Skip to main content

Posts

Showing posts from June, 2023

राम अनुज भरत भाग १९

राम अनुज भरत भाग १९ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. दोन्ही ऋषिवरांनी,एकमेकांची आस्थेने आपापल्या गुरुकुल, विद्यार्थी, पाठक यांच्या विषयीची प्रूच्छा केली. जमलेले सर्वजण विद्वत्ता, ज्ञान यांनी परिपूर्ण असलेले, पण तरीही शांत, गंभीर आणि विनम्र असलेले, सप्तर्षी पैकी दोन असलेले, हे व्युत्पन्न पाहून सुख समाधान व आनंदाची अनुभूती घेत होते.  ऋषिवरांची भेट झाल्यावर महर्षी भारद्वाज भरताकडे वळून म्हणाले. "हे अयोध्या भूषण भरत, आपल्या मातांचा आणि राज स्नुषांचा परिचय आम्हास घडवावा."  भरताने अत्यंत आदरयुक्त भावाने, सादर वंदन करून, जशी आपली आज्ञा, असं म्हणून ज्येष्ठ माता कौसल्या यांच्याकडे अंगुली निर्देश केला.  " साक्षात श्री नारायणाचे तेज, ज्यांनी आपल्या उदरी धारण केले, मूळ कौसल देशाच्या राजकन्या आणि स्वर्गीय महाराज दशरथ यांच्या प्रथम पत्नी व ज्येष्ठ भ्राताश्री रघुनंदन यांच्या मातोश्री, माता कौसल्या."  ऋषी भारद्वाज यांनी त्यांना आदरयुक्त भावात प्रणाम केला. त्यानंतर माता सुमित्रा यांच्याकडे निर्देश करून ...

राम अनुज भरत भाग १८

राम अनुज भरत भाग १८ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. तेजोवलयांकित महर्षी एकाग्र चित्ताने भरताचा शब्द अन् शब्द कर्ण आकृष्ट करून ऐकत होते आणि भरत पुढे बोलत होता. " हे ब्रह्मस्वरूप महात्मन, ज्येष्ठ भ्राता, प्रेमस्वरूप, कारुण्य सागर, श्री कौसल्या नंदन, कैकयीच्या कार स्थानात, पिताश्री महाराज दशरथ, यांच्या आज्ञा प्राप्तीने, वनात प्रस्थान करते झाले आहेत. राणी कैकयी हिने हे कारस्थान, कोणत्या मिषाने केले, ते मला ज्ञात नाही. परंतु मी त्या कटाची निर्भत्सना करतो आणि घडलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप व परिमार्जन करू इच्छितो. त्यासाठी ज्येष्ठ भ्राता, देवी सीता आणि लक्ष्मण यांची क्षमायाचना करून, प्रसंगी त्यांची मनधरणी व चरण याचना करून, त्यांना माघारी घेऊन जाईन.  त्याच कारणाने आपल्या इथे मी आलो आहे. आपल्या इथे येऊन भ्राताश्री जगतपालक श्रीराम पुढे गमन करते झाले आहेत.आपण त्यांचा पुढील स्थानाचा मार्ग जाणता. म्हणून,आपल्या मार्गदर्शनात आम्ही, त्यांना शोधून, त्यांना अयोध्येचा राज्यकारभार सोपवून, निश्चिंत होऊ इच्छितो."  भर...

राम अनुज भरत भाग १७

राम अनुज भरत भाग १७ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. एकूणच सारा आश्रम परिसर, बहरलेली व डवरलेली फुलं, पक्व होण्यास सज्ज असलेली फळं, यांच्या समिष्रीत बहारदार आणि नसिकांना समोहित करणाऱ्या गंधाने भारलेला होता. आलेला प्रत्येक विद्यार्थी, पाठक, आश्रमवासी, सन्यासी, ब्रम्हवृंद त्या संपूर्ण परिसराला आपलंच गृह जाणून, त्या आश्रम परिसराला सुशोभित, स्वच्छ आणि नयनरम्य ठेवण्यासाठी मनापासून कार्य करताना दिसत होता. त्या भारलेल्या समिश्रीत गंधाने, भरत आणि आर्य सुमंत यांसह सर्वांच्या मनाला प्रफुल्लित, पवित्र आणि प्रसन्न केलं.  "या सर्वांचा मनावर परिणाम होऊन, येथेच थांबण्याचा मोह मनाला लागला आहे, आर्य सुमंत. असं वाटतं की, राज्यभार एकदा ज्येष्ठ भ्राताश्री, आकाशस्थ मेघांसम नीलवर्णी श्रीरघुंनंदन याना सोपवला की, येथेच कायम स्वरूपी राहण्याची तीव्र इच्छा जागृत होत आहे."  " महाबली, कुमार भरत, आपण या आश्रमात येऊन, येथील अतिथ्य स्वीकारण्यास, कधीही याव, असच आम्हा सर्व आश्रम वासीयाना वाटतं आहे."  आपलं आग्निहोत्र कार्य संप...

अध्यात्म विराम २०२

अध्यात्म विराम २०२   एखादी सेवा प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या सेवेचे मूल्य चुकते केले की ती सेवा आपल्याला प्राप्त होते. म्हणजेच कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी, त्याचे आवश्यक मूल्य प्रदान करणे क्रमप्राप्त आहे. दुसरी अट त्यासाठी ही आहे की, ती सेवा जिथे उपलब्ध आहे तिथे आपल्याला जावे लागते. या जगतात आल्यानंतर, या जगतातील प्रत्येक गोष्टीचा उपयोग करून आपण अनेक गोष्टी गेल्या करोडो वर्षात निर्माण केल्या. ज्याचा लाभ अब्जावधी देहांनी घेतला.  हे सर्व सेवन करून आपण या देहाचा उदरनिर्वाह करतो. उदर म्हणजे पोट. म्हणजे आपण पोटाच्या माध्यमातून, या देहाचा निर्वाह करतो.अर्थातच यामधे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या देहाचं सर्व सूत्रसंचालन उदर अर्थात पोट या माध्यमाने करण्याची सोय,देह निर्माण करताना, ईश्वराने निर्माण केली. मुळात एक लक्षात घ्या की, प्रजोत्पादन करण्याचं मुख्य कार्य, सूत्र व व्यवस्था ही ईश्वर निर्मित असल्यामुळे, या मानवी देहातून, जी जी निर्मिती होते, ती ईश्वरीय देणगीतून घडते.  कारण कार्य देह करत असला तरीही, त्यामागे ऊर्जा शक्ति व चैतन्य हे, संपूर्णपणे ईश्वर निर्...

राम अनुज भरत भाग १५

राम अनुज भरत भाग १५ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. यात्रा, प्रयाग क्षेत्री, भारद्वाज मुनींच्या आश्रमाच्या परिसरा जवळ येऊन पोचली. भरताने, सुमंतांना, थांबण्याची आज्ञा केली. सुमंत भरत रथातून खाली उतरले आणि विचार विनिमय करून, भरत शत्रुघ्न ला म्हणाला.  " हे सौमित्र, तू येथील व्यवस्था बघ, मी, आर्य सुमंत आणि काही निवडक प्रतिनिधी, महर्षी भारद्वाज मुनींच्या आश्रमात जाऊन, पुढील व्यवस्था पाहतो. तद्नंतर, इकडे तुला त्यानुसार संदेश धाडतो. त्यानुसार, तू सर्वांना घेऊन, आश्रमाकडे ये. "  अर्थातच शत्रुघ्न यावर समंती दर्शवून म्हणाला " आपला संदेश येईपर्यंत मी येथील व्यवस्था पाहतो. आपण निश्चिंत मनाने व अविचल चित्ताने, महर्षींना विनंतीपूर्वक आश्रम वा त्यानजिक उतरण्याची अनुमती मागावी. आपल्या रघुकुलाची अलौकिक कीर्ती जाणून, महर्षी नक्कीच योग्य ती अनुमती देतील. श्रीराम चिंतन आपल्याला यात यश प्रदान करेल. " शत्रुघ्नची अनुमति घेऊन, निवडक मंत्रीगण व सेवक यांना घेऊन, भरत आणि आर्य सुमंत भारद्वाज मुनींच्या आश्रमाच्या प्रवेशद्...

राम अनुज भरत भाग १६

राम अनुज भरत भाग १६ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. समोर काही अंतरावर महर्षी भारद्वाज यांची पर्णकुटी आणि अग्नीशाला दिसत होती. महर्षी संध्या समयीच्या अग्निहोत्र कार्यात मग्न होते. त्यांच्या सोबत काही विप्र व ब्रम्हवृंद, काही पाठक, काही अभ्यास कार्य पूर्ण करून, तिथेच राहून, गुरुसेवा करण्यात मग्न असलेले आश्रमी, सन्यासी जन, वानप्रस्था श्रमी असे काही जण गुरुदेवांना सहाय्य करून, अग्निहोत्र संपन्न करत होते.  त्यांच्या या यागाच्या पूर्ततेपर्यंत, भरताने काही अंतरावर उभ राहून, प्रतीक्षा केली. अग्निहोत्र आणि स्नान संध्यादी विधी संपन्न होत असताना, भारद्वाज महर्षींच्या सोबत असलेल्या ब्रम्हवृंदांनी भरत आणि आर्य सुमंत याना दूर अंतरावर प्रतीक्षा करताना पाहिलं.  अर्थातच अयोध्येचे ध्वज, पताका व छत्रचामर दिसल्या मुळे, सर्वांनी अयोध्या राजकुमाराना ओळखले. एका प्रौढ सन्यासी वृंदानी, पुढे होऊन, त्यांना आश्रमाच्या प्रवेश द्वारातून आत येण्याची विनंती केली. भरतासह सुमंत आणि सोबतच्या एक दोन मंत्र्यांनी आपापल्या मोजड्या व ...

राम अनुज भरत भाग १५

राम अनुज भरत भाग १५ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. यात्रा, प्रयाग क्षेत्री, भारद्वाज मुनींच्या आश्रमाच्या परिसरा जवळ येऊन पोचली. भरताने, सुमंतांना, थांबण्याची आज्ञा केली. सुमंत भरत रथातून खाली उतरले आणि विचार विनिमय करून, भरत शत्रुघ्न ला म्हणाला.  " हे सौमित्र, तू येथील व्यवस्था बघ, मी, आर्य सुमंत आणि काही निवडक प्रतिनिधी, महर्षी भारद्वाज मुनींच्या आश्रमात जाऊन, पुढील व्यवस्था पाहतो. तद्नंतर, इकडे तुला त्यानुसार संदेश धाडतो. त्यानुसार, तू सर्वांना घेऊन, आश्रमाकडे ये. "  अर्थातच शत्रुघ्न यावर समंती दर्शवून म्हणाला " आपला संदेश येईपर्यंत मी येथील व्यवस्था पाहतो. आपण निश्चिंत मनाने व अविचल चित्ताने, महर्षींना विनंतीपूर्वक आश्रम वा त्यानजिक उतरण्याची अनुमती मागावी. आपल्या रघुकुलाची अलौकिक कीर्ती जाणून, महर्षी नक्कीच योग्य ती अनुमती देतील. श्रीराम चिंतन आपल्याला यात यश प्रदान करेल. " शत्रुघ्नची अनुमति घेऊन, निवडक मंत्रीगण व सेवक यांना घेऊन, भरत आणि आर्य सुमंत भारद्वाज मुनींच्या आश्रमाच्या प्रवेशद्...

राम अनुज भरत भाग १५

राम अनुज भरत भाग १५ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. यात्रा, प्रयाग क्षेत्री, भारद्वाज मुनींच्या आश्रमाच्या परिसरा जवळ येऊन पोचली. भरताने, सुमंतांना, थांबण्याची आज्ञा केली. सुमंत भरत रथातून खाली उतरले आणि विचार विनिमय करून, भरत  शत्रुघ्न ला म्हणाला.  " हे सौमित्र, तू येथील व्यवस्था बघ, मी, आर्य सुमंत आणि काही निवडक प्रतिनिधी, महर्षी भारद्वाज मुनींच्या आश्रमात जाऊन, पुढील व्यवस्था पाहतो. तद्नंतर, इकडे तुला त्यानुसार संदेश धाडतो. त्यानुसार, तू सर्वांना घेऊन, आश्रमाकडे ये. "  अर्थातच शत्रुघ्न यावर समंती दर्शवून म्हणाला " आपला संदेश येईपर्यंत मी येथील व्यवस्था पाहतो. आपण निश्चिंत मनाने व अविचल चित्ताने, महर्षींना विनंतीपूर्वक आश्रम वा त्यानजिक उतरण्याची अनुमती मागावी. आपल्या रघुकुलाची अलौकिक कीर्ती जाणून, महर्षी नक्कीच योग्य ती अनुमती देतील. श्रीराम चिंतन आपल्याला यात यश प्रदान करेल. " शत्रुघ्नची अनुमति घेऊन, निवडक मंत्रीगण व सेवक यांना घेऊन, भरत आणि आर्य सुमंत भारद्वाज मुनींच्या आश्रमाच्या प्रव...

राम अनुज भरत भाग १४

राम अनुज भरत भाग १४ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. इतर छोट्या व मध्यम नौकेत, राजकुमार भरत, शत्रुघ्न, आर्यसुमंत एका नौकेत, इतर मंत्रीगण बाकीच्या अनेक नोकांमधुन वेगवेगळे जाण्यास निघाले. हे सर्व बसल्यावर, भरलेल्या, छोट्या, मध्यम व मोठ्या नौका,पलीकडील किनाऱ्यावर जाण्यासाठी निघाले. अश्याप्रकरे काही फेऱ्यांमधून, सर्व सैन्य, राज परिवार व सर्व प्रजाजन पलीकडील तीरावर पोचले.  त्यांना तिकडे सोडावयास गेलेल्या गुह आणि त्याच्या विश्वासू साथीदारांनी, साश्रू नयनांनी निरोप घेतला. गुहाचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन, भरताने त्याला एक आलिंगन दिले आणि आपल्या हृदयाशी धरले. साश्रू नयनांनी भरत गुहाला म्हणाला " निषाद राज आपण याचं हातानी माझे पूजनीय ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना या तीरावर आणून सुखरूप सोडलत. आपले हे उपकार अयोध्या, रघुकुल आणि व्यक्तिशः मी व ज्येष्ठ भ्राता आजन्म विसरू शकणार नाही. आपण अजून एक महत्कार्य माझ्यासाठी करावं."  गुहांच्या नयनात सुद्धा अश्रुधारा आल्या होत्या. तश्याच डबडबलेल्या स्वरात, आपल्या घनगंभीर...

राम अनुज भरत भाग १३

राम अनुज भरत भाग १३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. त्वरित निषाद राज आपल्या साथीदारांसह पुढील व्यवस्था करण्यास्तव, गंगा तटी निघाला. तटावर येऊन त्याने, मोठ मोठ्या नावा,अर्थात जहाजं, एका. बाजूला लावून घेतली. त्यानंतर माध्यम आकाराच्या नावा, एका ठिकाणी एकत्रित आणल्या. मोठ्या नावांमध्ये उत्तमोत्तम मल्लाह अर्थात निषाद नेमून दिले. स्त्री वर्गासाठी विशेष सजवलेल्या, उत्तम रंगकाम केलेल्या व सर्वोत्तम नावा नियडून, त्यात उत्तम पेहराव केलेले मल्लाह नेमून, तो पुन्हा राजकुमार भरत यांच्या दिशेने निघाला.  गूहाच्या आणि त्याच्या सर्व साथीदारांच्या आतिथ्याने, कृतार्थ आणि समाधानी झालेला भरत, या सुखमय वागणूक, प्रेम, स्नेहभाव यामुळे प्रफुल्लित झाला होता. पण त्यापेक्षा, या कल्पनेने भारावून गेला होता आणि आत्मसंतुष्ट झाला होता की, आपल्यावरील रोष दूर होताच, निषाद राजाने आपलं आदरातिथ्य इतक्या थाटात केलं, तर निरतिशय प्रेमभाव ज्यांच्याबद्दल आहे, त्या जगतपिता श्रीराम, यांचं आगतस्वागत, आदरातिथ्य किती भव्य, दिमाखदार आणि कौतुकास्पद झ...

राम अनुज भरत भाग ११

राम अनुज भरत भाग ११ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.  निषादाच्या सैन्यातील प्रत्येकाने आपली आपली नेमून दिलेली जागा घेऊन, येणाऱ्या सैन्याकडे व राजा गुहा यांच्या आदेशाकडे नजर ठेवून, सावध पावित्रां घेतला. इकडे मुख्य रथात सर्वात पुढे असलेले, भरत यांनी आपला रथ थांबवण्याचा आदेश दिला. त्याबरोबर सर्व सैन्य एका जागी स्तब्ध झालं. भरत समोर दिसणाऱ्या सज्जतेकडे पहात आपले ज्येष्ठ मंत्री आर्य सुमंत याना म्हणाला " आर्य, समोर कोण आहे आणि त्यांच्या हालचाली काय सुरू आहेत, याबद्दल काही सूचना घेता येईल का. " आर्य सुमंत म्हणाले की, " राजकुमार भरत, हा निषादांचा प्रदेश आहे आणि समोर दिसणारं सैन्य अर्थात निषाद म्हणजेच मल्लाह यांचं आहे. येथून जाणाऱ्या यात्रेकरू, गरजू याना, गंगा नदीच्या या तीरावरून त्या तीरावर घेऊन जाणं आणि पलीकडील तीरावरील यात्रेकरूंना इकडील तीरावर घेऊन येणं, हे यांचं कमाईच, जगण्याचं व उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे या प्रदेशात त्यांची सत्ता आहे. " "अर्थातच अयोध्येशी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे स्नेहसंब...

राम अनुज भरत भाग १२

राम अनुज भरत भाग १२ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. निषाद आपल्या नेत्रात पाणी आणून सांगत होता.  "परंतु मला एका गैरसमजाची कबुली द्यायची आहे. आपल्याला ससैन्य येताना पाहून, मी समजलो होतो की, आपण अयोध्येचं सैन्य घेऊन, त्रिलोकाचे पालक, श्रीराम याना वनवासातून कैद करून घेऊन जाण्यासाठी आलेला आहात. कारण आपल्या मातोश्री राणी कैकयी यांनीच प्रभूंना वनवासाची आज्ञा, महाराज दशरथ याना द्यायला लावली, अशी वार्ता कानी आल्यापासून, आपल्यावर संदेह निर्माण होऊन, आपल्याबद्दल मनात किंतु जागृत झाला होता.  परंतु आपले,प्रभू श्रीराम यांच्याबद्दल विशेष स्नेहपूर्ण विचार ऐकून, मनातील संदेह दूर झाला आणि मन आपल्याबाबत पूर्ण निःसंशय झालं."  निषादाचे शब्द ऐकून, कानात लोहाचा रस ओतावा तसा भास झालेला भरत, पुन्हा हात जोडून. म्हणाला " हे गूह, म्हणूनच मला ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना त्वरित भेटून, हे निष्कंटक राज्य त्यांना सोपवून, त्यांची सेवा करण्यात, पूर्ण जीवन व्यतीत करायचं आहे. जर त्यांनी यायला नकार दिलाच तर, त्यांच्यासोबत मीसुद...

अध्यात्म विराम २०१

अध्यात्म विराम २०१   संत, महंत, साधू, सज्जन हे ईश्वराच्या समीप असतात, याचा नेमका अर्थ असा की, हृदयस्थ आत्म्याच्या गाभाऱ्यातील ईश्वराला सर्वसाक्षी मानून, प्रत्येक क्षणाचं त्यांचं कर्म ते करत असतात. त्यामुळे प्रत्येक कर्मामागे, त्यांचा भाव हा ईश्वरीय पूजन, अर्चन यासमान असतो. कारण जेंव्हा ते प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या साक्षीने करतात, त्यावेळी प्रत्येक कर्मात त्यांना ईश्वराचं अधिष्ठान असल्याची प्रचिती आणि अनुभूती त्यांना प्राप्त होते आणि त्या प्रत्येक कर्माला शुद्धता प्राप्त होते. याचा परिणाम प्रत्येक क्षण, त्यांना ईश्वराच्या सांनिध्याचा अनुभव येतो.  आपण अनेकवेळा अनुभव घेतला असेल की, आपल्या घरी पाहुणे आल्यावर, आपल सर्व कर्म, कार्य, उद्देश, सर्वकाही आपण त्यांना आराम पडावा, आनंद मिळावा आणि त्यांचं येणं सार्थकी व्हावं, यासाठी आणि याचं उद्देशाने करतो. त्याचप्रमाणे या देहाच्या, सर्वात शुद्ध सात्विक इंद्रिय असलेल्या हृदयात असलेल्या अतिशुद्ध आत्मतत्वात अखंड पाहुणा रूप निवास करणाऱ्या ईश्वराच्या अंशाला आपण कधीच न जाणल्यामुळे आपण, ज्याप्रमाणे पाहुणे आल्याचं लक्षात न येता त्यांच्यासमोर नको नक...

राम अनुज भरत भाग १०

राम अनुज भरत भाग १० श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. निषाद राज गुह, प्रभूंना वनवासात निघाल्यावर भेटलेला आणि भक्त झालेला. तो या सर्व नाविक, मल्लाह अर्थात निषाद यांचा प्रमुख म्हणजेच त्यांचा सर्वस्व, राजा होता. ते सारेजण गंगा तटावर येणाऱ्या यात्री, प्रवासी जनांची प्रतीक्षा करत होते. तसा त्यांचा तो नित्य दिनक्रम होता. संध्याकाळ पर्यंत किंवा कधी कधी, काही विशेष यात्रा, सणवार असेल तर रात्री उशिरापर्यंत, लोकांना गंगा पार करून आणणं, हे त्यांच्या चरितार्थाचं पिढ्यान् पिढ्याचं साधन होता. त्यांच्यातील काही जणांनी मासेमारी आणि तत्सम व्यवसाय करत आपला जीवन चरितार्थ चालवण्याचा उद्योग धरला होता. काहींनी एकाचं घरात दोन्ही कामं विनासायास वाटून घेतली होती. त्यांचा राजा अर्थात निषादराज गूह याचा शब्द त्यांच्यासाठी अंतिम होता. आजपर्यंत एकही तंटा असा झाला नाही, ज्यामधे, निषादराज गुहाने केलेला निवाडा‌ स्वीकारला गेला नाही.  गूह याच्या या कर्तृत्वाला आधार त्याचा सरळ स्वभाव, सत्याच्या बाजूने निर्भिडपणे उभ राहण्याचा धीट पणा आणि ...

राम अनुज भरत भाग ९

राम अनुज भरत भाग ९ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. त्यां सेवकाना सूचना देण्यात आल्या की, हत्ती, घोडे, रथ व सर्व दळभार विना विलंब व योग्य गतीने, शिघ्रतेने श्रीरामां पर्यन्त पोहोचण्यासाठी उत्तम समतल (समतल म्हणजे सपाट, गुळगुळीत) करा, मार्गात जिथे नदी नाले आहेत, तिथे उत्तम व मजबूत पूल बांधणी करा.  कच्चे बांध बंधारे जिथे आहेत, तिथे त्यांना पुरेशी मजबूती देण्या साठी कार्य करा,जिथे मार्ग कंटक मिश्रित व वनातून जाणारा आहे, तिथे मार्ग निष्कंटक व सैन्य जाण्यासाठी सुरळीत करा, यासाठी त्यांना पुढे धाडण्यात आलेलं होतं जलदगतीने कार्य करून, या कुशल कारागिरांनी सर्व मार्ग निर्धोक, सुरळीत, मजबूत, समतल व सुरक्षित करून, तशी सूचना राजकुमार भरताकडे पाठवली. अर्थातच ते गंगा तटापर्यंतचा सर्व  मार्ग निर्धोक, सुस्थित व मजबूत करत पुढे गेले आणि जसजशी कार्यात प्रगती साधली जात होती, तसतशी त्याची सूचना राजकुमार भरत यांच्याकडे पाठविण्यात येत होती. या संदेशवहन कार्या साठी खास व्यवस्था आर्य सुमंत यांनी केलेली होती. अतिजलद संदेश वह...

अध्यात्म विराम २००

अध्यात्म विराम २००   आज या मालिकेचे २०० भाग झाले, त्याबद्दल मी सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज, यांचा व वाचकांचा सदैव ऋणी राहीन.  तारुण्याच्या, उत्साहाच्या, अविवेकाच्या रेट्यात, माणूस कित्येकदा, अगदी देवाचं अस्तित्व सुद्धा नाकारतो. म्हणजे मी जन्माला आलो त्यात माझं स्वतःचं काय कर्तृत्व आहे, त्या अनुषंगाने विचार करावा. अर्थात इतकी जाण असलेला मनुष्य असल्या गोष्टी करणार नाही, हे नक्कीच. पण आपण आपल्याला प्राप्त, बुद्धीची कुवत आणि मनाचं स्वातंत्र्य या जोरावर किती उड्या माराव्यात, याला काही मर्यादा असतात. आपल्याच कर्माच्या दोषाने, ज्यावेळी या मर्यादा पार करून, आपणच संकटं उभी करतो, तेंव्हा सुद्धा आपण त्या अस्तित्वात नसलेल्या देवाला नावं ठेवतो, तेंव्हा हे विसरतो की एकेकाळी, याचं तथाकथित देवाचं अस्तित्व आपणच नाकारलं होतं. असो. आपल्याला, आपल्याही नकळत, सावरण्याचा, थांबवण्याचा व अडवण्याचा प्रयत्न, सद्गुरू व ईश्वर अनेक वेळा गूढ व गहन संकेत देऊन, कित्येकदा करत असतात. आपल्याला ते लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊन आपण ते नाकारतो. आता सांकेतिक किंवा गूढ संदेश का दिले जातात, याबद्दल ...

राम अनुज भरत भाग ८

राम अनुज भरत भाग ८ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. स्नेहयुक्त भावाने, भरताने आपले व मातेचे नेत्र पुसले आणि तो मातेला म्हणाला. माते, आता काय आज्ञा आहे."  माता कौसल्या म्हणाली. " हे नरश्रेष्ठ, पुत्र भरता, आता शीघ्र, गुरुदेव वसिष्ठ, यांची भेट घेऊन, त्यांना पुढील कार्याबाबत पृच्छा करून, मगच निर्णय घे. कारण राम वनात गेलेला असल्यामुळे, त्याच्या नंतर तूच ज्येष्ठ आहेस. त्यामुळे आता तूच निर्णय घेणारा राहिला आहेस.म्हणूनच गुरुदेवांना विचारून, तुझ्या योग्य मतीने तू निर्णय घे. आम्ही त्या निर्णयात, तुझ्या सह सोबत आहोतच."  " जशी आपली आज्ञा" असं नम्रपणे बोलून आणि आपले नेत्र पुसून, भरत त्वरेने, राजप्रासाद परिसरातील, श्री गुरुदेव यांच्या, विश्राम गृहाकडे, रथ घेऊन रवाना झाला. राज पासादाच्या भव्य परिसरात, राजपुरोहित असलेल्या श्री वसिष्ठ महर्षींना उतरण्यासाठी आणि विश्रामासाठी खास तयार केलेल्या वनराईतील पर्णकुटी संकुला मधे, मुनिवर महर्षी श्री वसिष्ठ आपलं नित्य नैमित्तिक उपासना पूजा, अर्चना, याग करण्यात मग्न होत...

अध्यात्म विराम २००

अध्यात्म विराम २००   आज या मालिकेचे २०० भाग झाले, त्याबद्दल मी सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज, यांचा व वाचकांचा सदैव ऋणी राहीन.  तारुण्याच्या, उत्साहाच्या, अविवेकाच्या रेट्यात, माणूस कित्येकदा, अगदी देवाचं अस्तित्व सुद्धा नाकारतो. म्हणजे मी जन्माला आलो त्यात माझं स्वतःचं काय कर्तृत्व आहे, त्या अनुषंगाने विचार करावा. अर्थात इतकी जाण असलेला मनुष्य असल्या गोष्टी करणार नाही, हे नक्कीच. पण आपण आपल्याला प्राप्त, बुद्धीची कुवत आणि मनाचं स्वातंत्र्य या जोरावर किती उड्या माराव्यात, याला काही मर्यादा असतात. आपल्याच कर्माच्या दोषाने, ज्यावेळी या मर्यादा पार करून, आपणच संकटं उभी करतो, तेंव्हा सुद्धा आपण त्या अस्तित्वात नसलेल्या देवाला नावं ठेवतो, तेंव्हा हे विसरतो की एकेकाळी, याचं तथाकथित देवाचं अस्तित्व आपणच नाकारलं होतं. असो. आपल्याला, आपल्याही नकळत, सावरण्याचा, थांबवण्याचा व अडवण्याचा प्रयत्न, सद्गुरू व ईश्वर अनेक वेळा गूढ व गहन संकेत देऊन, कित्येकदा करत असतात. आपल्याला ते लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊन आपण ते नाकारतो. आता सांकेतिक किंवा गूढ संदेश का दिले जातात, याबद्दल ...

अध्यात्म विराम १९९

अध्यात्म विराम १९९ लहापणाचा आपण जर सूक्ष्म अभ्यास केला तर, हे लक्षात येईल की, ज्या गोष्टी डोळ्यांना आकर्षित करतात, त्या लगेच मनात ओढ निर्माण करतात. कदाचित मायेच्या खेळाचा हा अवगुण असेल की, चित्ताकर्षक वस्तू, चित्र, व्यक्ती इत्यादींची ओढ आणि आकर्षण डोळ्यावाटे मनाला खेचून, तिथे बांधून ठेवतात. जर हे दृश्य काही सेकंदाचं असेल तर, मन त्या स्थानी पुन्हा पुन्हा जायला उत्सुक होतं आणि तिथेच बांधलं जातं. त्यानंतर त्याच्या प्राप्तीची ओढ मनाला नित्य त्या गोष्टीच्या आकर्षणात ठेवते.  ही गोष्ट सर्वात प्रथम अगदी लहान मुलांच्या बाबतीत आपण पाहू शकतो की, आकर्षक रंग, वेगळ्या प्रकारची वस्तू, खेळणं इत्यादी लहान मुलांना आकर्षित करतात आणि मग त्यासाठी ते मूल काहीही करू शकतं. त्यानंतर ती गोष्ट सहज प्राप्त झाली,तर आनंद, नाही मिळाली तर रडण्यापासून ते आकांडतांडव करण्यापर्यंत सर्व हतकंडे ते मूल उपयोगात आणतं. त्याला एकदा कळलं की, हे केल्याने आपला कार्यभाग साधतो आणि आपल्याला हवं आहे ते प्राप्त होतं, हा साधा नियम त्याच्या डोक्यात फिट्ट होतो. नंतर मात्र त्याचे आई वडील या हट्टाने बांधले जातात आणि हा नियम त्यांची अप...

राम अनुज भरत भाग ७

राम अनुज भरत भाग ७ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. भरत त्याचं दुःखाच्या आवेगात पुढे बोलत होता.  "तरीही मी जनसामान्यांचं समजू शकतो. परंतु माते तूही, यावर विश्वास ठेवलास. हे भरता धिक्कार आहे तुझ्या अश्या जगण्याला. ज्याची जन्मदात्री आई, कुल विघातक आहे आणि प्रेमस्वरूप माता कौसल्या तिरस्कार करते. पण माते मी तुला आश्वस्त करतो, की यामधे माझी कोणतीही भूमिका नाही आणि सहभाग सुद्धा नाही.  म्हणून हा रघुकुल भूषण श्रीराम यांचा अनुज तुला खात्री पूर्वक सांगू इच्छितो की, ज्याने हे कृत्य घडवून आणलेले आहे, त्याला जगातील सर्व महानतम पापं भोगावी लागतील. मग ती व्यक्ती कुणीही असो, तिला रौरव नरकाचा मार्ग सुद्धा प्रशस्त होणार नाही. ज्याने या घृणास्पद कृत्यात सहभागी होऊन, सहाय्य भूत भूमिका बजावली आहे, त्या व्यक्तीला, मग तो कोणीही असो, ब्रम्हहत्या,गोहत्या, भ्रूणहत्या, मातृहत्या, निष्पापहत्या व स्त्रीहत्या अश्या सहा घोरातम पापांचा धनी व्हावं लागेल.  माते मी तुला आश्वस्त करतो की, या घराण्याच्या ब्रिदाचा लाभ घेऊन, ज्या...

राम अनुज भरत भाग ६

राम अनुज भरत भाग ६ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. भरत तडक निघून माता कौसल्येच्या महालाकडे दाखल झाला. सेविका राजकुमार भरत आल्याची सूचना देण्या साठी आत जायला निघते. परंतु मातेच्या महाली जायला काय अनुमती घ्यायची,अश्या विचाराने, भरत, सेविकेच्या मागे धावत मातेच्या कक्षात अंत:पुरात जातो.  त्याला आपल्या पुढे धावत गेलेला पाहून, सेविका पुन्हा मागे वळून, आपल्या मूळ स्थानी येऊन उभी राहते. मातेच्या समोर जाऊन, भरत मातेचे चरणस्पर्श करण्या साठी वाकतो आणि माता कौसल्या दोन पावलं, मागे सरकते. ते पाहून, भरत, उठून आश्चर्याने मातेकडे पाहतो. तो काही बोलणार, इतक्यात, माता त्याच्याकडे दृष्टी न फिरवता वदते. " झालं ना तुझ्या आणि तुझ्या मातेच्या मनासारखं. आता हे राजवैभव, हे राज्य,सुखेनैव तुम्हा दोघांनाही उपभोगता येईल. माझा राम आणि महाराज हे दोन्ही अडथळे, कैकयीने आपल्या मार्गातून, कुटनितीने, दूर केले. तू तर इथे नव्हतास, त्यामुळे तू या पापातून सहजी, नामानिराळा झालास."  क्रोधाने माता कौसल्या अजूनही काही बोलणार होती. पण तिला...

राम अनुज -भरत भाग ५

राम अनुज - भरत भाग ५ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. नाईलाजाने, कैकयी भरताला सांगते.  "माझ्या प्राणप्रिय पुत्रा, रामाच्या, वनवासात जाण्याच्या विरहाच्या धक्क्यातून, स्वतःला न सावरता, महाराज दशरथ यांनी, रामाच्या नावाचं स्मरण करत करत, प्राणत्याग केला."  हे ऐकताच, भरत आपल्या मातेला, अत्यंत क्रोधाने तप्त होत, सवेगे दूर लोटतो आणि रागाने उठून उभा राहतो आणि त्वेषाने म्हणतो " हे पापिणी, तू ही गोष्ट इतक्या सहजतेने कशी काय सांगू शकतेस. आपल्या पतीला, पुत्र विरहात लोटून, त्याला मृत्यू पंथी धाडून आणि माझ्या प्राणांचा प्राण असलेल्या, महानायक, अतिगंभीर, धीर पुरुष असलेल्या सर्वोत्तम चारित्र्याच्या श्रीराम, याना वनवासात पाठवून, तू अजूनही जीवंत कशी काय. तू कोण्या कारणे, हा विचार केलास की,रामभक्त, रामसेवक राम अनुज ही बिरुदावली पदकांसारखी भूषवणारा हा भरत, तुझ्या या नीच, पापी, कुलनाशक कट कारस्थानात तुझ्या बाजूने असेल आणि तू  माझ्या बंधुंवर जो अन्याय आणि आपल्याच प्राणप्रिय पतीचा जो घात केला आहेस,त्या पापाची माहित...

अध्यात्म विराम १९८

अध्यात्म विराम १९८ आपण अनेक प्रकारच्या गोष्टींचे, इच्छेचे, घटनांचे, व्यक्तींचे स्मरण नित्यनेमाने करत असतो. यातील काही स्मरण हे चिंतन स्वरूपातील असतं. ते आपण दीर्घकाळ मनात बाळगतो, त्यावर सखोल विचार करतो आणि बहुतेक वेळा त्यावर कार्य करतो.काही आपल्या विचारात येतं आणि फार वेळ तग न धरता, निघूनही जातं. पण काही काही इच्छा घटना वा स्वप्नं या स्मरण प्रकारात येतं हे रुजत ते तण स्वरूपात व मनात त्याची वाढ होते. असं स्मरण हे बहुतेक वेळा,नकारात्मक ऊर्जा, शक्ती असलेलं तण असतं. हे सहसा संशय, शंका कुशंका, वाद विवाद, वांझोटे परामर्ष, अश्या प्रकारच्या विचारांना जन्म देत. हेच तण अनियंत्रित आणि अविचारी वाढ असलेलं स्मरण, अनेक टाकाऊ, निरुपयोगी, वर्ज्य, निरुत्साही आठवणी, प्रसंग, मान अपमान यांची गणना, दान धर्माच्या उपकार स्वरूपातील आठवणी, यश व अपयश यांच्या घटनांच्या नोंदी आणि अनेक उपद्रवी नोंदी यांच्या स्मरणांना मनात साठवून ठेवून, ते अयोग्य व चुकीच्या वेळी आपल्याला स्मरणात आणून देण्याचं कार्य, हे तण करतं. यातील अनेक आठवणी, खरतर माळ्यावर साठवलेल्या टाकून देण्याच्या लायकीच्या वस्तुंसारख्या असतात.  त्यांची आ...

राम अनुज भरत भाग ४

राम अनुज भरत भाग ४ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.   सात रात्रीच्या मुक्कमानंतर भरत आणि शत्रुघ्न, अयोध्येत परत आले.राजप्रासादात पोचल्यावर,भरत त्वरेने पिताश्री राजा दशरथ यांना, त्यांच्या कक्षात भेटण्यासाठी जातो, त्यांना शोधतो. अर्थातच ते तिथे नसल्यामुळे, भरत त्वरेने आपली माता कैकयी, हिच्या कक्षात येतो. माता कैकयी साज शृंगारात नसल्यामुळे, आश्चर्यचकित भावाने विचारतो. " माते, तात कुठे दिसत नाहीत. त्रिभुवन नायक, ज्येष्ठ भ्राता श्रीराम, देवीस्वरुप राजलक्ष्मी सीता आणि लक्ष्मण कुठेही दिसत नाहीत. माते सर्व सुखमय कुशल आणि मंगल आहे ना. मला वाटलं होतं की, माझे परमप्रिय ज्येष्ठ भ्राता नीलवर्णी श्रीराम यांचा, राज्य अभिषेक करण्याची तयारी तातांनी सुरू केली असेल आणि म्हणूनच मला त्वरेने पाचारण करून घेतले आहे. पण यातील काहीच घडलेलं दृष्टीस येत नाही."  माता कैकयी आपल्या सुवर्णआसनावरून उठून भरताला बसण्यास सांगते. भरत त्याकडे दुर्लक्ष करतो. मातेला पुन्हा तोच प्रश्न करतो. माता कैकयी  " हे राजकुमार भरत, ज्यांची तू...

राम अनुज - भरत भाग ३

राम अनुज - भरत भाग ३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. मामाचा आज्ञा संदेश प्राप्त होताच, भरत आपल्या कक्षातून, शिघ्रतेने, राजप्रासादाच्या अतिथी अभ्यागत कक्षात उपस्थित झाला. दुताला पाहून, स्मित वदन करून,भरत दूताला म्हणतो    "तुझा प्रवास सुखावह झाला ना. अयोध्येतील सारे क्षेम कुशल आहे ना. पिताश्री अयोध्या नरेश महाराज श्री दशरथ सकुशल आहेत ना. परमप्रतापी, त्रिलोक विजयी ज्येष्ठ भ्राता श्रीरघुनाथ यथास्थित आहेत ना. तीनही माता सुखानंदी स्थिर आहेत ना."  दूताने राजकुमार महापराक्रमी भरत याला प्रणाम करून उत्तर दिलं की " हे महाबली राजकुमार श्री भरत आपण ज्यांची विचारणा केली ते सर्व ठिकच आहेत. पण राजपुरोहित श्री वसिष्ठ गुरुदेव यांनी हा संदेश पाठवला आहे आणि आपल्याला त्वरित अयोध्येला विशेष उद्देशासाठी व कार्यासाठी पाचारण केलं आहे."  इतके बोलून, दुताने कमरेच्या शेल्यामधे खोचून ठेवलेला संदेशाचा लखोटा काढून, राजकुमार भरत याच्या हातात दिला आणि तो चार पावलं मागे येऊन उभा राहिला. भरताने हातामधे लखोटा उघडून संद...

राम अनुज - भरत भाग २

राम अनुज - भरत भाग २ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. कथाभाग, राजा दशरथ यांचं देहावसान झालेलं आहे आणि श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांचं वनात प्रस्थान करते झाले आहेत, या प्रसंगापासून सुरू करणारं आहे. कथेच्या व विषयाच्या मांडणीत, बालपणातील व मागील काळाचे संदर्भ, भरत व श्रीराम यांच्या संबंधातील व संबंधासाठी आवश्यक असतील, तिथे येत जातील.  आपल्या मातुल गृही, म्हणजेच कैकेय देशात, मातामह, राजा श्रीअश्वपती याना भेटावयास गेलेला राजकुमार भरत हा शत्रुघ्न यासह, आपला विश्राम काळ आनंदात व्यतीत करत आहे.नाना अर्थात मातुल आजोबा अश्वपती मामा युधाजीत,मामी आणि राजपरीवार यांच्याकडून उत्तम लाड केले जात आहेत. सर्वकाही यथास्थित सुरू आहे. पण...नियतीचा खेळ खूप विचित्र असतो. सारं काही उत्तम चाललेलं असतानाच, आपल्या कर्माचे भोग, आपल्यासाठी वाढून आणून, नियती खेळाचा विचका कधी करेल, हे ब्रह्मदेव देखील सांगू शकणार नाहीत.  इथे कैकेय प्रांती, भरत आणि शत्रुघ्न, आपला काळ अत्यंत आनंदात व्यतीत करत असतानाच, अयोध्ये वरून आर्य सुमंत या...