भोग आणि ईश्वर ३८५
कलीच्या या स्पष्ट आणि विखारयुक्त बोलांनी, सभागृहात भंग पावलेली शांतता, पूर्ववत करण्यासाठी आणि वाता वरणातील ताण कमी करण्यासाठी, श्रीब्रह्मदेव विचारते झाले. पण या सर्वात आशेचा किरण किंवा आशादायक परिस्थितीला वाव आहे की नाही.
यावर, प्रणाम करून कली म्हणाला
सृष्टीकर्ता परिस्थिती ही गंभीर आणि खेदजनक असेल, यात शंका नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे यामध्ये खरे कर्ममार्गी, धर्ममार्गी, ज्ञानमार्गी व भक्तिमार्गी जन हे हळू हळू सापडण्यास थोडे होत जातील. यामध्येसुद्धा खरे ज्ञानी व धर्मज्ञ ओळखणं हे कठीण असेल.
कारण कलियुगात कलीचा प्रभाव असणारे व संधीचा गैरफायदा घेणारे जन, जसे सर्वच क्षेत्रात असतील, तसेच या क्षेत्रातसुद्धा असतीलच. ज्यांची भ्रष्ट मती, अडलेल्या जनांना नाडून, आपला स्वार्थ, हेतू व लाभ साध्य करणं हाच असेल. अश्या पाखंडी लोकांमुळे धर्ममार्गावर निस्वार्थीपणे चालणारे जनसाधरण त्रस्त होऊन, चुका करण्याची शक्यता असेल. ज्याचा लाभ पुन्हा अश्या ढोंगी व दांभिक लोकांना होईल.
एकूणच काय तर सर्वच क्षेत्रातील स्वार्थ, दंभ, ढोंग, अप्पलपोटे पणा सर्वत्र, आपलं साम्राज्य स्थापून असेल. माणसाची वृत्ती उच्चतेकडून हिनतेकडे सरकत जाईल आणि मतीभ्रष्ट, धर्मभ्रष्ट जनांची कायम चलती असेल. भक्त, निस्वार्थी, पुण्यवान जन हे कायम जीव मुठीत धरूनच राहतील. त्यांना नेहमी आजूबाजूच्या परिस्थिती मुळे आपण योग्य की अयोग्य असा संभ्रम असेल.
परिस्थिती कशीही येवो पण या जनांना सतत भयाच्या छायेचा आभास असेल. ही सर्व कलियुगाची माया व प्रभाव असेल. जे जन हे जाणतील, त्यांनी हे ज्ञान देऊन, इतरांना ज्ञानी करणं आवश्यक असेल. आता या सर्वात आशेचा किरण म्हणजे स्वतःच्या भक्तीवर, ईश्वराच्या अस्तित्वावर, सद्गुरूंवर दृढ विश्वास ठेवून व सद्गुरुंच्या असीम कृपेच्या कांक्षेत राहूनच आपलं कर्म आणि भक्ती यांचा मेळ घालून मार्गक्रमण करावं लागेल.
ईश्वरी सेवेचा व आत्मिक शुद्धता आणि उन्नती यांचा, कलियुगात अस्तित्वात असणारा एकमेव मार्ग म्हणजे, स्मरणभक्ती. ईश्वराच्या व सद्गुरुंच्या सतत स्मरणात, आपलं कर्म करत असतानासुद्धा, जे जन, नेहमी रत असतील,हरिभक्ती, हरीस्मरण यातून भक्तीची ज्योत, हृदयात व आत्म्यात, जे नेहमी जागी ठेवतील, त्यांच्या समीप, त्यांचे आराध्य व सद्गुरू, नेहमी असतील.
सतत ईश्वरस्मरण व चिंतन, मनाला आत्मविश्वास देतील, श्रद्धा व भक्ती नित्य जागृत ठेवतील व आराधना ही देहातील आत्म तेजाच्या ईश्वरी अंशाला प्राप्त करण्या साठी करतील अशा जनांना,त्यांच्या या मार्गात आलेली विघ्न, दूर करण्यासाठी त्यांचे सद्गुरू व ईश्वर, नेहमी सहाय्यभूत असतील. नित्य ईश्वर चिंतन करणाऱ्या जनांच्या मनात, हृदयात व आत्म्यात ईश्वर स्वतः वास करत असल्यामुळे,अशा जनांना निःशंक व निर्भय राहण्याची गरज आहे.
कलियुगात सर्वच विकार, विखार, भावभावना या मनातून देहाचा ताबा घेत असल्यामुळे आणि देहाच्या उर्मी व वासना मनावर राज्य करणार असल्यामुळे, मनाला नियंत्रणात ठेवून, देहाच्या गरजा मर्यादित ठेवणाऱ्या जनांना जीवन सुलभ असेल. कर्माने व प्रारब्धाने आलेले भोग भोगत असताना, त्याचा आपल्या वृत्तीवर व भक्तीवर कोणताही दूरगामी परिणाम होऊ न देणारे साधक, कलीच्या अर्थात माझ्या प्रभावातून पार होऊन, आपला भक्तिमार्ग, जन्मोजन्मी क्रमत जातील व अंती ईश्वरी कृपेने, योग्य स्थानी सुखरूपपणे मार्गस्थ होऊन, सरतेशेवटी मोक्षपदाला प्राप्त करतील.
कलीच्या या दीर्घ कथनावर आता सृष्टीकर्ता श्रीब्रह्मदेव काय सांगतात याकडे सभेचं लक्ष लागलं. त्यावर चिंतन उद्या करूया. पण आपलं ईश्वर स्मरण नित्य सुरू ठेवूनच.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment