Skip to main content

जीवन सुगंध - १



जीवन सुगंध - १ 




माणूस एक प्रवास आहे अनंतापासून अनंतापर्यंत. कुठून आला कुठे चाललाय हे कधीच न समाजणार कोड अखंड उरात बाळगून या प्रवासातला एक प्रवासी . हां प्रवास असाच किती काळ चालेल ते नियंत्यालाच माहित.  बर तो कुणाला कळलाय तर तेही एक कोडच. या कोडयाच उत्तर सापडत त्याना जे हे सांगण्यासाठी येऊ शकत नाहीत. त्यामुळे जे माहीत नाही ते कल्पनेनेच जाणलय त्यांनी,  ज्यानी हे पाहिलय हां त्यांचा विश्वास की खात्री की श्रद्धा की भ्रम हे ते स्वतः जाणतात की नाही हे कोणालाच माहीत नाही . बर आपल्या कुणाला हे बोलण्याचा अधिकार आहे की नाही ते पण कोणालाच माहित नाही

मी  हे बोलतोय हे सुद्धा अधिकार नसतानाच.  पण मग नक्की काय खर ते कोणी तरी कधी तरी सांगाव आणि कधीतरी आपल्याला कळाव अस वाटणारे किती हे पण ठाऊक नाही.  
बर श्रद्धा खरी की तोही एक भ्रमच भुताच्या गोष्टीसारखा माहीत नाही कारण जर ती कल्पना तर देव ही कल्पना का नसेल. सर्व तर्कशास्त्राचा खेळ की अजून काही हे पण त्या नियंत्यालाच माहीत अर्थात जर तो कुठे असेल तर. कारण त्याच्या म्हणण्या प्रमाणे त्याला कोणी पहाव ओळखाव हे पुन्हा त्यांच्या मर्जीवर म्हणजे पुन्हा खेळ शब्दांचा तर्काचा श्रद्धेचा. 


प्रेरणा : श्री महाराज

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...