Skip to main content

Posts

Spirituality within you -4

Spirituality within you -4  On knowing much on negativity, lets go ahead. 1. Three things need tackled, if one needs to break the negativity layer or to remove the curtain. Will to do so i e WILL, equating mind n brain i.e. CONCENTRATION , creating positive vibrations or vibes i.e. STEP BY STEP TOWARDS AATMASHUDDHI. 2. Initially, one needs to concentrate on the moment, when you get Negativity or you are caught in negative vibrations. Many even don't know or are unaware about the state of own mindset. 3. So utmost important is behaviour study of own mind, thoughts, thinking process, pattern and changes occuring at different times and in situations. 4. It's understanding self, a basic step towards Aatmashuddhi. It is basically the purification of mind.  Lets move one by one a step forward to it.  ©® Prasanna Athavale 9049353809/9960762179 22/02/2024

मनाचिये गुंती, जाणिवांच्या जागृती -१

मनाचिये गुंती, जाणिवांच्या जागृती -१ माणसाचं संपूर्ण आयुष्य, कर्म, फल आणि सर्व व्यवहार हे, मन बुद्धी आणि देहाची वासना ठरवतात. त्यातही सर्वात श्रेष्ठ आणि अग्रस्थानी म्हणजेच नेतृत्व मनच करतं. कारण तोच ड्रायव्हिंग फोर्स असतो, प्रत्येक निर्णयात बुद्धी व देह यांना कार्याला जंपणारा.  म्हणजे मन हे इंद्रिय किती महत्वाचं आहे. याबद्दल अनेकांनी लिहून झालंय. पंचमहाभूत स्वरूपात तत्वांचं देहातील प्रतिनिधित्व बघितलं, तर मन हे आकाश स्वरूप असतं. म्हणजे आकाशाला कसं वारा इकडून तिकडे नेतो. उष्णता एखाद्या भागात जास्त वाढली की, त्याचा ताळमेळ राखायला सृष्टी कर्त्याने अशी व्यवस्थाच निर्माण करून ठेवली आहे की,  त्या ठिकाणी मेघ पाठवून, वातावरण आल्हाददायक करायचं. म्हणजेच जिथे ज्या गोष्टीची कमतरता असेल, तिथे ती गोष्ट पाठवायची आणि जगण्याचं संतुलन आणि ताळमेळ राखायचा. याचाच अर्थ निसर्गाने मूलतः नियम असा केला आहे की, ज्या गोष्टी जिथे गरजेच्या आहेत तिथे त्या निसर्गाला जितकं शक्य आहे तितकं पाठवून, सुव्यवस्था राखणं. मनाच्या बाबत असं घडतं का याबाबत विचार करताना, हे लक्षात येईल की, ज्यावेळी मनात काही आंदोलन होत अ...

Spirituality within you -2

Spirituality within you -2   1. Negative vibrations or Vibes, are highly concetrated at centre. Not only they have gravity force, but are vibrant. Also it has hypnotic effects too. 2. Its hypnotic effect is so forceful that, even the persons standing nearby, do get affected by that force, unless they are independent thinkers..It's like an evil power.  It has tremendous controlling abilities and unimaginable speed too. 3. Most important task, at that moment, is to control effectiveness and efficiency of the force, from taking  control of your entire mindspace.  ©® Prasanna Athavale 9049353809/9960762179 20/02/2024

Spirituality within you -1

Spirituality within you -1  1. Negativity within you, has magnetic efficiency and catche equal amount of negativity, from outside.  2. Scientifically, negative mind is a strong crop to multiply it further. Negative mind is weak, but very strong to make wrong perceptions to cause further decay. 3. So removing negativity, has to be a first goal in itself. Lets learn it step by step, on a regular basis. ©® Prasanna Athavale 9049353809/9960762179

#आत्मचिंतन_बोध भाग १०

#आत्मचिंतन_बोध भाग १० ©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले एका देहात स्थित झालेला हा आत्मा, सहसा, देह सोडून जाण्यास तयार नसतो. किंबहुना कोणताही जीव, अश्या तयारीत सहसा नसतो. त्याला त्या देहातून बाहेर काढणं, ही देखील एक मोठी जिकिरीची प्रक्रिया आहे. याचसाठी मृत्यू या व्यवस्थेची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. एका भुलोकी, (कदाचित या ब्रम्हांडात अनेक भुलोक आणि इतर सप्त लोक असू शकतील), करोडो देहातील एका देहात असलेला आत्मा, काढून न्यायचा. त्याचा हिशोब करायचा आणि त्याला पुन्हा दुसऱ्या देहात, जन्मात, जाण्यासाठी, नेऊन त्या त्या लोकात स्थापित करायचा.ही सर्व व्यवस्था, शतका नुशतके, युगानुयुगे सुरळीत, नियमबद्ध रीतीने सुरू आहे. हाच एक अद्भुत चमत्कार आहे. अगदी संगणकीय भाषेत सांगायचं तर, कृत्रिम बुध्दिमत्ता असलेल्या व्यवस्थे प्रमाणे, सुरू आहे. या सर्व विवेचना वरून, लक्षात आलं असेल की, आपण इथे बसून फक्त या देहात असलेल्या भोग व उपभोग या चक्राचा, स्वतःच्या भाग्य दुर्भाग्य, दुर्दैव याचा विचार करण्यात मग्न असतो.  पण हे करताना, आपण, आपल्याच या आणि पुढील जन्मांची व्यवस्था सुरळीत करतो, की, त्याला अजून समस्येत...

#आत्मचिंतन_बोध भाग ९

#आत्मचिंतन_बोध भाग ९ कालच्या भागात आपण पाहिलं की आत्म्याचा श्वासांचा हिशोब संपला की एक श्वास देखील, अतिरिक्त, आत्मा त्या देहात थांबत नाही. थांबू दिला जात नाही. कारण त्या गणितावर, पुढची अनेक गणितं अवलंबून असतात. खूप क्लिष्ट नाही पण थोडं किचकट आहे.बघुया. या जन्मा तील मृत्यूनंतर, त्या आत्म्याचा प्रवास, जो त्याच्या कर्म फलाने ठरलेला आहे किंवा त्या आत्म्याने ठरवला आहे, तो पुढे नेण्याची मोठी जबाबदारी काळ पुरूष,यम, मृत्यूची व्यवस्था, या सर्वांवर सोपवलेली असते.  त्यात कसूर होऊन चालत नाही. कारण त्या आत्म्याचा पुढील जन्म, त्या जन्मातील, अनेक भोग उपभोग, कर्म फल, त्या आत्म्याशी निगडित सर्व आणि सर्वांचे त्या जन्मातील व्यवहार, हे त्या आत्म्याच्या या देहातील गमनावर अवलंबून असतात. म्हणजे एकाचं गणित चुकलं की, त्यावर अवलंबून कितीतरी गणितं चुकू शकतात. बरं ही पुढची गणितं एकाच नव्हे तर पुढील कित्येक जन्मातील, चुकणार. म्हणजे अनेकांच्या त्या आत्म्यासंबंधी कर्म करार चुकू शकतात.  कर्म करार, नवीन वाटला शब्द तरीही त्याचा अर्थ खूप सखोल आहे. तो अर्थ नंतर पाहू, पण पुन्हा मुद्यावर चर्चा करूया. म्हणजे किती ब...

#आत्मचिंतन_बोध भाग ८

#आत्मचिंतन_बोध भाग ८ भुलोकि जे नियम आहेत आणि जे काल पाहिले, ते खालीलप्रमाणे :  १. कर्मसिद्धांत.  २. इथलं कर्म इथेच फलित. ३. फलरहित कर्म नाही. चवथा नियम म्हणजे, जितके श्वास आहेत तितकं जगण्याचं बंधन आहे. म्हणजे जितक्या श्वासात आयुष्य लिहिलेलं आहे, ते आपल्याला जगूनच संपवणे क्रमप्राप्त आहे. याचे दोन अर्थ होतात, दोन्ही पाहूया. एक म्हणजे आपलं आयुष्य हे श्र्वासांचं आहे. याचं कारण म्हणजे, कालगणना हा मानवाने, या भूलोकात विकसित केलेला, या भुलोका साठीचा,गणिती प्रकार आहे. तो वेदकाळा पासून सुरू झाला असावा. पण हे ब्रम्हांड तयार केलं, त्यावेळी कालगणना ही श्र्वासांच्या लहरी किंवा कंपन यावर गणलं गेलं आहे. देहासाठीची ही मापन पद्धती, फक्त या मृत्युलोकासाठी आहे, हे देखील पाचवा नियम म्हणून लिहून घ्या.  ती मूळ सुरुवात किंवा मापन पद्धती आहे,जी विधात्याची उपलब्धी आहे. त्याच्या लेखी व त्यांच्या हिशोबात, आपलं आयुष्य, याच मापन पद्धतीने मोजलं जातं.म्हणजेच आपण मृत्यू पश्चात त्याच्या विशिष्ट व्यवस्थेपुढे जाऊ किंवा जातो, तेंव्हा तिथे आपला हिशोब श्वासांच्या आधारे किती झाला, याचा ताळेबंद काढला जातो. यातू...