Skip to main content

जानकी पुनःवनवास ५

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ५

या सर्व हर्ष आणि उल्हास यांच्याही पलीकडे असेलेला आणि सम्पूर्ण रामायणाची कर्ता धर्ता असलेली आणि पुत्रप्रेमाने आंधळी झालेली व जिच्यायोगे सर्व घडल त्या माता कैकईचा सुपुत्र,  भरत.

चौदा वर्षानपुर्वी आपल्या आजोळी आपण जातो काय आणि आणि ....... काळजाचा प्रत्येक ठोका चुकवणारा, नकोसा  वाटलेला तो प्रसंग आणि आपल्या पश्चात घडलेल सर्व. राग , चीड, दुःख, निराशा, घोर निराशा, हताश पणा, काय काय अनुभवल. का मी अश्या मातेच्या पोटी जन्म घेतलाय , जिने स्वतःहून बन्धु वियोगाच दुःख आपल्याच पुत्राच्या पदरात टाकलय. पिताश्रीनि सर्व जबाबदारी टाकली जाताना, आपल्याच शिरावर. भ्राता लक्ष्मण निदान सूखी त्यातल्या त्यात की प्रभुंची प्रेमळ छबी रोज सतत अष्टौप्रहर त्यांच्यां नजरेतसमोर असते, आहे, आज १४ वर्ष.

कित्येक वेळा वाटल या पश्चातापाच्या , विरहाच्या, उद्वेगाच्या, कोपातिरेकाच्या, हतोत्साहित होण्याच्या आणि लज्जेच्या अग्नित होरपळून निघण्यापेक्षा सरळ स्वतःच अस्तित्व संपवाव. का हे भोग आपल्याच वाट्याला यावेत. ज्या ज्येष्ठ भ्राता रामचंद्रांवर प्राणाही पलीकडे प्रेम केल , त्यानाच दूर करून गादिवर बसण्याचा कलंकित डाव हा भरत स्वप्नात सुद्धा करू शकत नाही. करुच शकत नाही. आणि हे सर्व माहित असुनसुद्ध कैकईने, होय ती माता म्हणण्यायोग्य सुद्धा नाही, हा अधमी डाव खेळावा. का का का हेच सर्व पाहुनसुद्धा कशासाठी हा जीव अजुनपर्यंत जीवंत आहे. 

आजोळहुन परत आलो, आणि आजसुद्धा ती प्रजाजनांची नजर आठवली, की काळीज जणु धारदार शस्त्राने चिरुन काढल्याचा भास , अजुनसुद्धा जाणिवाना अश्या मानसिक अवस्थेत घेऊन जातो. कस व्यक्त होऊ तेच तेच उमगत नाही. आज १४ वर्ष.  निव्वळ माझ्यावरील प्रेमाखातर म्हणे हा डाव खेळलेला होता. असा संताप संताप होतो जीवाचा.  जऱ ते वचन प्रभुरामानी , माझ्या हॄदयातील ज्येष्ठ भ्राता यानी , घेतल नसत, तर तर, क्षणाचाहि विचार न करता हे कृत्य करणाऱ्या त्या अपराधी व्यक्तीला.............. पण हा विचारसुद्धा मनात आणायचा नाही , अस ठाम वचन दिलय मी माझाच प्राण असलेल्या माझ्याच अंशमात्रे वेगळे अस्तित्व, या जगा करता दिसणाऱ्या , पण अंति एकच असलेल्या माझ्या ज्येष्ठ बंधुना .

या सर्व विचारानी  मनात आज का थैमान मांडलय. का हे सर्व, डांबुन ठेवलेल्या तळघरातील आतल्या खंदकातून आज स्वैर बाहेर आलेत. का आज हा छळ माण्डलाय, माझ्याच हातून निसटुन मलाच त्रास देण्याचा अट्टहास, आज तुम्ही का धरताय. आज इतके वर्ष जपलेल्या माझ्या मनातील भाव भावनानो, का आज तुम्ही अचानक असे बाहेर आलात. तुम्हालासुद्धा माझ हे उद्विग्न जगण बघवत नव्हतं की काय, म्हणून असे बाहेर येऊन मला घेरलय सर्वानी. दुःख, निराशा, राग, क्रोध, विमानस्कता, मर्यादेच्या बंधनाचा अभिशाप, जीवनातील फोलपणा, कारुण्य, त्या रागाने बघणाऱ्या नजरा, हेच सर्व का दिलत या भरताला , सांगा पिताश्री. बन्धु का वचनात अडकवून गेलात , का .....

भारताचा हा विलाप काळाचाहि ठोका चुकवून गेला, पुन्हा एकदा १४  वर्षानंतर.

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
०१/१२/२०१७

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...