Skip to main content

अभिनयाचा बादशहा

अभिनयाचा बादशहा

१९५० च्या दशकात    झळकलेल्या   "जोगन" (१९५०) , "दिदार" (१९५१) , "दाग" (१९५२), "देवदास" (१९५५), "यहूदी" (१९५८) या सिनेमांमुळे  ट्रॅजेडी किंग अर्थात शोकांतिकांचा बादशहा हि त्यांची पडद्यावरील इमेज तयार झाली.   मधुबाला , नर्गिस , निम्मी , मीनाकुमारी, कामिनी कौशल या त्यावेळच्या काही लोकप्रिय अभिनेत्रींबरोबर त्यांची पडद्यावर जोडी विशेष  जमली.   त्याच दरम्यान त्यांनी  प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक मेहबूब खान यांचे अनुक्रमे "आन" (१९५२) हा हलकाफुलका सिनेमा आणि खलनायकी छटेचा "अमर" (१९५४) हे सिनेमे केले. यातील आन हा सुपर डुपर  हिट ठरला होता.
त्यांनी काही सामाजिक आणि संदेश प्रधान  सिनेमे सुद्धा केले.  जसे : "तराना" (१९५१), "फुटपाथ" (१९५३) , "नया दौर"   "मुसाफिर"  (१९५७),   "पैगाम" (राजकुमार यांच्या बरोबर पहिला चित्रपट ) (१९५९). त्याच वेळी त्यांनी मनोरंजन प्रधान आणि हलके फुलके असे "आझाद" (१९५५) आणि "कोहिनूर" (१९६०)  सिनेमे केले.
१९६० सालीच त्यांचा के. आसिफ दिग्दर्शित भव्य दिव्य "मुगले-ए-आझम"  झळकला. हा सिनेमे १९७५ पर्यंत बॉक्स ऑफिसच्या बाबतीत १ न. (शोले प्रदर्शित होई पर्यंत) आणि त्यानंतर २००८ पर्यंत  न. २ (गझनी प्रदर्शित होई पर्यंत) वर होता.  या सिनेमातील कलाकार अनुक्रमे पृथ्वीराजकपूर , दिलीपकुमार , मधुबाला, दुर्गा खोटे.  चित्रपट प्रदर्शित झाला  त्यावेळी यातील बराचसा सिनेमा कृष्ण धवल आणि काही भागच रंगीत स्वरूपातील होता. नंतर हाच चित्रपट  २००४ मध्ये रंगीत स्वरूपात पुन्हा प्रदर्शित होता.
१९६१ साली त्यांची निर्मिती असलेला "गंगा जमुना" हा चित्रपट प्रदर्शित झाला . यामध्ये त्यांनी आणि त्यांचा सख्खा भाऊ नसीर खान यांनी अनुक्रमे गंगा आणि जमुना ह्या भूमिका साकारल्या होत्या.गंगा जमुना हा त्या वर्षातील एक यशस्वी चित्रपट होता.  हाच सिनेमा दिवार आणि शक्ती या दोन सिनेमांचा प्ररणा स्त्रोत मानला जातो.   १९६२ साली ब्रिटीश दिग्दर्शक डेविड लीन यांनी दिलीपकुमारना लॉरेंस ऑफ अरेबीया या इंग्रजी सिनेमातील शरीफ अली  या भूमिकेसाठी विचारणा केली होती. पण दिलीपकुमार यांनी त्याला नकार दिला. हीच भूमिका नंतर ओमार शरीफ या इजीप्शिअन  कलाकाराने  केली. १९६४ साली आला  "लीडर".   १९६६ मध्ये "दिल दिया दर्द लिया" या सिनेमाच सह-दिग्दर्शन   दिलीपकुमार यांनी केला होत. आणि १९६८ मध्ये मनोजकुमार आणि वहिदा यांच्या बरोबर त्यांचा "आदमी" हा चित्रपट प्रदर्शित झाला.

क्रमश:

शब्दांकन आणि संकलन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...