सुमंत आले होते, नव्हे घेऊन जाण्यास आले होते.

राजा जनक एक संत पृरुष होते.  फक्त आणि फक्त प्रजाहित हेच एक ध्येय. पण तरीही रणांगणावर प्रचंड पराक्रमी अशी सुद्धा त्यांची ख्याति होती.  पण तेसुद्धा १४ वर्षानपुर्वी घडलेल्या घटनाक्रमाने स्तंभित आणि काहीसे गर्भगळीत झाले होते. पण त्या काळातील प्रथेनुसार एकदा कन्या वरुन सासरी पाठवली की तीच सुख दुःख सर्व सासरीच या न्यायाने त्यानी त्यात जास्त लक्ष न घालता सर्व बाबी अयोध्येवर सोपवल्या होत्या.  आणि ते त्या यथासांग पार पाडतील याचा त्याना पूर्ण विश्वास होता.

पण तरीसुद्धा एक पिता म्हणून मनात कुठेतरी विषण्णता जाणवत असे. कधीतरी उर भरून येत असे.  आठवून काळजाच पाणी पाणी होत असे. मनात विचारांच काहूर थैमान घाले आणि मग जनक राजा स्वतःला प्रश्न विचारत की मी इतका देव भोळा, निष्ठावान, प्रजाहितदक्ष , पापभीरु, स्वप्नात सुद्धा कधी पाप न केलेला साधा सज्जन माणूस, आणि माझ्याच बाबत अस का व्हाव. का हे अकल्पित आणि अगणित भोग माझ्या तीन कन्यांच्या वाट्याला यावेत.

जानकी तर पतिसमवेत आहे वा जाताना पतिसमवेत गेली. पण उर्मिलेच आणि मांडवीच दुःख अनन्यसाधारण आणि कल्पनातीत आहे. अश्याच अलौकिक सामर्थ्याच्या आहेत या दोघी. उर्मिलेच दुःख पतिवियोग आहे म्हणून आपोआप दिसतय ,जाणवतय, पण मांडवी. तिचा पति म्हणजे राजपुत्र भरत रामावरील प्रेमामुळे, आईवरील अतीव रागामुळे आणि बंधु म्हणून असलेल्या कर्तव्यामुळे  वनात जाऊन एक तपस्वी जीवन जगुन ,  प्रभुरामाच्या राज्याचा सेवक म्हणून आणि आईच्या कर्माच प्रायश्चित्त म्हणून एक व्रतस्थ जीवन जगतोय.

या सर्व आदर्शाचा मला सार्थ अभिमान आहे की रघुकुलाची रीत आणि वचन जपण्यासाठी आपापली कर्तव्य पूर्ण निष्ठेने आणि सामर्थ्याने पार पाडत आहेत आणि पार पाडतील यात अणुमात्र शंका नाहीये.  आणि या सर्व वाटेवर कितीही खड़तर वाटचाल असली तरीही माझ्या चारही कन्या सार्थपणे आणि समर्थपणे आजन्म , विनातक्रार, आणि अतुलनीय अशी साथ देतील हे सुनिश्चित. मला आठवतय आणि अभिमानाने छाती भरून येते आठवल तरी,  १४ वर्षांपूर्वी उर्मिलेला काही दिवस माहेरी घेऊन जाण्यासाठी निरोप आला. अर्थात माता कौसल्या यानी तो काळजीपोटी पाठवलाय हे माहित होत, म्हणून आपण तशी व्यवस्था करत होतो. पण उर्मिलेने उलट निरोप पाठवाल, की सासरी इतका दुर्धर प्रसंग आला असताना पिताश्री आपण विचार तरी कसा केलात की मी माहेरी येईन म्हणून .
वा उर्मिले वा सार्थ केलेस या घरण्याचे संस्कार. मला अभिमान आहे साऱ्यांचा माझ्या कन्यका आणि रघुकुलातील राजमंडळी आणि प्रजाजन सुद्धा.

अचानक राणी कडून निरोपघेऊन सेविका येते, "महाराज राणी आपलीच प्रतीक्षा करत आहेत"

आणि राजा जनक अचानक भानावर येतात. आणि लगबगिने म्हणतात चला आम्ही सिद्ध आहोत प्रस्थानाला

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
०३/१२/२०१७

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...