Skip to main content

कवडसा - 22



कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  

कहाणी एका संघर्षाची सुरु …२२……


समोर योगेंद्रला इतक्या वर्षानी  बघून शीतलला विश्वासच बसत नव्हता आणि योगेन्द्र काल परत भेटून आज भेटतो आहोत अश्या शांतपणे शीतल कडे बघत होता. असा किती वेळ गेला असता कोण जाणे पण भानावर येत योगेंद्र हात उंचावून म्हणाला हाय शीतल करेक्ट 

शीतल : ( एकदम सावरत ) हाय योगेन्द्र पण तुझी भेटायला यायची पद्धत आणि जागा आवडली मला.  मानल तूला.  कॉलेज मधे होतास त्यापेक्षा खूप वेगळा आहेस तू , खुपच बदलला आहेस.  तेंव्हाचा योगेन्द्र खूप लाजरा बूजरा मुलींशी कमी बोलणारा असा होता पण तू तर .. 

योगेन्द्र : (तीच वाक्य अर्धवट ठेवत ) खूप बदललो ना. वक़्त और हालात इंसानको सब कुछ सीखा देते है ( असा म्हणून तो स्वतःच जोरात हसतो) त्यावेळचा मी आणि आताचा मी यात  २० एक वर्ष गेलीत मॅडम. असो तू कशी आहेस. ( आता तिच्या डोळ्यात थेट नजर टाकत योगेन्द्र विचारतो )

शीतल : (आपले डोळे मिचकावत ) एकदम मजेत तूला कशी दिसत्ये. आयूष्य खूप पूढे गेलय आणि आपण पण. (योगेन्द्र एकटक तिच्या बोलण्याकडे आणि चेहऱ्याकडे बघत असतो) काय बघतोयस असा टक लावून. 
योगेन्द्र : पण तुझी maturity त्या वेळी होती ती तशीच आहे. तोच लाघवी स्वभाव , तीच बोलण्याची पद्धत सर्व तसच , that means you have't changed. 
शीतल : तसच काही  नाही पण times have changed बरेच अनुभव घेतलेत या काळात. 
योगेंद्र : (तीच बोलणं अर्धवट कट करत). but  still you have not . 
शीतल : इतकं  कस खात्रीने सांगू शकतोस. 
योगेंद्र : माझा माणसांचा अभ्यास खूप चांगला आहे. म्हणून मी एखाद्याला समजतो ते पूर्णपणे .  
शीतल : so  nice  of  you . पण मी तुला इतकी ओळखत नव्ह्ते. infact तुला जास्त ओळखतच नव्हते. पण तरीही तू असा नव्हतास हे निश्चित. right ?
योगेंद्र : absolutely right madam . 
शीतल : मला शीतल म्हणतात बाकीचे सर्व. 
योगेंद्र : ओक madam  sorry  i mean  शीतल  
क्रमशः







Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...