Skip to main content

प्रिंन्स अर्थात निळ्या डोळ्यांचा राजकुमार

प्रिंन्स अर्थात निळ्या डोळ्यांचा राजकुमार

हा कलाकार हिंदी चित्रपट श्रुष्टीतील आतापर्यंतचा सर्वात सुंदर , उत्कृष्ट व्यक्तिमत्व, शानदार अदाकारी , ६ फूट उंची असलेला, राखाडी निळसर डोळे, उमदा चेहरा, युरोपियन चणीचा , एक चीकना हिरो , तरुणींचा लाडका , पाहता क्षणी डोळ्यात भरणारा, नृत्याची आवड आणि जाण असलेला असा आहे. माझ्या मते  या व्यक्तिमत्वाचा कलाकार हिंदी चित्रपट श्रुष्टीत आजपर्यंत झाला नाही.  त्या काळातील त्याची आधुनिक व फॅशनेबल  राहणी, नृत्याची जाण , या सर्वांमुळे त्याची तुलना त्याच्या समकालीन असलेल्या एल्विन प्रेसले या इंग्लिश कलाकाराबरोबर केली जात असे. हा हिंदी चित्रपट श्रुष्टीतील पहिला बंडखोर नायक.  कला रक्तातूनच मिळालेली.
नाव शमशेर राज कपूर म्हणजेच सर्वांचा लाडका शम्मी कपूर. १९५० ते १९७० च्या सुरवातीपर्यंतचा काळ यांनी गाजवला. यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ रोजी मुंबईत झाला. पृथ्वीराज कपूर आणि रामशरणी कपूर यांचा दुसरा मुलगा. राज कपूर यांचा धाकटा आणि शशी कपूर यांचा थोरला भाऊ.   लहानपण पेशावर आणि कोलकाता येथे गेल्यावर यांच शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण झाल. वयाच्या १७ व्या वर्षी १९४८ मध्ये पृथ्वी थेटर मध्ये रु. ५०/- च्या मासिक पगारावर ज्यु. कलाकार म्हणून यांनी प्रवेश केला. १९५२ साली शेवटचा मासिक पगार रु. ३००/- घेवून त्यानी पृथ्वी थेटर सोडल. 
१९५३ मध्ये महेश कौल दिग्दर्शित "जीवन ज्योती" या चित्रपटाद्वारे शम्मी यांनी चित्रपटश्रुष्टीत पदार्पण केल. यात त्यांची नायिका होती चांद उस्मानि. सुरवातीला त्याकाळच्या पठडीतील काही गंभीर भूमिका केल्यानंतर, नसीर हुसेन यांच्या "तुमसा नहि देखा" (१९५७) या चित्रपटाने शम्मी यांची दिशा बदलली. यात त्यांची नायिका होती अमिता. त्यानंतर नसीर हूसेन यांच्याच  "दिल देके देखो"  या १९५९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने शम्मी यांना एक स्टार  व्हॅलू मिळावून दिली आणि त्यांना कलाकार या नात्याने स्थापित केल आणि त्यांची स्टायलीश प्लेबॉय नायक ही इमेज तयार झाली. या चित्रपटात त्यांची नायिका होती आशा पारेख. 

 क्रमशः

शब्दांकन आणि संकलन : प्रसन्न आठवले

Comments

  1. सुंदर लिहीलय.
    स्ट्रगलचा जो काळ असतो तो पुढच्या बागात आणखीन उलगडवुन दाखवलात की आणखीन बहार येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अनिरुद्धजी जरूर पुढील भाग अधिक चांगला असेल

      Delete
  2. सुंदर लिहीलय.
    स्ट्रगलचा जो काळ असतो तो पुढच्या बागात आणखीन उलगडवुन दाखवलात की आणखीन बहार येईल.

    ReplyDelete
  3. छान लिखाण प्रसन्नजी

    ReplyDelete

Post a Comment