भोग आणि ईश्वर ३७१
आत्म्याच्या शोधासाठी मन देह व बुद्धी यांच्या गरजा कमी करून,मनाला देह व बुद्धिपासून तोडून,आत्म्याकडे वळवण्या साठी योग्य वयात योग्य त्या मार्गाने देहाच्या गरजा आणि ओढ कमी करून मनाला आत नेण्याचा प्रयत्न करावा. आत्मशोध हा ईश्वराकडे जाण्याचा आणि मूळ ईश्वरी उद्देशाला साध्य करण्याचा महत्वाचा मार्ग आहे.
आत्मबोध म्हणजे स्वतःला किंवा देहातील स्व अर्थात आत्म चैतन्य पाहणं व जाणणं. या मार्गाकडे जाण्यासाठी प्रथम सर्व स्तरावर विखुरलेलं मनाचं साम्राज्य हळूहळू आवरत आणून, मनावरील मायेचं बंधन आणि मायेचा पाश ओळखणं. मायेचे पाश कळणं आणि ओळखता येणं, हे विधात्याच्या कृपेशिवाय अशक्य गोष्ट आहे.
मनाचा समतोल साधत व मनाला ओळखून, त्याप्रमाणे नियंत्रणाच्या मार्गावर स्थिरचित्त वाटचाल करत जाणं, हे त्यातील खूप मोठं गुह्य आहे. हे जाणायलादेखील कित्येक जन्मांची पुण्याई गाठीशी हवी आणि सद्गुरु कृपा. कारण चुकतं कुठे आणि योग्य काय, हे एकतर कुणीतरी सांगायला पाहिजे किंवा स्वतःतील जाणीव जागृत झाली पाहिजे.
जाणिवांची जागृती हा एक खूप मोठा आणि अवघड टप्पा आहे. अवघड यासाठी की, या स्थितीपर्यंत येण्यासाठी देखील मनाला अनेक स्थित्यंतरातून जावं लागतं. जाणीवा जागृत होताना संवेदनशीलता येत जाते. खुप प्रसंगात, मनाचा गुंता वाढतो, अतिसंवेदनशीलते मुळे, मन बऱ्याच लहरीना स्वीकारत जातं. त्यामुळे मुख्य अडचण जाणीवा अतिजागृत होऊ शकतात किंवा पूर्ण निद्रिस्त होऊ शकतात.
या अवघड प्रक्रियेतून जात असताना, सद्गुरुकृपा असावी लागते, तरच यातून, काय निवडण्यायोग्य व काय त्याज्य करण्यायोग्य हे समजून येतं. अन्यथा अर्जुनाला आला तसा चुकीच्या वेळी व चुकीच्या प्रसंगी, विषाद व भ्रम होऊन, मन भलत्याच गोष्टीत निर्णय घेण्यात गोंधळू शकतं आणि मग चुकीच्या निर्णयामुळे, चुकीचा मार्ग निवडणं आणि मग मार्गभ्रष्ट होण्याची स्थिती निर्माण होऊ, शकते.
हा सर्व गोंधळ व गडबड, फक्त सद्गुरुकृपेने टाळली जाऊ शकतो किंवा टाळला जातो. म्हणून आत्ममार्गी वा आध्यात्म मार्गी साधकाने, गुरू करावा तो यासाठी. सर्वसामान्यपणे आपण सांसारिक गुंता व चिंता, यासाठी सद्गुरू करून,त्यांना सांसारिक चिंता आणि व्यथा यामध्ये गुंतवण्याचा चुकीचा प्रयत्न करतो. वास्तविक सद्गुरूंची खरी गरज ही, आध्यात्मिक उन्नती व आत्मवृद्धीच्या मार्गात येत जाणाऱ्या समस्या, चिंता यांना सोडवून, साधकाला योग्यवेळी, योग्य त्या मार्गाने, प्रगतीपथावर पुढे पुढे नेत जाण्यासाठी आहे आणि असते.
यावर अजून चिंतन करूया पण उद्याच्या भागात. तोपर्यंत सद्गुरुकृपा का व्हावी हे उमगलं असेल तर नामात सद्गुरूंना वंदन करण्यात धन्यता मानुया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment