भोग आणि ईश्वर ३९०
श्रीब्रम्हाजी पुढे सांगत होते. हे संपूर्ण जगत एका तराजू प्रमाणे आहे. सत्य आणि असत्य, सुख आणि दुःख, हास्य आणि कारुण्य या त्या तराजूच्या दोन तागड्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही कर्माचा भाग आहेत. तराजूत एका बाजूला वजन आणि दुसऱ्या बाजूला त्या तुलनेत वस्तू, धान्य, इत्यादी जिन्नस ठेवण्यात येतात.
हे जिन्नस तिथपर्यंत टाकण्यात येतात, जोपर्यंत ती बाजू, वजन ठेवलेल्या बाजूसमान होतं नाही. कलियुगात हीच गोष्ट खरतर एक गुह्य असेल आणि जो हे जाणेल, त्याला या सर्व गुंत्याची तोड माहिती असेल वा माहिती होईल. जसजसा पाप, अपराध, प्रमाद, अत्याचार, अनीती, अन्याय इत्यादी तागडीच्या दुसऱ्या भागाला खाली नेतील त्यावेळी तागडीच्या दुसऱ्या बाजूत, पुण्य वाढण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून ईश्वरी प्रयत्न वेगवेगळ्या स्वरूपात होतील.
म्हणूनच साधनांची सुलभता वा साधनांनी साध्य होणारं, सहज वा कमी श्रमांनी प्राप्त होण्याची व्यवस्था वा तरतूद कलियुगा चाच परिणाम म्हणून आपोआप होईल. त्यामुळे आधीच्या युगात पाप करणं हे हीन निंदनीय कमी दर्जाचं कृत्य समजलं जायचं, तेच कलियुगात तेच, गैर वा पाप न होता, मायाप्रभावाने, सत्ता, संपत्ती, साधनं, व्यवस्था व जीवन यांचा अविभाज्य भाग होईल आणि समजला जाईल.
पाप हे दुष्कर कर्म न राहता सहज घडणारं कर्म होईल. मर्यादा भंग हा अपराध वा अपवाद न राहता तो प्रघात होईल. जगण्याची पद्धतच अशी असेल, की पापाचरण नीती नियम यांचा अविभाज्य भाग असेल. याचकारणाने आधीच्या युगात, पुण्य कमावण्यासाठी करावी लागणारी अफाट व अचाट मेहनत, कलियुगात मात्र सहज श्वासा गणिक व सुलभ साध्य होईल. म्हणजेच जेंव्हा काही वर्षे यज्ञयाग, कर्मकांड व नवविधा भक्तीचे अनेक मार्ग चोखाळून प्राप्त होऊ शकणारं पुण्य,
कलियुगात केवळ ईश्वर स्मरणाने सहज साध्य व सुलभ होईल. कारण जसं पाप आपलं कार्यक्षेत्र वृद्धिंगत करत जाईल, त्याप्रमाणे पुण्याईचा सहजप्राप्तीचा मार्ग, सुकर व सुलभ होत जाईल,
एकूणच श्रीब्रम्हाजी आपलं कथन करत असताना, सभे मध्ये, कलीच्या कथनाने तयार झालेलं गढूळ व भयाचं वातावरण हळूहळू निवळू लागलं होतं. आता श्रीब्रह्मदेव आपल्या कथनाच्या शेवटच्या टप्प्यात पोचले होते. त्याचा परामर्ष उद्याच्या भागात घेऊ. तोपर्यंत आपण नामाच्या सहाय्याने मनःशांती प्राप्त करूया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment